Details
अस्वस्थ होण्यास कारण की..
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
१७ व्या लोकसभेच्या निकालाचे वर्णन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनाकलनीय असे केले होते. अनेकांनी तर या निकालाचे विश्लेषणच केलेले नाही. २३ मे रोजी आणि त्याआधीही विविध वृत्तवाहिन्यांवर आपल्या ज्ञानाची, विशेष निरीक्षणांची पाणपोई उघडून बसलेले कितीतरी जण तर गायबच झाले आहेत. (याबद्दल मोदी-भाजपा किंवा भाजपा-मोदी असा क्रम लावून समर्थकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. त्या शेरेबाजीचाच हा आशय आहे. मोदी १०३ जागांच्या पुढे जाणार नाहीत असे दुपारपर्यंत सांगणारा एक टकला चश्मिष्ट नंतर जो गायब झाला तो अजून दिसलेला नाही, अशीही एक कॉमेन्ट या धुळवडीत होती.) असो. अनेक स्वयंघोषित तज्ज्ञांनी शहामृगाप्रमाणे वाळूत माना खुपसून घेतल्या आहेत हे तर दिसते आहेच. त्याचबरोबर निकालाआधी जी धुळवड काही दिवस रंगली होती त्यात हिरीरीने भाजपा आणि मोदी यांची बाजू मांडणाऱ्या समर्थकांनी निकालापश्चात ध्वज विजयाचा उंच धरा रे.. या आवेशात आता रणांगण काबीज केले आहे.
हे काही दिवस सुरूच राहील. पण त्यापेक्षाही निकालानंतर जो वाद-संवाद, चर्चा, विश्लेषण ज्या तटस्थपणे घडून यायला हवे होते तसे दिसत नाहीय हे अधिक अस्वस्थ कऱणारे आहे. ज्या मोजक्या काहीजणांनी निकालांचा अर्थ लावला आहे त्यांनी आपापल्या चष्म्यातून, पूर्वनिश्चित फ्रेममधून या निकालांकडे पाहत भाष्य केले आहे. एक्झिट पोलचे ज्याचे अंदाज प्रचंड फरकाने चुकले आहेत तेही काही बोलायचे जणू विसरून गेले आहेत. इव्हीएमच्या घोळाबाबत बोलणारे, शंका व्यक्त करणारे गप्प झाले आहेत. राफेलचा विषय जणू विस्मरणात गेलाय, त्याविषयी बोलणारे गप्प झाले आहेत. पराभवानंतर विरोधी पक्षांनी, राजकीय ज्येष्ठ-श्रेष्ठांनी जणू माना टाकल्या आहेत. भाजपाने एकहाती बहुमत मिळवत विरोधी पक्षांना जबरदस्त धोबीपछाड दिल्यापासून भाजपा विरोधकांना जणू थोबाडीत बसल्यासारखे वातावरण आहे. पराभव होतच असतात पण, त्याच पराभवातून उसळी मारून उभे राहयचे असते, पुन्हा संघर्षासाठी सज्ज व्हायचे असते, भिडायचे असते हेही जणू संबंधित विसरून गेले आहेत.
निकालानंतर थोडीफार कुरबुर सोशल मीडियावर झाली. सात मतदारसंघांत भाजपा उमेदवारांचे मतदानाचे आकडे एका विशिष्ट् टप्प्यावर अगदी तंतोतंत सारखे कसे? इतक्या जागा मिळाल्या, लोकांनी त्यांच्या पसंतीचे सरकार निवडून दिले तर जल्लोष, उत्साह फक्त भाजपा कार्यालयांतच कसा? जनतेत कसा उत्साह दिसला नाही, रस्त्यारस्त्यांवर कसा जल्लोष, मिरवणुका निघालेल्या दिसल्या नाहीत, असे प्रश्नही विचारले गेले. या सगळ्याची शहानिशा झालेली नाही, विरोधी पक्षांनीही त्याचा पाठपुरावा करण्याची इच्छाशक्ती दाखवलेली नाही. केवळ प्रश्न विचारून चालत नाही, त्याचा पाठपुरावा करायला लागतो, खरेखोटे व्हायला लागते. ते सारे कुठेच घडताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रश्नही चर्चेतून जवळपास बादच झाले आहेत. सोशल मीडियावरील चर्चा आणि उपस्थित होणारे प्रश्न, व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील तपशील अनेकदा हवेतील गोळीबार असतो. त्यामुळे आपल्याकडे तरी अद्याप सोशल मीडियावरील चर्चेला पुरेशा गांभीर्याने घेतले जात नाही. अनेकदा या चर्चेला निव्वळ चिखलफेकीचेच स्वरूप येत असते. त्यातून सत्य वा वास्तव समोर येतेच असेही घडत नाही. यामुळेच हे प्रश्न मागे पडले असावेत का हाही विचारात घ्यायला हवा असा मुद्दा आहे.
असे असले तरी, जल्लोष फक्त भाजपा कार्यालयात झाला, लोकांत उत्साह दिसत नाही, लोकच भाजपा कशी बहुमतात आली याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत, या म्हणण्याचे खंडन करणारा एक परिस्थितीजन्य मुद्दा आपोआप समोर येतो. तो म्हणजे जर लोकांमध्ये संभ्रम असेल, आश्चर्य असेल तर तसा आवाजही ठामपणे समोर आलेला नाही, उत्सव, उत्साह दिसत नाही हे म्हणणे प्रथमदर्शनी खरे वाटले तरी मग लोकांकडून विरोधी प्रतिक्रियाही उमटलेल्या नाहीत, आम्ही भाजपाला मते दिलेलीच नाहीत, असा आवाजही उठलेला नाही. जनता एकदम चूप आहे. जनता जर चूप असेल तर मग जनता अस्वस्थ आहे का, हेही शोधावे लागेल. भाजपा आणि नरेंद्र मोदी नव्या सरकारच्या स्थापनेच्या प्रक्रियेत मग्न आहेत. नव्या सरकारचा, मोदींचा अजेंडा नेमका काय असेल? याबाबत विचारवंत, विश्लेषक, पत्रकार या सगळ्यांमध्ये साशंकता आहे. विश्वंभर चौधरी यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना लोकशाहीच्या काही घटकांचा संकोच होऊ शकतो अशा आशयाची चिंता व्यक्त केली आहे.
रोजचे जगण्याचे प्रश्न मागे सारून राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्व हे मुद्दे प्रभावीपणे समोर आणून भाजपाने जनमत फिरवले. स्थानिक प्रश्न, समाजातील अनेक घटकांची कथित नाराजी सारे काही या बुद्धिबळात मागे पडले, असा एक मतप्रवाह समोर आला आहे. तोही अस्वस्थ घटकांकडूनच आला आहे. ज्यांनी हे सरकार निवडून दिले त्या मतदारांनी मात्र, मध्यमवर्गाला ज्या मला काय त्याचे.. अशा वृत्तीबद्दल नावे ठेवली जातात, त्याच प्रकारची, आम्ही सरकार निवडून दिले, आता काय ते भाजपाने आणि मोदीने पाहून घ्यावे, अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मतदानाचे कर्तव्य तर उरकले अशा आविर्भावात बहुसंख्यांनी असे पाठ फिरवणे अस्वस्थ करणारेच आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा देश आता उघडपणे आक्रमक हिंदुत्ववाद जोपासू पाहातो आहे याचीही अस्वस्थता अर्थात अनेक घटकांना आहेच. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या निकालाचे पडसाद उमटले होतेच. ब्रिटन, अमेरिकेतील काही नियतकालिकांनी, हिंदू राष्ट्रवाद आणि धार्मिक राजकारण या भारतातील नव्या समीकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण लोकशाही मानणाऱ्या या देशांत बहुमताचा कौल मिळवून भाजपाचे नवे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला त्याचा प्राधान्यक्रम मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा. यापुढे काय होईल, काय घडेल याबद्दल सध्या तरी चित्र अस्पष्ट आहे. अस्वस्थ करणारे मुद्दे आणि घडामोडी याबद्दल चिंता व्यक्त करताना हेदेखील लक्षात घ्यायला हवे.”
“शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार