HomeArchiveविश्वास आणि अविश्वासाचा...

विश्वास आणि अविश्वासाचा हिंदोळा!

Details
विश्वास आणि अविश्वासाचा हिंदोळा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
राजकारणाविषयी सर्वसामान्यांची मते फारशी चांगली नाहीत. कपट-कारस्थाने, कुरघोडी, फोडाफोडी, निंदा-नालस्ती हे राजकीय शब्दकोशातील परवलीचे शब्द बनले आहेत. त्यामुळे राजकारण बदनाम आहे. अर्थात काही चांगल्या मंडळींनी राजकारणाची गरिमा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची नावे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. भारताच्या राजकीय बजबजपुरीत महाराष्ट्र आजही थोड्याअधिक प्रमाणात आपली शालीनता टिकवून आहे. सत्तरच्या दशकापर्यंत तर येथील राजकारणाचा पाया नीतीमूल्यावरच बेतलेला होता. याचा अर्थ नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी नव्हती असे म्हणता येणार नाही. टीका-टिप्पणी होत होती, पण नेतेमंडळी नैतिक मूल्ये जपत आली होती. प्रत्येक नेत्याला सत्तेची आस होती. पण ती आसुरी नव्हती.

सत्तरच्या दशकात शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एण्ट्री’ झाली आणि सत्तासमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला. सत्ता हेच अंतिम ध्येय घेऊन राजकारणात आलेल्या या माणसाने पुढील पन्नास वर्षे केवळ आणि केवळ सत्ता उपभोगली. राजकीय उलथापालथीत मधली काही वर्षे त्यांना सत्तेपासून दूर राहवे लागले. पण तो काळ खूपच अल्प होता. या काळातही त्यांनी राजकारणावरील स्वत:ची पकड ढिली होऊ दिली नाही. महाराष्ट्राच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता मिळवताना साम-दाम-दंड-भेद ही नीती त्यांनी अगदी राजरोसपणे वापरली. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा पायंडा पाडला. त्यांची हीच नीती आज त्यांच्यावर उलटली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीचे प्रमाण पाहता पेरले तेच उगवले या निसर्गनियमाचा त्यांना आज अनुभव घ्यावा लागत आहे.

राजकारणात सत्ता मिळवायची असेल तर सोबत खंजीर बाळगावा लागतो अन् संधी मिळताच तो खुपसावाही लागतो, या आधुनिक राजकीय नीतीचे शरद पवार हेच उद्गाते आहेत. १९७८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावर त्यांनी पहिल्यांदा असा वार करीत सत्ता हस्तगत केली. सत्तरच्या दशकात देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवत त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले. अर्थात काँग्रेस फोडून त्यांनी सत्तेचे जुळवलेले समीकरण अनेकांना अनुचित वाटले. पण सत्तेच्या सारीपाटात प्यादी हलवावी लागतात. कुणाचा तरी बळी घेतल्याशिवाय जिंकता येत नाही, हा सत्ता मिळवण्याचा नवा मार्ग पवारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. याला कुणी पाठीत खंजीर खुपसणे वा वार करणे म्हटले तरी पवारांनी त्यावेळी त्याची पर्वा केली नाही. सत्तेपुढे निष्ठा ठेंगणी असते. वेळप्रसंगी तिला तुडवून पुढे जावे, हा मूलमंत्र त्यांनीच राजकारणातील नव्या पिढीला दिला.

राजकारणात नाती, मैत्री याला थारा नसतो याचे धडेही त्यांनीच दिले. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदारांना फोडून शरद पवार यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणले. त्यावेळी आपला जवळचा मित्र असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटेल, याचा विचार त्यांच्या मनाला शिवलादेखील नाही. राजकारणात भावनेला कदापि महत्त्व नसते. सत्ता हा केवळ व्यवहार असतो. ती मिळवण्याचे धारिष्ट्य असावे लागते. त्यासाठी चाणाक्षपणा आणि चातुर्य असावे लागते. अन् कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागते, हे सत्ताकारणाचे आणखी एक रहस्य पवार यांनी यानिमित्ताने उलगडले.

राजकारणात परोपकारालाही स्थान नसते हे शरद पवार यांनीच दाखवून दिले आहे. १९८० ला जनता सरकार अस्त पावले. इंदिरा गांधी यांनी पूर्ण बहुमतात केंद्रातील सत्ता मिळवली. विश्वासघातातून अस्तित्त्वात आलेले पवारांचे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त केले. विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. पवार सत्तेतून बेदखल झाले. १९८५ मध्येही काँग्रेसलाच पुन्हा सत्ता मिळाली. पवारांना विरोधात बसण्याची वेळ आली. सत्तेसाठी राजकारणात सर्व तडजोडी क्षम्य असतात, याचा प्रत्यय देत राजीव गांधींशी सलगी वाढवत त्यांनी १९८७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. १९८८ मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. शरद पवार यांच्या जीवनपटाचा पूर्वार्ध येथे संपला.

राजकीय अडगळीत पडलेल्या शरद पवार यांना राजीव गांधी यांनी यानिमिताने नवसंजीवनी दिली. त्यांच्या उत्तरार्धात त्यांना राज्यात, केंद्रात सत्तेच्या नवनव्या संधी मिळत गेल्या. याचे श्रेय राजीव गांधी यांनाच द्यावे लागेल. राजीव गांधी यांच्या पश्चात १९९९ मध्ये त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्याची संधी आली, त्यावेळी त्यांना पाठिंबा देत राजीव गांधींच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी पवारांना मिळाली होती. पण राजकारणात उपकार परोपकाराने नव्हे तर ‘वार’ करून फेडायचे असतात, हे त्यांनी दाखवून दिले. सर्व काँग्रेसजन सोनिया गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपली निष्ठा व्यक्त करीत असताना पवारांनी विदेशी मुद्द्यावर सोनिया गांधी यांना विरोध दर्शवत काँग्रेसशी फारकत घेतली. ज्या पवारांचे राजकीय पुनर्वसन केले, त्यांनीच अशी प्रतारणा करावी, याचे त्यावेळी गांधी घराण्याला किती मोठे दु:ख झाले असेल. राजकारणात भावनेचे स्थान गौण असते, हा व्यवहार असतो. हे पवारांनी येथे नव्याने अधोरेखित केले.

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. याचा प्रत्यय मागील काही दिवसांतील घटनांवरून शरद पवार यांना येत असावा. सत्तालालसेमुळे आपण जे जे पेरून ठेवले आहे तेच उगवून येत आहे. हे त्यांनाही मान्य करावे लागेल. विजयसिंह मोहिते-पाटलांपासून सचिन अहिरांपर्यंत, जयदत्त क्षीरसागरांपासून गणेश नाईकांपर्यंत राष्ट्रवादीत सर्वदूर बंडाळी पाहयला मिळाली. सर्वांनी भाजपा किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करीत सत्तेचा मार्ग जवळ केला आहे. अर्थात भाजपा किंवा शिवसेनेचे सध्याचे सुरू असलेले राजकारण नक्कीच आदर्शवत नाही. जो पवारांनी प्रयोग केला, त्याचाच पुढचा अंक ते सादर करीत आहेत. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जिंकून येणाऱ्या लोकांची मोट बांधण्याचा प्रकार म्हणजेच २+२=५ हा पवारांचाच फॉर्म्युला भाजपामध्ये सुरू आहे. यातील एक अंकाची केलेली जुळवाजुळव आभासी आहे, याचे भान त्यांना ठेवावे लागेल.

असो. मूळ मुद्दा पवारांचा आहे. त्यांनीच महाराष्ट्रात अशा ‘आदर्श’ राजकारणाचा पाया रचला. परंतु, तो किती तकलादू आहे, याचा अनुभव सध्या खुद्द पवारांनाच येत असेल. ज्यांना राजकारणाची बाराखडी शिकवली. सत्तेची कवाडे स्वत:च्या हाताने उघडून दिली, त्यांनीच अशा अडचणीच्या काळात ‘विश्वास’घात करावा यासारखे राजकारणात दुसरे मोठे दु:ख नसावे. जे वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे किंवा गांधी घराण्याच्या वाट्याला पवारांमुळे आले. त्या दु:ख आणि वेदनेची जाणीव आता पवारांना होत असेल. पण ज्या पवारांचे राजकारण कधीच ‘विश्वासा’वर बेतलेले नव्हते, त्यांनी दु:ख करण्यात काहीच अर्थ नाही. निष्ठा, परोपकारसारखे शब्द ज्यांच्या शब्दकोशात नाहीत, त्यांनी इतरांकडून त्याची अपेक्षाही बाळगू नये, असेच सरतेशेवटी म्हणावे लागेल. एक राजकीय व्यवहार यादृष्टीने याकडे पाहणे हेच शरद पवार यांच्यासाठी समाधान देणारे असेल.”
 
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content