HomeArchiveमोदी, शाह आणि...

मोदी, शाह आणि फडणवीस!

Details
“मोदी, शाह आणि फडणवीस!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आणि अभूतपूर्व असे आहेत. 2014 साली देशात काँग्रेसविरोधी प्रचंड राग होता. त्या रागाचे रूपांतर भाजपला केंद्रात सत्ता मिळण्यात झाले. भाजपला त्यावेळी अवघी 31 टक्के मते मिळाली होती. पण तरीही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वबळावर केंद्रात भाजपचे सरकार आले. यावेळी कोणाचीही लाट दिसत नव्हती. काँग्रेसने मोदी यांच्याविरूद्ध घणाघाती हल्ले सुरू ठेवले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर `चौकीदार चोर है।’ ही घोषणाच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली होती. पण तीच घोषणा काँग्रेसवर उलटली. देशाच्या पंतप्रधानाला चोर म्हणणे लोकांच्या पचनी पडले नाही. त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने डोके शांत ठेवून रणनीती ठरविली.

गेल्या डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये भाजपच्या हातातून निसटली. त्याचवेळी मोदी-शाह सावध झाले. त्यांनी मित्रपक्षांच्या सहकार्याचे महत्त्व ओळखले. त्यातूनच शिवसेनेसारखे दुरावलेले मित्रपक्ष पुन्हा भाजपने जवळ केले. येथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की, काँग्रेसमध्ये सदैव Loyalty (निष्ठा) लक्षात घेतली जाते. तर भाजपमध्ये Utility (उपयुक्तता) पाहिली जाते. कोणत्याही विजयात यश मिळविण्यासाठी निष्ठेपेक्षा उपयुक्तता महत्त्वाची ठरते. भाजपने देशभर अशी उपयुक्तता पाहून मित्रपक्ष जोडले आणि आपले उमेदवार उभे केले. पण काँग्रेसने मात्र अनेक ठिकाणी जुने आणि वयोवृद्ध चेहरे केवळ निष्ठेच्या निकषावर उभे केले. त्यांना जनतेने नाकारले.

मित्रपक्ष जोडण्यातदेखील काँग्रेस अपयशी ठरली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम, उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी यांच्याशी काँग्रेसची अखेरपर्यंत आघाडी होऊ शकली नाही. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला वश करण्यातदेखील काँग्रेसला अपयश आले. परिणामी, देशभरातून काँग्रेस फक्त चार राज्यांपुरती मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र कालच्या निवडणुकीत दिसले. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. दिग्विजय सिंह, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, सुशिलकुमार शिंदे यांच्यासारख्या मान्यवरांना पराभवाचे कडू घोट गिळावे लागले. काँग्रेसच्या या दारूण पराभवात मोदी आणि शाह यांची हिशेबी रणनीती कामी आली. मित्रपक्ष जोडण्याचे त्यांचे धोरण यशस्वी ठरले.
फडणवीस यांचे यश

महाराष्ट्रात युतीने 48 पैकी 41 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. 2014 मध्ये भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. पण यावेळी भाजपने 25 जागा लढविल्या आणि मोठे यश मिळविले. 1998 साली शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन 38 जागा जिंकल्या होत्या. तो विक्रम मोडण्याचे काम फडणवीस यांनी करून दाखविले. 2012 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रात पक्षाची कमान वाढतच राहिली आहे. विधानसभेत भाजपचे 46 आमदार होते. 2014 साली ती संख्या 122 वर गेली. अनेक पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांत भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला. या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपचे तब्बल 1000 लोकप्रतिनिधी निवडून आले. 27 पैकी 15 महापालिकांवर भाजपने आपला झेंडा रोवला.

गेली चार-साडेचार वर्षे भाजप आणि शिवसेनेचे विळा-भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. शिवसेनेशी युती करण्यास अनेक भाजप नेत्यांनी विरोध केला होता. त्यात किरीट सोमैय्या आघाडीवर होते. पण शिवसेनेचे महत्त्व ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी सेनेशी युती तर केलीच, पण 1 जागा सेनेला जास्तदेखील दिली. उद्धव ठाकरेंनी सोमैय्यांना विरोध करताच किरीट सोमैय्यांचे तिकीट कापले. दरम्यान, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांमधील असंतोष यासारख्या प्रश्नांचा त्यांनी धीरोदत्तपणे सामना केला. सारांश, केंद्रात मोदी-शाह आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे एनडीएच्या यशाचे शिल्पकार ठरले.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content