Details
“काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नातवंडांना ओढ सत्तेची!”
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
काँग्रेसने पक्षाच्या धोरणापेक्षा सत्तेकडे नेणारे साखरसाम्राट, शिक्षणसम्राट, सहकार क्षेत्रातील सम्राट, मद्यसम्राट, कारखानदार, बिल्डर्स यांना हाताशी धरून राज्यात सत्ता राबवली. याच सत्ताधाऱ्यांनी आपली कारखानदारी वाढवली. प्रसंगी तोट्यातील कारखाने वाचविण्यासाठी जनतेचाच पैसा अनुदान या गोंडस नावाखाली मिळविला आणि स्वतःचा मतदारसंघ मजबूत केला. हे मतदारसंघ म्हणजे प्रसिद्ध डॉन अरूण गवळी याच्या दगडी चाळीच्या पद्धतीने चालवले जातात. बारामती म्हणजे शरद पवार, सांगली म्हणजे पाटील कुटूंब, सोलापूर म्हणजे सुशिलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील, अहमदनगर म्हणजे विखे पाटील, नांदेड म्हणजे शंकरराव चव्हाण अशी ही घराणेशाही गेली कित्येक वर्षे अविरत चालली आहेत.
जरी ही घराणे एकमेकांच्या विरोधात असली तरी स्वतःच्या अस्तित्त्वासाठी बेरजेचे व्यवहार पडद्यामागे करीत असतात. आज आपण लोकशाहीचे गुणगान गातो हे थोतांड आहे. आपण लोकशाहीत आहोत ते या घरण्याशाहीला मतदान करण्यापूर्तीच. याला खतपाणी आपणच घालतोय. या घराणेशाहीच्या विरोधात कोणताही पक्ष गरीब कुटुंबातील सदस्याला निवडणुकीत उभे करू शकत नाहीत. कारण तो त्याच्या पक्षाला निवडणुकीत पैसा देऊ शकत नाही. लोकशाहीत निवडणूक म्हणजे पैशाचा खेळ असतो, लोकशाही विचारांशी त्याचा काही संबंध नसतो. उर्मिला मातोंडकर किंवा लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या अभिनेत्र्यांना निवडणुकीत उमेदवारी देतात आणि लोकांच्या नेहमीच्या समस्यांची जाण नसलेले हे उमेद नसलेले उमेदवार लोकांच्या माथी मारतात. अशावेळी भाबडी आणि तितकीच बेफिकीर जनता आपली किमती मते त्यांच्या झोळीत टाकतात.
खासदार हेमा मालिनी या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहीमेत कचरा काढताना सोबत बिस्लरीची बाटली आणि डेटॉल घेऊन फिरायच्या. याच खासदार हेमा मालिनी यांनी लोकसभेत किती प्रश्न विचारले आणि लोकांच्या किती समस्यांना न्याय मिळवून दिला असा सवाल लोकांनी विचारणेही धाडसाचे ठरेल. त्याशिवाय महिन्याला लाखो रूपये वेतन, विमानप्रवास, वाहनासाठी पेट्रोल, पीएसाठी मानधन, मोफत रेल्वेप्रवास जनतेच्या पैशावर मिळणारी ही सवलत म्हणजे लूटमार आहे. लोकांना हे सगळं माहितच असते असे नाही, परंतु त्याबद्दल जागृतीही केली जात नाही. असो, या लोकशाहीचे यथोचित वर्णन अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केले होते. ते म्हणतात की, Democracy is by the people, of the people and for people.
आता सांगा आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य माणूस दिसतोय का? याचाच अर्थ लोकशाहीत पैशाचा सन्मान आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की, नेत्यांचीच मुले व नातवंडे सत्तेकडे धावत आहेत. Democracy is by the money, of the money and for the money, अशी लोकशाहीची आता नव्याने व्याख्या झाली आहे. भाजपा-शिवसेना युतीने एक-दोन उमेदवार सोडून जुने उमेदवार लोकसभेसाठी उभे केले आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादीने घराणेशाहीला प्राधान्य दिले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधानांचे स्वप्न आजही रंगवत आहेत. बारामतीसारख्या सुरक्षित लोकसभा मतदारसंघात उभे न राहता विजयसिंह मोहिते पाटील यांना बाजूला सारून स्वतः लोकसभेसाठी उभे राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘माढा, शरद पवारांना पाडा’ असे समाजमाध्यमावर टीका होऊ लागली आणि शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवार यांच्या पार्थचे हट्ट पाहून पवारांनी ते निमित्त केले. एकाच घरातून तीन-तीन उमेदवार उभे राहिल्यास कार्यकर्त्यांनी चादरी उचलायच्या का? असे विधान करून स्वतःटी सुटका करून घेतली. राजकीय जाण व भान असलेले शरद पवार यांनी त्यांच्याशी कायम निष्ठावंत असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा विचार केला नाही. सरतेशेवटी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात गेले. खरं म्हणजे शरद पवारांच्या चुकीच्या निर्णयाला कंटाळून मोहिते पाटील कुटूंब भाजपाकडे वळले. म्हणून सर्वस्वी दोष हा त्यांचाच आहे. आत्मकेंद्रित हा गुण असलेले पवार यांनी इतर पक्षातील नेत्यांना आपल्या राष्ट्रवादीत घेऊन पक्ष वाढविण्याचा आणि सुजविण्याचा आतापर्यंत प्रयोग केला. शिवसेनेचा ढाण्या वाघ छगन भुजबळ यांना फितवून आपल्याबरोबर घेऊन त्यांची नखे काढून त्यांचा अँटिक पीस केला आहे. हे सांगायला नको.
पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेल्या नेत्यांच्या नातवांनी बंडखोरी करून काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. एकापरीने ही बंडखोरी दोन्ही काँग्रेसने गांभीर्याने घेतली नाही. सुजय विखे पाटील, धैर्यशील माने, विशाल पाटील, राहुल आवाडे, प्रतीक पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील या पाच नातू कंपनीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात बंड पुकारले. याला कारण काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेच जबाबदार आहेत. दोन्ही पक्ष व्हेंटिलेटरवर असताना शरद पवारांना त्यांच्या नातवाची काळजी तर अशोक चव्हाण यांना त्यांच्या पत्नीची काळजी. बाळासाहेब माने यांचा नातू धैर्यशील यांनी प्रथम बंडाचा झेंडा फडकवला. हातकणंगले मतदारसंघात शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करणार याची माहिती मिळताच त्यांनी सरळ शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. विशेष म्हणजे धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने राष्ट्रवादीच्या दोनदा खासदार होत्या. त्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला. विखे पाटील यांच्या घरातही वाद निर्माण झालेत. वास्तविक पाहता विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पडद्यामागाचा मैत्रीचा बोलबाला खुलेआम होत होता. त्यामुळे त्यांच्या मुलाने, सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. शरद पवारांनी स्वतःच्या नातवासाठी माढामधून माघार घेतली तर त्यांनी आजोबांच्या भूमिकेतून सुजय यांना न्याय दिला असता तर राज्यात एक परिवर्तन घडविणारा संदेश गेला असता. पण तसं घडलं नाही. त्याचे दूरगामी परिणाम येती लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच दिसेल.
शंकरराव मोहिते पाटील ते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सोलापुरातल्या घरणेशाहीतल्या रणजितसिंह यांच्याकडे राष्ट्रवादीने अर्थातच शरद पवारांनी दुर्लक्ष केल्याने आणि स्वतः माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केल्याने मोहिते-पाटील घराणे हादरले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि शरद पवार यांना पिता-पुत्रांनी ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. सांगलीत वसंतदादा गडही हादरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेस उमेदवारी देणार असल्याचे कळताच प्रतीक पाटील, विशाल पाटील या वसंतदादांच्या नातवांनी काँग्रेसला दादांसारखा स्वाभिमानी हिसका दाखविला. वसंतदादा यांनी सांगलीत काँग्रेस पक्ष रूजवला आणि त्यांच्या पुढच्या पिढीने पक्ष वाढविण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांना बंडाचा निशाणा फडकवा लागला ही नामुष्की पाहण्याची वेळ काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर आली.
आता प्रश्न असा आहे की, पक्षाने या घराण्यांना भरपूर दिले. पण जशी सत्ता ही वाडवडिलांना सोडावीशी वाटली नाही. तशीच या नातवांनाही सत्तेची चटक लागली. सत्तेपेक्षा त्यांचे कारखाने, सहकारी बँका आणि त्यातून मिळणारी सत्तेची ऊब हीच महत्त्वाची आहे. जे बापाने केले, तेच मुलांनी केले, आता त्यांची नातवंडे करत आहेत.. घरणेशाहीला सत्तेची नशा चढली आहे, लोकांनी याचा विचार करावा.”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार