HomeArchiveनानांच्या नावाचे रेल्वेला...

नानांच्या नावाचे रेल्वेला वावडे का?

Details
नानांच्या नावाचे रेल्वेला वावडे का?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आज 31 जुलै, 2019. नामदार नाना शंकरशेट यांची आज 154 वी पुण्यतिथी. भारतीय रेल्वेचे जनक म्हणून नाना ओळखले जातात. मुंबईचे आद्य शिल्पकार, शिक्षण तपस्वी, थोर समाजसुधारक अशा विविध रूपात नानांची ओळख करून देता येईल. आशिया खंडातील पहिली रेल्वे 16 एप्रिल, 1953 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. या रेल्वेसाठी नाना शंकरशेट यांनीच पुढाकार घेतला होता. म्हणूनच भारतीय रेल्वेचे जनक असे त्यांना मानाने संबोधिले जाते. इंग्रजांनी भारतीयांवर वर्षानुवर्षे अन्याय केला. त्यांना गुलामीत ठेवले. पण अशा या इंग्रजांनी नानांच्या कार्याचा सदैव गौरव केला. नानांचा सदैव आदर केला.

1908 साली इंग्रज सरकारने मुंबईसाठी प्रथमच एकूण आठ जस्टीस ऑफ दी पीस (जेपी) यांची नियुक्ती केली. त्यात सात इंग्रज तर एकमेव नाना शंकरशेट हे भारतीय होते. इंग्रजांनी नानांचा केलेला तो सर्वोच्च सन्मान होता. रेल्वे उभारणीत नानांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून इंग्रज सरकारने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर नाना शंकरशेट यांचा पुतळा कोरला आहे. केवळ नानांचाच नव्हे तर सर्व भारतीयांचा हा मोठा सन्मान आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नानांचे महत्त्व इंग्रज राज्यकर्त्यांना कळले पण ते भारतीय राज्यकर्त्यांना अद्याप समजलेले नाही. नानांचे मोठेपण त्यांच्या लक्षातच आलेले नाही. पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी नानाप्रेमींची अनेक वर्षांची मागणी होती. ती मान्य होण्यात काहीच अडचण नव्हती. नानांच्या उत्तुंग कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एक आदेश दिला. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस करावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे बाळासाहेबांनी मनोहरपंतांना सांगितले. त्याप्रमाणे युती शासनाने तसा प्रस्ताव पाठविला. परंतु राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यातूनच नानांचे नाव मागे पडले.

नानांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव व्ही.टी.ला देण्यात आले. त्यानंतर मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे, असा आग्रह 1996 सालापासून तमाम नानाप्रेमींनी धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली आहेत. याकामी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र वि. शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष अॅड. सच्चिदानंद हाटकर, उपाध्यक्ष हरीष पितळे, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व किशोर कल्याणकर आणि सहकोषाध्यक्ष विजय चौलकर या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. दरवर्षी 16 एप्रिल हा दिवस `भारतीय रेल्वे दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी नानांच्या नावाचा पाठपुरावा करण्यासाठी तमाम नानाप्रेमी मुंबई सेंट्रल टर्मिनस बाहेर मूक निदर्शने करतात. तसेच लाखभर सह्यादेखील गोळा करतात. पण सरकारला काही जाग येत नाही. आतापर्यंत पथनाट्ये, पत्रकार परिषदा घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण ही मागणी म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी ठरली आहे. वास्तविक नाना हे महापुरूष होते. आचार्य अत्रे म्हणत की, महापुरूष हा शतकातून एकदाच जन्माला येतो. अशा या महापुरूषाची भारत सरकारकडून उपेक्षा व्हावी, हे आपले दुर्दैव होय. केंद्र सरकारने आता अधिक उशीर न करता मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे. एका थोर भारतीयाचा सन्मान करून त्याचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहावे. तसे न झाल्यास इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content