Details
पक्षनिष्ठेला पुरस्कार!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
वेळ खूप घेतला पण काँग्रेसने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी एक चांगला व पक्षाच्या हिताचा नर्णय केला आहे. मोहन जोशी यांना पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून राहुल गांधी यांनी एक चांगला संदेश दिला आहे. चंद्रपूर व नांदेडसारख्या महत्त्वाच्या जागांवर काँग्रसने भरपूर घोळ घातला होता. अहमदनगरची जागा लढवण्याची अनाठायी जिद्द धरून काँग्रेसने शरद पवारांना दुखावले होते. अखेर तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंडाचे निशाणच फडकावले. पुण्याच्या बाबतीतही काँग्रेसेचे तळ्यातमळ्यात सुरू होते. उमेदवाराचा पत्ता नाही आणि कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीपुढे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा अभूतपूर्व प्रकारही पुण्यात करून दाखवला!
औरंगाबादप्रमाणेच पुण्याची जागाही काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडावी असा पवारांचा आग्रह होता. पुण्याची जागा जरी काँग्रेसलाच लढवायची असली तरी उमेदवार कोण असावे हे पवारांना ठरवू द्यावे असाही एक प्रस्ताव चर्चेत होता. शरद पवारांनी दोघा संभाव्य उमेदवारांसह दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांच्या गाठीभेटीदेखील घेतल्या होत्या. पण अखेरीस राहुल गांधी यांनी राजकीय शहाणपण दाखवले आणि पुण्यातून मोहन जोशींचे नाव मुकर्रर केले. त्याआधी तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर व संभाजी ब्रिगेडचे माजी प्रमुख प्रवीण गायकवाड यांचीही नावे पुढे केली जात होती. गायकवाड यांनी शरद पवारांच्या भेटीगाठी आधी घेतल्या होत्या आणि नंतर ते काँग्रेसमध्ये रीतसर दाखल झाले होते. या हालचालीही निरिक्षकांच्या नजरेमधून सुटल्या नव्हत्या.
काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना तो कोणत्या जातीचा आहे, त्याला कोणत्या अन्य समाजांचा पठिंबा लाभेल याचा विचार आधी केला जातो. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे नाव जेव्हा भाजपाच्या उमेदवारीसाठी पुढे होते तेव्हा काँग्रेसमधून मराठा समाजाच्या उमेदवाराचाच विचार प्राधान्याने सुरू होता. त्यावेळी गायकवाडांचे नाव पुढे आले. एखाद्या कलावंताला पुण्याची उमेदवार देणे हे पुण्याच्या सासंकृतिक राजधानी या बिरूदाला कदाचित साजेसे ठरले असते. पण एखाद्या तमाशा कलावंताला पुण्याचा मध्यमवर्गीय ब्राह्मणबहुल मतदार स्वीकारणार नाहीत हा विचार पुढे आला असावा. त्यामुळे पुणेकर ताईंचे नाव मागे पडले. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार शिरोळेंच्या ऐवजी देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री गिरीश बापट यांचे नाव नक्की केले तेव्हा बहुधा काँग्रेसने ब्राह्मण समाजातील उमेदवाराचा शोध सुरू केला असावा. पण नाव जोशी असले तरी हे मोहन जोशी मारवाडी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
तसे ते हरिजन सेवा संघ या थेट महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांना खेळातही रूची आहे. टेनीस पद्धतीचा पण रबरी रिंगच्या सहाय्याने खेळला जाणारा टेनीकॉईट या खेळाच्या राज्य संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असणारे मोहन जोशी हे 2008 ते 2014 या काळात राज्य विधान परिषदेचे सदस्य होते. त्याआधी 1999 मध्ये त्यांनी याच पुणे मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सव्वा दोन लाख मतेही घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते विठ्ठल तुपे. या दोघांच्या कडव्या लढतीमध्ये भाजपाचे प्रदीप रावत यांनी ती जागा आरामात जिंकली होती. पण नंतरच्या दोन्ही निवडणुका मात्र, 2004 व 2009 मध्ये, सुरेश कलमाडी यांनी काँग्रेससाठी जिंकल्या. पण या दोन्ही वेळा त्यांचे मताधिक्य कमी कमी होताना जाणवले होते. 2004 मध्ये कलमाडींनी रावत यांचा पराभव 73 हजार मतांनी केला तर 2009 मध्ये त्यांनी अनिल शिरोळेंना 25 हजार मतांनी हरवलले होते. 2014 मध्ये विश्वजीत कदमांनी शिरोळेंशी लढत दिली. त्यात शिरोळे मोदी लाटेत तीन लाखांच्या मताधिक्याने जिंकले.
