Details
निधीबाईंना न झेपलेला मुन्नाभाई!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तिमत्वाने स्वातंत्र्यपूर्व काळात तर देशाच्या समाजमनाला मोहिनी घातलीच होती. पण ते गेल्यानंतर आता सत्तर वर्षांनीही त्यांचे गारूड कायम आहे. ते हयात होते तेंव्हाही महात्मा गांधींच्या नावाने बोटे मोडणारे पुष्कळ होते. आयुष्यात त्यांनी उपेक्षा आणि उपहास नेहमीच सहन केला. त्यांचे कडवे पाठिराखेही गांधीजींच्या साधेपणा, स्वच्छता आणि साधनशुचितेच्या अतिरेकी आग्रहांना कधीकधी वैतागत होते. पं. नेहरू असतील, सरदार वल्ल्भभाई पटेल असतील, गांधींच्या कडव्या पाठिराख्यांनाही महात्म्यांच्या आज्ञांचे पालन सतत करणे जमले नाही, हा इतिहास आहे. त्यांना समजून घेणे, पचवणे अवघडच होते. त्यामुळेच त्यांच्या धोरणांचा टोकाचा धिक्कार करणाऱ्या कथित हिंदुत्ववाद्याच्या गोळ्या त्यांना खाव्या लागल्या.
नथुराम गोडसे हा माथेफिरूच होता. त्याच्या आततायी कृत्याने महात्मा गांधींचा शारीरिक बळी नक्कीच गेला. पण गांधींचा विचार मारणे हे त्या नथुरामाला आणि नंतरच्या त्याच्या वैचारिक वारसांनाही शक्य झाले नाही. गांधींच्या विचारांचा प्रखर विरोध करणाऱ्या कोणालाही गांधींचा विचार संपवणे अशक्य ठरले. हीच त्यांची महत्ती आहे. गांधींच्या विचारांचा आदर्श घेऊन जागात अनेक ठिकाणी स्वातंत्र्याच्या, मानव मुक्तीच्या चळवळी लढवल्या गेल्या. ज्या दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी सर्वात प्रथम ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले, त्या दक्षिण आफ्रिकेतील मानव मुक्तीची चळवळ नेल्सन मंडेलांनी गांधींच्या आदर्शानुसार पुढे नेली आणि त्या देशालाही ब्रिटिश जोखडातून व गुलामगिरीतून मुक्त केले. महात्मा गांधींच्या विचारांचा द्वेष करणाऱ्यांच्या पिढ्या निपजल्या आणि खपल्या. पण गांधी विचार आहे तिथेच आहे. आजही कित्येक तरूणांच्या राजकारणाला गांधीजी प्रेरक ठरत आहेत. विख्यात सिने दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी महात्मा गांधींचे आजच्या युगातील महत्त्व अधोरेखित करणारा उत्तम सिनेमा तयार केला: “लगे रहो मुन्नाभाई!” ज्यांनी महात्मा गांधींना प्रत्यक्ष पाहिले ऐकले नाही अशा लाखो लोकांना नवी प्रेरणा व ऊर्जा देण्याचेही काम या सिनेमाने केले असे म्हणणे उचित ठरावे.
महात्मा गांधींचा भीषण खून त्या माथेफिरूने केला त्यानंतर दहा-बारा वर्षांनंतर जन्मलेली मंडळीही आता साठीत पोहोचलेली आहेत. आजच्या आपल्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींना प्रत्यक्षात पाहिलेले ऐकलेले कोणीही कार्यरत नाहीत. अगदी वृद्ध व ऐशीच्या घरात पोहोचलेल्या नेत्यांनीही कदाचित आपल्या बाळपणी थोडेफार गांधी पाहिले ऐकले असण्याची शक्यता आहे. सध्याचे आपले पंतप्रधान अशा गांधींनंतरच्या राजकीय पीढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याही अनेक कृतींची प्रेरणा आजही गांधी विचार ठरतो आहे हे अत्यंत लक्षणीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये देशाला उद्देश्यून पहिले भाषण लाल किल्ल्यावरून केले. त्यातही त्यांनी म. गांधींच्या विचारांतून स्वच्छ भारत, हागणदारीमुक्त भारत ही संकल्पना मांडली होती आणि अलिकडेच सत्ता स्वीकारावेळी रालोआच्या खासदारांशी बोलतानाही त्यांनी गांधींचा अनेकदा उल्लेख केला. अशा मोदींच्याच पक्षातील काही उपटसुंभ मंडळी गांधींच्या विचारांवर चिखलफेक करतात. त्यांची अवहेलना करून नथुरामाचे उदात्तीकरण करू पाहतात हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
