Details
पुरुषी मानसिकतेला दोन लाथा घाला!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
आज महिला दिन आहे म्हणण्याऐवजी अजूनही पुरुषसत्ताक संस्कृतीच्या वरवंट्याखाली महिला दीनच आहेत असे खेदाने म्हणावे लागावे यातच महिला दिनाचे वास्तव काय ते दिसून येते. दिवसरात्र बातम्या ओकणारे कुठलेही चॅनेल लावा वा नियतकालिकांचे कुठलेही पान उघडले तरी महिला अत्याचार आणि छळाच्या बातम्या, खून आणि जबरदस्तीच्या बातम्या नजरेसमोर येतात. संवेदनशील मने भांबावून जावीत अशा परिस्थितीच्या रेट्याला आजची महिला सामोरी जात आहे. दररोज ती तिचे आभाळ विस्तारण्याचा प्रयत्न करते आणि अनेकदा थकून पंख मिटून घेते. जिला स्वतंत्र होण्यासाठी क्षणोक्षणी झगडावे लागते तिला स्वयंसिद्धा म्हणायचे तरी कसे? आणि घरदार, उद्योग-व्यवसाय यांचा तोल मोठ्या अपूर्वाईने सांभाळणाऱ्या या आदिशक्तीवर आपणच म्हणजे पुरुषांनीच ही वेळ आणली आहे याची लाज वाटायला लागते. असे लाज वाटणारेही आता अल्पसंख्याक झाले आहेत.
महिला म्हणजे भोगवस्तू हा समज शतके उलटली तरी कायम आहे. वर्चस्ववादी समाजाने हा समज टिकवून ठेवला आहे. गार्गी, मैत्रेयी ही उदाहरणे अपवाद म्हणून पण, अगदी सावित्रीबाईंनाही याच वर्चस्ववादी समाजाकडून फेकले गेलेले शेणगोळे सहन करावे लागले होते. आजही तेच होत असते. महिला म्हटल्यावर भेदभाव होतोच. इस्रोच्या महत्त्वाच्या मोहिमांची सूत्रधार एक कर्तबगार महिला, संरक्षण मंत्री एक महिला, प्रमुख कंपन्यांच्या सूत्रधारपदी महिलाच आणि अन्यायाला सामोरी जाते तीही महिलाच. कौटुंबिक छळाला सामोरी जाते, सासरच्या दडपशाहीपुढे मान तुकवते ती महिलाच. ती सबला आहे असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ती अबलाच राहवी म्हणून पुरुषी वृत्ती पाशवी अरेरावीचे नित्य प्रदर्शन घडवत असते. मग बातमी येते की महिलांवरील अत्याचार, विनयभंग वाढले, अल्पवयीन मुलांनीही महिलांवर हल्ले केले.
गेल्या पाच वर्षांत बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत दुपटीने वाढ झाल्याचा प्रजा फाउंडेशनचा ताजा अहवाल हेच धक्कादायक वास्तव समोर आणतो. २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांत शहरात बलात्काराच्या घटना ८३ टक्क्यांनी, तर विनयभंगाच्या घटना ९५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना पूर्वीपासून घडत आहेतच पण, त्यांची तक्रार आता महिला पुढे येऊन करायला लागल्या आहेत, आवाज उठवू लागल्या आहेत. कुणी याला चांगला बदल म्हणतील. पण अत्याचार, विनयभंग होत राहवेत आणि महिलांना त्याबद्दल तक्रार करायला पोलीस स्टेशन गाठायला लागावे ही काही चांगली गोष्ट आहे असे आम्हाला वाटत नाही. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, दक्षिण मुंबई म्हणजेच वरळी, भायखळा, कुलाबा, मलबार हिल या परिसरात बलात्काराच्या गुन्ह्यांत १७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर मुंबईत विनयभंगाच्या घटनांमध्ये १८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि हे सर्व होत असताना दरवर्षी ठरल्याप्रमाणे महिला दिन साजरा करणारे आपले लोकप्रतिनिधी मात्र महिलांच्या या शोषणाविषयी काहीही बोलत नाहीत. २०१७ आणि २०१८च्या राज्य विधिमंडळ अधिवेशनांमध्ये शहरातील आमदारांनी बलात्काराच्या गुन्ह्यांबाबत फक्त नऊ प्रश्न उपस्थित केले. यात दक्षिण मुंबईतील पाच, ईशान्य मुंबईतील दोन आणि उत्तर मुंबईतील दोन आमदारांचा समावेश असल्याचे प्रजा फाउंडेशनने म्हटले आहे. जे मुंबईत तेच राज्यात आणि देशात घडत असते. पण कुठल्याही भागातील लोकप्रतिनिधी अगदी महिला लोकप्रतिनिधीही महिलांविषयी, त्यांच्या अधिकारांविषयी, त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत जीव तोडून आक्रमक होताना दिसत नाही.
महिलांना त्यांच्या हक्कांविषयी सजग करण्याची पहिली ठिणगी पडली ती महिलांना पाटलोण म्हणजे फुलपँट घालण्याचा अधिकार मिळावा म्हणून. मतदानाच्या हक्कासाठीही त्यांना झगडावे लागले होते. क्लारा जेटकिन या महिलेने 1910 मध्ये कोपेनहेगनमध्ये आयोजित कष्टकरी महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महिलांमध्ये जनजागरण घडवून आणण्यासाठी जागतिक महिला दिन आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. १९१७ मध्ये रशियात अन्न, पुरेशा कपड्यांसाठी आणि मतांच्या अधिकारासाठी महिला आक्रमक झाल्या, संपावर गेल्या. तत्कालीन झार निकोलसला सत्ता सोडावी लागली. ग्रेगेरियन कालगणनेनुसार तो दिवस ८ मार्च होता. आपल्याकडे त्याआधीही कैक शतकांपूर्वी प्रज्ञावान महिलांनी आत्मनिर्भरतेची झळाळी दाखवली होती. आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. पण काली, दुर्गा, सरस्वहती, लक्ष्मीह म्हणून महिलांना देवतास्वरूप मानणारा समाज अजूनही त्याच महिलांना दीन करून वागवतो आहे. अत्याचार तर होतातच पण, शिव्याही महिलांच्या अवयवाशी, महिला नातेवाईकांशी संबंधित असतात इतकी हीन वागणूक आजही महिलांना सहन करावी लागत असते.
अन्यायाचे, अत्याचाराचे, शोषणाचे हे काळवंडलेले आभाळ निरभ्र करण्यासाठी आजची महिला लढत आहे. तिला मुक्त करण्यापेक्षा पुरुषी मानसिकतेच्या जोखडातून समाजाला मोकळे होण्याची गरज आहे. अशा मोकळ्या, पूर्वग्रहविरहीत समाजात कर्तृत्त्ववान महिलांचे, घरासाठी खपणाऱ्या, कष्ट उपसणाऱ्या सर्वसामान्य महिलांच्या आशा-आकांक्षांचे पंख विस्तारावेत, त्यांची स्वप्ने साकार व्हावीत, अरे ला कारे करत त्यांनी पुरुषी मानसिकतेला दोन दणदणीत लाथा घालाव्यात, लाफे चढवून द्यावेत असा दणकट, खंबीरपणा त्यांच्या अंगी यावा याच शुभेच्छा!”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान