Details
डॉ. आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव!
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
भारताला १५ ऑगस्ट१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मुस्लिमांसाठी पाकिस्तान आणि हिंदुंसाठी हिंदुस्थान अशी भारताची फाळणी झाली. त्यानंतर घटना समितीने घटनेचा मसुदा तयार करून तो राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केला आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून अवघ्या विश्वासमोर ओळखले जातात. परंतु याच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने १९५२ सालच्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत आणि १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा काँग्रेसने पराभव केल्यानंतर त्यांना खरे पाहता बाबासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचे मित्र डॉ. पुरूषोत्तम उर्फ राजू पाटोदकर हे सध्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अधिपत्याखाली प्रसार माध्यम कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी एक निवडणूक पूर्वपीठिका प्रकाशित केली आहे. यामध्ये १९५२ सालापासूनची महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिली आहे. त्यातील पान क्रमांक ३९ अनुसार १९५२ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघात एकूण आठ उमेदवार उभे होते. त्यापैकी काँग्रेसचे विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांना १ लाख ४९ हजार १३८, समाजवादी पक्षाचे अशोक रणजितराम महेता यांना १ लाख ३९ हजार ७४१, काँग्रेसच्या नारायण सदोबा काजरोळकर यांना १ लाख ३८ हजार १३७ आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भीमराव रामजी आंबेडकर यांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली. या मतदारसंघात भाई श्रीपाद अमृत डांगे, गोपाळराव विनायक देशमुख, केशव बाळकृष्ण जोशी, नीलकंठ बाबुराव परूळेकर हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. भाई डांगे यांनाही ९६ हजार ७५५ मते मिळाली होती. १९५२ च्या या निवडणुकीत सर्वसाधारण आणि राखीव या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते.
१९५४ साली भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा मुंबईत पराभूत झालेले अशोक महेता हे समाजवादी पक्षाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेड्युल कास्ट फेडरेशनतर्फे उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक महेता यांच्या प्रचारासाठी जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आले होते. या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा ८ हजार ३३१ मतांनी पराभव झाला. अशोक महेता निवडून आले. बाबासाहेबांचा पराभव करणारे उमेदवार काँग्रेसचे होते. पण काँग्रेसचा एक उमेदवार महेतांनी पराभूत केला होता. राजकीय विश्लेषक सुहास सोनावणे यांनी ही माहिती एका लेखात दिली असून त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप खोडून काढत अलौकिक नीतिमत्तेमुळेच बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्याचे नमूद केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काँग्रेस पक्ष म्हणजे जळकं घर असल्याचे सांगितले होते.
१९९८ सालची ही ‘नीळाई’ शेवटचीच?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. त्यानंतर आज इतक्या वर्षांनी रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आज रिपब्लिकन पक्षाचे किती वेगवेगळे पक्ष आहेत, किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून किती नेते पक्ष चालवताहेत याची मोजदाद नाही. प्रत्येक पक्षाचा वापर राष्ट्रीय पक्ष करून घेतोय. प्रत्येक वेळी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर आली की ऐक्याच्या गुळगुळीत बातम्या वाचायला मिळतात. “ऐक्यवादी पक्षाचे नेतृत्त्व प्रकाश आंबेडकर जर करणार असतील तर मी मंत्रीपद सोडेन”, ही घोषणा रामदास आठवले यांनी बऱ्याच वेळा केली. पण आंबेडकर ऐकायला तयार नाहीत. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य व्हावे म्हणून नऊ तरूणांनी आमरण उपोषण केले होते आणि त्याची परिणती म्हणून १९९८ साली रामदास आठवले उत्तर-मध्य मुंबईतून, रा. सु. गवई अमरावतीमधून, प्रा. जोगेंद्र कवाडे चिमूर मतदारसंघातून आणि प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. एकाचवेळी आंबेडकरी विचारधारेचे किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणविणारे चार-चार खासदार निवडून येणे हा खरोखरच एक चमत्कार मतदारांनी घडवून आणला होता. पण हा आनंद क्षणिक ठरला. १९९९ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुन्हा चार खासदार चार दिशेला निघून गेले. आज ते उपोषण करणारे नऊ तरुण कुठे आहेत याची कुणालाही कल्पना नाही.
रा. सु. गवई यांचे देहावसान झाले. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी राज्यपालपदापर्यंत वाटचाल केली. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई काँग्रेस आघाडीत आहेत, पण ते निवडणुकीच्या मैदानात नाहीत. प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ओवेसी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी वंचित आघाडी बनविली आहे. निश्चित कुणाला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी ते धडपडताहेत त्यांचे त्यांनाच माहित. रामदास आठवले मोदी-फडणवीस-ठाकरे यांच्याबरोबर महायुतीच्या माध्यमातून फड गाजवताहेत. त्र्यंबक मारूती कांबळे उर्फ टी. एम. कांबळे, समाधान नावकर, जोगेंद्र व जयदीप कवाडे यांचे पक्षही कुणाच्या न् कुणाच्या भरोबर आहेत. आम्ही निवडून आलो नाही तरी आम्ही कुणाला तरी पाडू शकतो, अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे. आमचा प्रत्येक राष्ट्रीय पक्ष हा निव्वळ लोणच्यासारखा तोंडी लावणं म्हणून वापर करून घेतोय, हेही कुणाच्या लक्षात येतेय का कुणास ठाऊक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आटापिटा चाललाय. ते प्रत्यक्षात केव्हा येईल याचा अंदाज नाही.
सकाळी उठले की प्रत्येक नेता शाहू, फुले, आंबेडकर या नांवाची जपमाळ ओढायला सुरूवात करतो आणि काही जण संध्याकाळी आपटे, आगाशे, डहाणूकर यांच्या कट्ट्यावर जाऊन बसतात. १९९८ साली एकाचवेळी निवडून आलेले चार खासदार हा केवळ इतिहास राहणार की ही संसदेतली ‘नीळाई’ भविष्यात वाढणार हे रिपब्लिकन नेत्यांवर अवलंबून आहे. रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख, प्रा. ज. वि. पवार आदी नेत्यांना चर्चा करून एक मजबूत पर्याय उभा करता येऊ शकेल. चार-दोन तुकड्यांऐवजी घसघशीत वाटा सत्ताधारी पक्षांकडून मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ कधी दाखविणार? यासाठी आंबेडकरी जनतेने रेटा लावायला काय हरकत आहे?
इंजिनानं भल्याभल्या नेत्यांना घरी धाडले!
भारत परीसिमन आयोग अर्थात भारतातील लोकसभा आणि विधानसभा यांच्या मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नवीन मतदारसंघाप्रमाणे झाल्या. महाराष्ट्रात २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण बदलले होते. शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, अगदी मुख्यमंत्री पद बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्यानंतरही महत्त्वाकांक्षा वाढत गेलेल्या नारायण राणे यांनी २००५ साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते काँग्रेसवासी झाले तर शिवसेनारूपी गाडी कुणी चालवायची या वादातून स्वरराज श्रीकांत उर्फ राज ठाकरे यांनी आपले इंजिन वेगळे काढले. २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. २००७ च्या मुंबई महापालिका आणि त्यानंतर २००९ साली लोकसभा निवडणुका शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी समोरासमोर लढविल्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना घरी पाठविले. आपण निवडून येऊ शकत नाही पण पाडू शकतो हे राज ठाकरे यांनी कल्याण वगळता मुंबई, ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक येथे दाखवून दिले. परप्रांतीय मुद्द्यावर कल्याण येथे रेल्वे भरती प्रकरणावरून स्टेशनवर मनसैनिकांनी उत्तर भारतीय मुलांना फटकवून काढले असतानाही मनसेच्या वैशाली दरेकर यांच्यासह विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी पराभव केला.
संसदीय कारकिर्दीचा प्रचंड अनुभव असलेल्या राम नाईक यांना २००४ नंतर २००९ मध्ये सलग दुसऱ्यांदा उत्तर मुंबई मतदारसंघात पराभवाचा ‘सामना’ करावा लागला. पण यावेळी मनसेच्या शिरीष पारकर यांनी तब्बल १ लाख ४७ हजार ५०२ एवढी मते खाल्ल्यामुळे काँग्रेसचे संजय निरूपम लोकसभेवर निवडून गेले. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचा लोकसभेचा मार्ग मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी रोखला आणि काँग्रेसचे गुरूदास कामत ईशान्य मुंबईतून वायव्य मुंबईत येऊनही संसदेत पोहोचले. उत्तर-मध्य मुंबई हा मुंबई शहरातून उपनगराकडे सरकलेला मतदारसंघ तसा अभिनेते आणि शांतीदूत सुनील दत्त यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. त्यामुळे मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि भाजपच्या महेश राम जेठमलानी या दोघांच्या मतांची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ३,१९,३५२ मते मिळवून प्रिया दत्त खासदार बनल्या. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात मनसेच्या श्वेता परूळेकर यांच्यामुळे शिवसेनेचे सुरेश गंभीर खासदार होऊ शकले नाहीत. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संसदेत जाण्याची संधी मिळाली.
दक्षिण मुंबई मतदारसंघात तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी चक्क दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आणि मोहन रावले यांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आणि मुरलीपुत्र मिलिंद देवरा खासदार झाले. ईशान्य मुंबई मतदारसंघात मनसेच्या शिशिर शिंदे यांच्यामुळे भाजपच्या किरीट सोमैया यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील खासदार झाले. असाच निकाल ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक येथेही लागला आणि मनसेचे उमेदवार निवडून जरी आले नाहीत तरी त्यांनी शिवसेना, भाजपच्या नेत्यांसाठी दिल्ली दरवाजा बंद करण्याचे कार्य २००९ साली केले. आताही ‘यार्ड’मध्ये असलेल्या ‘इंजिना’ धसका सत्ताधाऱ्यांना आणि दिलासा विरोधकांना मिळाला आहे. इंजिनाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच ‘इंजिन’ काही वर्षापूर्वी डॉ. मनोहर जोशी यांनी दादरच्या एका मतदारसंघात निवडणूक चिन्ह म्हणून घेतले होते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंजिनावर शिक्का मारा, असे आवाहन मतदारांना केले होते.
एकनाथ गायकवाड यांनी परंपरा मोडली!
मुंबई शहर आणि उपनगर मिळून लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात. मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी मुंबई शहरात तीन आणि मुंबई उपनगरात तीन असे मतदारसंघ होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबई असे दोन तर उत्तर-मध्य, उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व आणि उत्तर मुंबई असे चार म्हणजेच दक्षिण शहरात तर उत्तर उपनगरात असे सरळसरळ दोन भाग झाले. १९७७ सालापासून मध्य मुंबईकडे पाहिले तर त्यात एक मतदारसंघ असा आपल्याला आढळून येतो की त्या मतदारसंघात एक व्यक्ती दुसऱ्यांदा या मतदारसंघाने लोकसभेवर निवडून पाठविलेली नाही. केवळ एकच व्यक्ती दुसऱ्यांदा निवडून आली ती म्हणजे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड.. एकनाथ गायकवाड मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी २००४ साली डॉ. मनोहर जोशी यांचा पराभव करून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांचा मतदारसंघ होता उत्तर-मध्य मुंबई. आणि मग मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले. परंतु २०१४ साली शिवसेनेचे राहुल शेवाळे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार झाले.
१९७७ सालापासून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्या रांगणेकर (१९७७-१९८०), जनता पक्षाच्या प्रमिला दंडवते (१९८०-१९८४), काँग्रेसचे शरद दिघे (१९८४-१९८९), शिवसेनेचे विद्याधर गोखले (१९९८९-१९९१), पुन्हा काँग्रेसचे शरद दिघे (१९९१-१९९६), शिवसेनेचे नारायण आठवले (१९९६-१९९८), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले (१९९८-१९९९), शिवसेनेचे डॉ. मनोहर जोशी (१९९९-२००४), काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२००४-२००९), काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२००९-२०१४), शिवसेनेचे राहुल शेवाळे (२०१४-२०१९) असे खासदार मध्य मुंबईमधून लाभले आहेत. पाहूया आता राहुल शेवाळे एकनाथ गायकवाड यांची बरोबरी करतात की एकनाथ गायकवाड हे त्रिविक्रमी होतात. यासाठी आपल्याला २३ मेपर्यंत थांबावे लागेल.”
“योगेश वसंत त्रिवेदी