HomeArchiveरस्त्यांवरचे दहशतवादी!

रस्त्यांवरचे दहशतवादी!

Details
रस्त्यांवरचे दहशतवादी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
‘मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात आणि २६/११च्या हल्ल्यात जितके लोक मारले गेले नसतील, तितके लोक कुत्रा चावल्यामुळे मरण पावले आहेत’, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने मागे सर्वोच्च न्यायालयात दिली होती. ठाण्यात वर्तक नगर परिसरात रविवारी मुस्कान अन्वर शेख या बालिकेच्या गालाचे, डोक्याचे एका भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना कळल्यावर आठवली ते भटक्या कुत्र्यांचे बळी सांगणारी मुंबई महापालिकेची ही माहिती. महापालिकेने ही माहिती साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी दिली होती. तेव्हापासून आजवर भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच राहिली आहे.

मुंबई असो वा ठाणे वा अन्य उपनगरे, राज्यातील शहरे सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी जणू दहशतवाद्यांचे रूप घेतले आहे. ठाण्यातील घटनेत मुस्कानचा गाल कुत्र्याने संपूर्ण फाडला असून डोळा थोडक्यात बचावला आहे. या कुत्र्याने तिच्या डोक्याचाही मोठा चावा घेतल्यामुळे तिथे नऊ टाके पडले आहेत. ठराविक कालावधीनंतर या स्वरूपाच्या घटना ठाणे, कल्याण, उल्हासनगर, टिटवाळापासून सर्वत्र वारंवार घडत असतात. त्या त्या वेळी भटक्या कुत्र्यांचे काय करायचे हा प्रश्न काही दिवस ऐरणीवर येतो आणि लोक विसरून जातात. मग पुन्हा एखादी अशी बालिका वा लहान मूल या कुत्र्यांच्या हल्ल्याचा बळी ठरते तेव्हा या उपद्रवाची जाणीव होते. रात्रपाळीवरून येणाऱ्या लोकांना तर हमखास या दहशतवाद्यांना सामोरे जावे लागते. अंधारलेल्या रस्त्यांवर, गल्लीबोळात ही कुत्री अचानक समोर येतात, मोटरसायकलस्वाराच्या मागे लागून त्याला बिचकवतात, अनेकदा गाडी पडते, ती व्यक्ती जखमी होते. या सगळ्यांना मात्र या दहशतवाद्यांचा रोज सामना करावा लागतो. त्यांना या कुत्र्यांचा कधीच विसर पडत नाही.

या कुत्र्यांप्रमाणेच आणखी एक उपद्रवकारक जमात आहे ती म्हणजे या कुत्र्यांना कोंबडीच्या दुकानांतील टाकाऊ माल आणून खायला घालणारे, त्यांना बिस्कीटे खायला घालून भूतदया दाखवणारे प्राणीप्रेमी. कचराकुंड्यांवर मिळणारे खाणे, या प्राणीप्रेमींकडून मिळणारा खुराक यामुळे रस्त्यारस्त्यांवर, गल्लीबोळांत हे भटके दहशतवादी वाढत आहेत. त्यांचे हल्लेही वाढत आहेत. या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयासह अनेक उच्च न्यायालयांनी कुत्र्यांच्या नसबंदीला मान्यता दिली होती. तिथेही हे श्वानप्रेमी आडवे आले होते. पाळीव श्वानांनी रस्त्यावर केलेले विधी स्वच्छ न करता सार्वजनिक अस्वच्छतेत भर घालणारी श्वानप्रेमी मंडळी अनेक घरांत असतात. ही मंडळी भटक्या कुत्र्यांना आवर कसा घालावा हे मात्र सांगायला पुढे येत नाहीत. मध्यंतरी घरासमोर वा इमारतीसमोर लाल रंगाचे पाणी भरलेली बाटली ठेवून कुत्र्यांना दूर ठेवता येते अशी आवई उठली होती. तेव्हा राज्यात अक्षरश: हजारो इमारतींसमोर अशा लाल पाण्याच्या बाटल्या लोकांनी ठेवल्या होत्या. यावरून भटक्या कुत्र्यांची दहशत किती वाढली आहे याची कल्पना यावी. भटक्या कुत्र्यांना विष घालून मारले किंवा गाडीखाली चिरडले अशा बातम्या वाचल्यावर कुणाही संवेदनशील माणसाचे मन हळहळते. पण भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली लहान मुले, रेबीजने दगावलेल्या व्यक्ती, रोज कुठे ना कुठे या कुत्र्यांचा दंतप्रसाद मिळणाऱ्या लोकांच्या बातम्या वाचून प्राणीप्रेमीही व्यथित होतात, असे जाणवत नाही. या भटक्या कुत्र्यांना चायनीजचे उरलेले खाणे, टाकाऊ मांस खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळेच ती आक्रमक झाली आहेत, त्यांना असे खाणे मिळाले नाही तर ती पादचाऱ्यांना, मुलांना लक्ष्य करू लागतात, असा एका फसवा युक्तीवाद केला जातो. पण सर्वच ठिकाणी चायनीजच्या गाड्या नाहीत आणि ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्याही नसतात.

चांगल्या वसाहतींमधील कुत्रीही तिथल्याच रोजच्या दिसणाऱ्या लोकांवरही हल्ला करतात, चावे घेऊ लागतात, त्यांना प्रतिबंध कसा करायचा? मध्यंतरी ठाण्यातील पत्रकारांच्या सोसायटी परिसरातही या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न उभा राहिला होता. कुत्र्यांची नसबंदी, अशा चावऱ्या कुत्र्यांना पकडून अन्यत्र सोडणे, लसीकरण हे उपाय अमलात आणायला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. ठाण्यात तर गल्लीबोळात अशी कुत्री ठाण मांडून बसलेली असतात आणि रात्रीही शहर परिसरातील नाक्यानाक्यावर हे दहशतवादी झुंडीने फिरत असतात. ठाण्यातील प्रत्येक गल्लीत हे भटके दहशतवादी फोफावले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून होणारे श्वान नसबंदीचे प्रयत्नही या वाढत्या संख्येपुढे अपुरे ठरू लागले आहेत. ठाण्यात सुमारे ८० हजार भटकी कुत्री असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. नसबंदी आणि श्वानदंशावरील उपचारांसाठी महापालिका सातत्याने निधीत वाढ करत असते. अशा दहशतवाद्यांपासून बचाव करण्याविषयी एक विनोद काही महिन्यांपूर्वी वाचनात आला होता.. कुठेही एखादा भटका कुत्रा अंगावर आल्यास पळू नका, त्याच्याकडे पाहू नका, काहीच करू नका.. जे करायचे ते तो कुत्रा करणारच आहे.. विनोदातून व्यक्त झालेली ही आपल्या सर्वांचीच हतबल असहायता संपवण्यासाठी प्रभावी उपाय शोधण्याची गरज आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...
Skip to content