काँग्रेसकडे तिथे परंपरागत मते आहेत ही गोष्ट मोहन जोशींसाठी महत्त्वाची आहे. सध्या मात्र भारतीय जनता पक्षाचे पूर्ण वर्चस्व पुण्यावर आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा सोबतच होती. तेव्हा शिरोळे यांना पाच लाख 69 हजार मते पडली होती तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीतील उमेदवार कदमांना अडीच लाख मते पडली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा राज्यातील चारही महत्वा ाचे पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा पुण्यात भाजपाचा जोरदार विजय झाला होता. विधानसभेची एकही जागा ना शिवसेनेला जिंकता आली, ना काँग्रेस वा राष्ट्रवादीला मिळाली. पुणे लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला जवळपास साडे चार लाख इतकी मते पडली होती. शिवसेनेला दीड-पावणेदोन लाख मते होती. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 लाख 46 हजार तर काँग्रेसला 1 लाख 44 हजार अशी मते होती. याचा अर्थ तिथे काँग्रेस क्रमांक चारवर राहिली होती. नंतर झालेल्या महानगरपालिकेतही भारतीय जनता पक्षाचाच झेंडा जोरात फडकला होता. तरी त्या वेळेस पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपाचे पुण्यातीलच स्थानिक राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी जोरदार विरोध केला होता. अंतर्गत वादाचा व बंडाचा धोका भाजपाला होता. तरीही पुणे मनपावर भाजपाच झेंडा फडकला.
या निवडणुकीवेळीही संजय काकडे हे बंडाच्या पवित्र्यात फिरत होते. त्यांनी शरद पवारांच्या व काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. राष्ट्रवादीकडून पुण्याची उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता. पण ते नंतर थंड पडले. एकंदरीत मोहन जोशींसाठी ही एक विषम लढाई बनलेली आहे. पुण्यातील काँग्रेसची पारंपारिक मते नक्कीच आहेत आणि ती भाजपाच्या गेल्या पाच वर्षांतील वाढत्या आक्रमाणानंतरही कायम आहेत. तोच एक काय तो दिलासा मोहनभाईंना आहे! त्यांच्यासोबत पुण्यातील जुनेजाणते काँग्रेस नेते उल्हासदादा पवार असतील का हा एक सवाल तयार झाला आहे. उल्हासदादा म्हणजे काँग्रेसच्या व एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा चालताबोलता संदर्भग्रंथ आहेत. त्यांच्याकडे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, ग. दि. माडगुळकरांपासून ते इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून अनेक नेत्यांच्या अफलातून आठवणींचा खजिना आहे. उत्तम वक्तृत्व व कर्तृत् त्वव नेतृत्त्व असूनही विलासराव देशमुखांसारखा जिवश्चकंठश्च मित्र काळाच्या पडद्याआड गेल्यापासून उल्हासदादा काँग्रेसमध्ये एकटे पडल्यासारखे झाले. त्यांना प्रांताध्यक्ष अशोक चव्हाणांची पुरेशी साथ नाही. त्यांचेही नाव पक्षात पुण्यासाठी काही काळ चर्चेत होते. पण प्रांताध्यक्षांनी ते पुढे रेटले नाही आणि दिल्लीत तिकिटाची याचना करा असा दादांचा स्वभाव नाही. त्यामुळे ते याहीवेळी डावलले गेले.
बापटांच्या समोर उभा करण्यासारखा एक ब्रह्मण उमेदवार काँग्रेसकडे नक्कीच होता. अनंत गाडगीळ. जुन्या पुणेकरांच्या व जुन्या पुणेकर काँग्रेसजनांच्या चांगले परिचयाचे व हक्काचे असे हे नाव आहे. तीन वेळा सलग पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या विठ्ठलराव गाडगीळांचा समर्थ वारसा सांभाळणारे अनंतराव हे अतिशय उच्च विद्याविभूषित व इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असणारे असे नेते आहेत. ते सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे आयटी हब असणाऱ्या आधुनिक पुण्याशी काँग्रेसचा संवाद एका निराळ्या स्तरावर होऊ शकला असता. पण विधान परिषद सभागृहातील बहुमताचे गणित काँग्रेसला गमवायचे नव्हते. त्यामुळे अनंतरावांचे नाव मागे पडले असावे. पण काँग्रेसने जे नाव दिले आहे तेही जोरदार व पक्षाच्या निष्ठावंतांच्या मनासारखे आहे. मात्र त्यांच्यापुढे एक तगडी लढाई उभी आहे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी