HomeArchiveआंबेडकरांना नेमके करायचंय...

आंबेडकरांना नेमके करायचंय काय?..

Details
आंबेडकरांना नेमके करायचंय काय?..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन जगणे ही सोपी गोष्ट नाही. बाबासाहेबांचे नातू या नात्याने प्रकाश आंबेडकरांना त्याची चांगलीच जाणीव असेल. आंबडेकरी विचारांचा वसा आणि त्याला डाव्या विचाराची जोड यातून ते कृतीशील राजकारण करत असतात. महाराष्ट्रातील बहुजनांचे राजकारण पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी अथक परीश्रम केले. त्यासाठी गेली तीन दशके त्यांनी राजकारणातील विविध प्रयोग केले. त्यातील काही अल्पकाळासाठी यशही देऊन गेले. उदाहरणार्थ अकोला जिल्हा त्यांनी ताब्यात ठेवलेला दिसतो. तिथे त्यांनी मागील काळात चार-चार आमदार विधानसभेत निवडून आणून दाखवले होते. त्यांनी भारीप बहुजन हा प्रयोग करून पाहिला व त्यातही मर्यादित यश त्यांना मिळाले. गेल्या वर्ष, दीड वर्षापासून त्यांना राजकारणाची आणखी एक वाट सापडली आहे आणि त्या मार्गाने आपण समाजाला घेऊन पुढे जाऊ शकू असा विश्वास त्यांना वाटत आहे. वंचित बहुजन आघाडी हा प्रयोग त्यांनी सुरू केला आहे आणि त्याला यश लाभते आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

त्या आघाडीतच त्यांचा मूळचा भारतीय रिपब्लिक पक्ष आणि बहुजन आघाडी हे समाविष्ट झाले आहेत. या आघाडीच्या माध्यमांतून प्रकाश आंबेडकरांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत जो चमत्कार घडवला त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकांतही उमटणारच आहेत. पण त्यांना आता हे ठरवायचे आहे की पुढचा रस्ता हा कसा असेल? सर्व विरोधी पक्षांची मदत घेऊन किंवा त्यांना मदत करून पुढे जायचे आहे की पुन्हा एकदा एमआयएम वगळून इतरांना नकारताना एकला चलो रे, हीच भूमिका ठेवायची आहे? प्रकाश आंबेडकरांना नेमके काय करायचे आहे? एक औरंगाबादचा अपवाद वगळता या आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालेले नाही. औरंगाबादमध्येही त्यांचा थेट उमेदवार नव्हता. तर मित्रपक्ष एमआयएमचा उमेदवार आंबेडकरांच्या वंचितच्या मतांची जोड मिळवल्यामुळे विजयी झाला असे म्हणता येईल. पण इतरत्र कुठेही आंबेडकर स्वतः वा त्यांचे उमेदवार विजयी झाले नसले तरीही वंचितमुळेच आम्ही पडलो अशी भावना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन डझन उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात.. सर्वत्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी भरघोस मते मिळवली. पण ही लाखोंच्या संख्येने मिळालेली मते लोकसभेत खासदार पाठवायला पुरेशी नव्हती. तशीच ती मते विधानसभा निवडणुकीसाठीही पुरेशी ठरणार नाहीत. वंचितने कमावलेली मते पुरेशा संख्येने जर असती तर प्रकाश आंबेडकारांना दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यश मिळायला हरकत नव्हती. सोलापुरात आंबेडकरांमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेना पराभव पत्करावा लागला. प्रकाश आंबेडकरांनी अखिल भारतीय इत्तेहादुन मुसलमीन या मुस्लीम कट्टरवादी मानल्या गेलेल्या पक्षाबरोबर निवडणूक आघाडी केली तेव्हा त्यांना मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सेनेच्या माजी मंत्री चंद्रकांत खैरेंना धूळ चारली. यात वंचितपेक्षा एमआयएमच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाले ही बाब आंबेडकरांना विधानसभेच्या वाटाघाटी करताना लक्षात ठेवावी लागणार आहे. पुढच्या चार महिन्यातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी माजणार आहे. वंचित बहुजनचे कार्यकर्ते जोरात आहेत. पण काँग्रेसला थेट नाकारून त्यांना कदाचित चालणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या भक्कम युतीला तोंड द्यायचे आहे.

देवेन्द्र फडणवीस सरकारच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे असेही चित्र दिसत नाही. त्यांना विरोध करायचा तर विरोधी पक्षांना संपूर्ण महाराष्ट्रात एक तितकीच भक्कम फळी उभी करावी लागेल यात शंका नाही. पण ही भूमिका आंबेडकरांना कितपत मान्य आहे? काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बोलण्यावरून त्यांना राजकीय वस्तुस्थितीची जाणीव आहे हे दिसते. तितकीच जाणीव अन्य सर्व नेत्यांना असायला हवी. थोरातांनी सांगितले आहे की, महाराष्ट्रात आंबेडकरांसमवेत तर आघाडी करावीच लागेल. पण, मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा एक समजुतदार विचार आहे. पण आंबेडकरांची अजूनतरी तशी भूमिका दिसत नाही. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी ज्या अल्प वाटाघाटी काँग्रेस नेत्यांसमवेत दिल्लीत व मुंबईत केल्या त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. काँग्रेसने त्यांच्यासाठी चार जागा सोडण्याची तयारी दाखवली तेव्हा आंबेडकरांनी जाहीर केले की नांदेड व बारामती मतदारसंघ वंचितसाठी सोडा. ही मागणी मान्य होणे शक्य नाही हे माहित असूनही मागणी केली गेली. याचाच अर्थ युती करण्यात रस-रूची नाही असा काँग्रेसने लावला असल्यास चूक नाही. आताही तशीच भाषा वंचितने सुरू केली आहे. काँग्रेस पक्षासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही चाळीसपेक्षा अधिक जागा सोडू शकत नाही आणि राष्ट्रवादीबरोबर तर बोलण्याचा प्रश्नच नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसला उडवून लावले आहे.

ते म्हणतात की, काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत निम्म्या मतदारसंघातच उमेदवार उभे केले होते, त्यातही अर्ध्या ठिकाणी त्यांची कोणतीही पक्षयंत्रणा नाही. त्यामुळे काँग्रेसला आम्ही चाळीस जागांची जी ऑफर दिली आहे ती बरोबरच आहे! वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीच असे बोलणे याचाच अर्थ काँग्रेसबरोबरच्या वाटाघाटींचा रस्ता बंद करणे असाच आहे. आंबेडकर असेही म्हणतात की, राज्यात आणि देशात काँग्रेस पक्ष हा डोकं नसलेल्या धडासारखा आहे त्यांच्याशी बोलणी काय करणार? त्यांना जर आमची चाळीस जागांची ऑफर मान्य असेल तर पुढे चर्चा होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही. त्यांच्यापासून चार हात लांब राहणेच योग्य आहे! आम्ही ज्या चाळीस जागा सोडू त्यातून काँग्रेसने हवे तर मित्रपक्षांना जागा सोडाव्यात असाही सल्ला त्यंनी दिला. हे बोलताना आंबेडकर अनेक गोष्टी सोयीस्कररीत्या दुर्लक्षित करतात. काँग्रेसने 24 लोकसभा मतदारसंघ लढवले कारण उरलेले त्यांनी मित्रपक्षांसाठी सोडले होते. प्रदेश काँग्रेसमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष दाखल झाले आहेत व त्यांनी बोलण्यांची प्रक्रिया सुरू केली आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची व आंबेडकरांची अलिकडेच दिल्लीत चर्चा झाली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकादेखील वंचित व एमआयएम यांनी एकत्र लढाव्यात असे या बैठकीत ठरले. दोन्ही पक्षांनी किती जागा लाढवायच्या यापेक्षा जिंकणारे उमेदवारच द्यायचे यावर या दोघांचे एकमत झाले असे म्हणतानाच प्रकाश आंबेडकर हे त्या मित्रपक्षाचे महाराष्ट्राचे नवे अध्यक्ष व औरंगाबादेचे नवे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडेही लक्ष न देण्याची भूमिका घेत आहेत असे जाणवते. वंचितच्या हितासाठी तसे वागणे योग्य ठरणार नाही.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content