तरूण पिढीलाही भुरळ घालणाऱ्या मुन्नाभाई सिनेमात एक सुंदर प्रसंग आहे. वृद्धांच्या लहान चमुला प्रोफेसरसाहेब बनलेला मुन्नाभाई गांधी विचार सांगत आहे. एक आजोबा विचारतात की बागेतील गांधींच्या पुतळ्याला एक दगड मारणाऱ्या तरूणाला काय सांगितले पाहिजे? कोणीही म्हणेल की त्याच्या थोबाडीत हाणा! तेच सांगायला मुन्नाभाई सरसावत असताना त्याच्यामागे गांधीजी सांगतात की त्याला म्हणावे की हा पूर्ण पुतळाच तोडून टाक, देशातील माझे सारे पुतळे तोडा, भिंतीवरच्या तसबिरी हटवा, रस्त्यांना दिलेली माझी नावे काढून टाका, जर मला कुठे ठेवायचेच असले तर तुमच्या हृदयात ठेवा. मुन्नाभाईच्या तोंडून गांधी विचार जपण्याचा हा संदेश सिनेमा देतो. आज निधी चौधरींवर ओढवलेला प्रसंग आणि मुन्नाभाई सिनेमातील तो प्रसंग यात सहजच साधर्म्य आहे. “गांधींचे फोटो, पुतळे हटवा”, असे ट्विट मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त निधी चौधरी यांनी केले आणि एकच गदारोळ उडाला. नोटांवरून गांधीजींचा फोटो आणि जगभरातून त्यांचे पुतळे हटविण्याची मागणी करतानाच नथुराम गोडसेचं आभार मानणारं असे ते ट्विट आहे.
टीका झाल्याने चौधरी यांनी ते ट्विट डिलीट करत सारवासारव केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यंनी त्यात लक्ष घातले. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पत्र लिहून चौधरींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने त्यांची बदली मुंबई मनपामधून मंत्रालयात उपसचिव म्हणून करून टाकली. चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. राजस्थानी परिवारातील हुशार विद्यार्थिनी असणाऱ्या चौधरी या प्रशासकीय सेवेच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. त्यांच्या पुढच्या दीर्घसेवेवर या ट्वीटचे सावट नक्कीच राहणार आहे. १७ मे रोजी म्हणजे देशातील सतराव्या लोकसभेची निवडणूक संपण्याच्या टप्प्यावर त्यांचे हे ट्वीट आले. त्याची पार्श्वभूमी ही अर्थातच नथुराम गोडसेची भलावण करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांच्या विधानाची होती. मुन्नाभाई धर्तीवर उपरोधिक पद्धतीचे हे ट्वीट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे त्यांचे नंतरचे खुलासे सांगतात. पण उच्चारातून व्यक्त होणारा उपरोध हा लिखित शब्दातून प्रकट होईलच असे नाही. तेच समाजमाध्यांतील या लिखाणाचे झाले आहे. उपरोधाची भावना असलीच तर ती चौधरींना प्रकट करताच आलेली नाही. सहाजिकच त्यांना अपेक्षित तो परिणाम न होता ती विधाने त्यांच्यावरच जोरदारपणाने उलटली.
प्रज्ञा सिंहांच्या विधानानंतरचे चौधरींचे ट्विट असे होते की ‘महात्मा गांधींची १५० जयंती उत्साहात साजरी करण्याचा हा बरा मार्ग आहे. नोटांवरून गांधीजींचा फोटो हटविण्याची हीच वेळ आहे. जगभरातील गांधीजींचे पुतळे हटविण्यात यावेत, संस्था आणि रस्त्यांना देण्यात आलेली त्यांची नावं हटविण्यात यावीत. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!’ या ट्विटवर नेटकऱ्यांनीही टीकेचा भडिमार केला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की निधीबाईंनी नथुराम गोडसे यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून हे सहन केलं जाणार नाही. चौधरी यांनी काही दिवसातच ते ट्विट डिलीट करताना म्हटले की ‘१७ मे रोजी करण्यात आलेलं ट्विट मी डिलीट केलंय. कारण काही लोकांचा गैरसमज झालाय. २०११ पासून जर या लोकांनी मला फॉलो केलं असतं तर मी गांधीजींचा अनादर करण्याचा विचारही करू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असतं. मी श्रद्धापूर्वक गांधीजींचा आदर करत असून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा आदर करत राहीन.’ पण त्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही असे दिसते. यावरून एकच धडा सर्वांनी घेतला पाहिजे तो हा की समाजमाध्यमांतून व्यक्त होताना त्याची प्रतिक्रिया नेमकी काय येऊ शकले याचा विचार आधी केला पाहिजे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी