Details
सणांचे स्वरूप बदलतेय..
31-Aug-2019
”
वैभव मोहन पाटील
गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. हे सण साजरा करण्यामागील उद्देश बाजूला पडून त्यात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व अर्थकारण शिरले आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही मोठी सुवर्णसंधीच असते. त्यामुळे राजकीय पक्ष पुरस्कृत गणेश मंडळांमध्ये प्रचंड चढाओढ पाहयला मिळते. भव्यदिव्य देखावे व आरास यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. सध्या या सणांचा एकप्रकारचा इव्हेंट झाल्याचे पाहयला मिळते व त्यातूनच गणेशोत्सवात ‘नवसाला पावतो’ ही संकल्पना पुढे आली. अशाप्रकारचा प्रचार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा घेतलेला निर्णय आशादायक आहे. सर्वच मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये खूप प्रमाणावर अर्थकारण होत असते. यात तगडया प्रायोजकांच्या जाहिराती मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांचे गणपती नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. काही गणपतींच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते. त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात.
महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव अशा सणांच्या कालावधीत आनंदाला उधाण आलेले असते. नऊ थर, १० थर कुठले पथक लावणार यावर सुरूवातीपासून बरीच चर्चा सुरू असते. बक्षिसांचीही चर्चा सर्वत्र होते. यात राजकीय अट्टहास अधिक असतो. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मोठे मंडप टाकून व रोषणाईवर लाखो रूपये खर्च होत आहेत. सण मनोभावे व जल्लोषात साजरे व्हायलाच हवेत. मात्र देव भक्तीचा भुकेला आहे. त्याला अशा उधळपट्टीची खरंच गरज आहे का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. सामाजिक प्रश्न मांडणारे देखावे जनजागृतीचे चांगले माध्यम आहे. मात्र, ते किती मंडळे अंगीकरतात हे पडताळावे लागेल. मूर्ती लहान किंवा मोठी असली तरी तुमची भक्ती किती प्रामाणिक आहे याला जास्त महत्त्व आहे. प्रत्येक गणेश मंडपाबाहेर मोठ-मोठया पक्षांच्या, राजकीय नेत्यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक, बॅनर काय दर्शवतात हे समजण्यासाठी आपण सर्व सूज्ञ आहोत. तात्पर्य हेच की, आपल्या सणाचे पावित्र्य कमी होऊ लागले आहे व त्याचे बाजारीकरण वाढत आहे.
सध्याच्या महागाई, बेकारीमुळे जनतेची मानसिकता बदललेली आहे. यावर उपाययोजना या सणाच्या काळात होणे गरजेचे आहे. पर्यावरण आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखायला हव्यात. तसे पाहिले तर आकाशातील सूर्य-चंद्र बदलले नाहीत. माणसं मात्र रोज, क्षणाक्षणाला बदलत आहेत. काळ बदलतोय, तंत्रज्ञानाने परिसीमा गाठलीय. त्या प्रमाणात सणाचे स्वरूप बदलणारच आहे. पण सणाचा इव्हेंट होणे संस्कृतीला धरून नाही. धार्मिक सणांचे व्यावसायिकतेचे स्वरूप बाजारीकरणास भाग पाडत आहे. गोविंदा हा दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम खेळ व सण आहे. आजही उंच थरांच्या हंड्या फोडण्यासाठी तरूण जीवाची पर्वा करीत नाहीत. या खेळात आपले सर्वस्व अर्पण करतात. परंतु हा खेळ जीव धोक्यात टाकणारा आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.
प्रत्येक विभागात ‘राजा’च्या नावे गणेशोत्सव साजरा होतो आणि नवसाला पावणाऱ्या गणपतींचे फॅड वाढत आहे. गणेशोत्सवाच्या भव्यदिव्यपणाने आपण काय मिळवतोय, तर ‘प्रदूषण’, ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास. हे थांबले पाहिजे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, उंच मूर्ती टाळा, आपले सण पर्यावरणप्रेमी करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. दरवर्षी बाप्पा येतोच, त्याचा महिमा वा भक्तांची आराधना कुठेही कमीजास्त होत नाही. त्यामुळे त्याच्या आगमनाला दरवर्षी कितीही मोठा व्यापकपणा आणला तरी त्याचे आशीर्वाद आपणाला मिळणारच आहेत. त्यात कुठेही भेदभाव असण्याचे कारण नाही. त्यासाठी निसर्गाला इजा न पोहोचवता लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारी एकता, संघटना, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण टाळून जपण्याची खरी गरज आहे. टिळकांनी एकात्मता, भक्तिभावना, लोकजागृती व समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे बाप्पाचे स्वागत मनाने, भक्तीने, परंपरेने व पर्यावरणपूरक पद्धतीने जल्लोषातच झाले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर धन व शक्ती पणाला लावण्याची आवश्यकता नाही.
गणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!!
”
वैभव मोहन पाटील
“गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. हे सण साजरा करण्यामागील उद्देश बाजूला पडून त्यात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व अर्थकारण शिरले आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही मोठी सुवर्णसंधीच असते. त्यामुळे राजकीय पक्ष पुरस्कृत गणेश मंडळांमध्ये प्रचंड चढाओढ पाहयला मिळते. भव्यदिव्य देखावे व आरास यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. सध्या या सणांचा एकप्रकारचा इव्हेंट झाल्याचे पाहयला मिळते व त्यातूनच गणेशोत्सवात ‘नवसाला पावतो’ ही संकल्पना पुढे आली. अशाप्रकारचा प्रचार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा घेतलेला निर्णय आशादायक आहे. सर्वच मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये खूप प्रमाणावर अर्थकारण होत असते. यात तगडया प्रायोजकांच्या जाहिराती मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांचे गणपती नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. काही गणपतींच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते. त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात.”
“महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव अशा सणांच्या कालावधीत आनंदाला उधाण आलेले असते. नऊ थर, १० थर कुठले पथक लावणार यावर सुरूवातीपासून बरीच चर्चा सुरू असते. बक्षिसांचीही चर्चा सर्वत्र होते. यात राजकीय अट्टहास अधिक असतो. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मोठे मंडप टाकून व रोषणाईवर लाखो रूपये खर्च होत आहेत. सण मनोभावे व जल्लोषात साजरे व्हायलाच हवेत. मात्र देव भक्तीचा भुकेला आहे. त्याला अशा उधळपट्टीची खरंच गरज आहे का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. सामाजिक प्रश्न मांडणारे देखावे जनजागृतीचे चांगले माध्यम आहे. मात्र, ते किती मंडळे अंगीकरतात हे पडताळावे लागेल. मूर्ती लहान किंवा मोठी असली तरी तुमची भक्ती किती प्रामाणिक आहे याला जास्त महत्त्व आहे. प्रत्येक गणेश मंडपाबाहेर मोठ-मोठया पक्षांच्या, राजकीय नेत्यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक, बॅनर काय दर्शवतात हे समजण्यासाठी आपण सर्व सूज्ञ आहोत. तात्पर्य हेच की, आपल्या सणाचे पावित्र्य कमी होऊ लागले आहे व त्याचे बाजारीकरण वाढत आहे.”
“सध्याच्या महागाई, बेकारीमुळे जनतेची मानसिकता बदललेली आहे. यावर उपाययोजना या सणाच्या काळात होणे गरजेचे आहे. पर्यावरण आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखायला हव्यात. तसे पाहिले तर आकाशातील सूर्य-चंद्र बदलले नाहीत. माणसं मात्र रोज, क्षणाक्षणाला बदलत आहेत. काळ बदलतोय, तंत्रज्ञानाने परिसीमा गाठलीय. त्या प्रमाणात सणाचे स्वरूप बदलणारच आहे. पण सणाचा इव्हेंट होणे संस्कृतीला धरून नाही. धार्मिक सणांचे व्यावसायिकतेचे स्वरूप बाजारीकरणास भाग पाडत आहे. गोविंदा हा दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम खेळ व सण आहे. आजही उंच थरांच्या हंड्या फोडण्यासाठी तरूण जीवाची पर्वा करीत नाहीत. या खेळात आपले सर्वस्व अर्पण करतात. परंतु हा खेळ जीव धोक्यात टाकणारा आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.”
“प्रत्येक विभागात ‘राजा’च्या नावे गणेशोत्सव साजरा होतो आणि नवसाला पावणाऱ्या गणपतींचे फॅड वाढत आहे. गणेशोत्सवाच्या भव्यदिव्यपणाने आपण काय मिळवतोय, तर ‘प्रदूषण’, ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास. हे थांबले पाहिजे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, उंच मूर्ती टाळा, आपले सण पर्यावरणप्रेमी करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. दरवर्षी बाप्पा येतोच, त्याचा महिमा वा भक्तांची आराधना कुठेही कमीजास्त होत नाही. त्यामुळे त्याच्या आगमनाला दरवर्षी कितीही मोठा व्यापकपणा आणला तरी त्याचे आशीर्वाद आपणाला मिळणारच आहेत. त्यात कुठेही भेदभाव असण्याचे कारण नाही. त्यासाठी निसर्गाला इजा न पोहोचवता लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारी एकता, संघटना, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण टाळून जपण्याची खरी गरज आहे. टिळकांनी एकात्मता, भक्तिभावना, लोकजागृती व समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे बाप्पाचे स्वागत मनाने, भक्तीने, परंपरेने व पर्यावरणपूरक पद्धतीने जल्लोषातच झाले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर धन व शक्ती पणाला लावण्याची आवश्यकता नाही.”
गणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!!

