Details
व्यथित पवारांचा संताप!
02-Sep-2019
”
अनिकेत जोशी
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
टीव्हीच्या पडद्यावर परवा जी चित्रे झळकत होती, ती मन द्रावणारी अशीच होती. एकेकाळी महाराष्ट्रावर राज्य करणारा तसेच मराठी मनावर अधिराज्य करणारा नेता एका पत्रकारापुढे हतबल झाला होता. त्याला विचारला गेलेला प्रश्न घायाळ करून गेला. तो व्यथित झाला, संतप्त झाला. हे असे का झाले, शरद गोविंद पवार इतके व्याकूळ झालेले का पाहायला मिळाले, त्यांच्या राजकारणाचा आजवरचा सारा पटच जणू त्यांच्या पुढ्यात त्या एका सवालाने उभा राहिला की काय कोण जाणे!
गेल्या काही वर्षांत शरद पवारांवर कुटुंबाच्या हिताला प्राधान्य दिल्याचे आरोप होतच आहेत. त्यात नातलगांनाही पक्ष सोडण्याची वेळ का आली, अशा अर्थाचा तो सवाल केला गेला, तेव्हा पवारसाहेब उसळले. पुतण्या की मुलगी असा एक अतंर्गत वाद त्यांना गेले एक तपभर झेलावा लागतोच आहे. २००६मध्ये सुप्रिया सुळे यांची निवड राज्यसभेवर बिनविरोध व्हावी, यासाठी स्वतः शरदरावांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून, “दादा की ताई?” असा एक सुप्त वाद म्हणा, संघर्ष म्हणा त्यांच्या पक्षात सुरूच झाला. राज्यसभेची ती जागा वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने रिक्त झाली होती. त्यावेळी वसंतरावांच्या पत्नीचे नावही पुढे होते. रत्नाकर महाजन वा मदन बाफनांसारखे पुण्यातीलच नेते तिथे जाऊ शकले असते. पण अशा सहकाऱ्यांऐवजी अचानक ताईंचे नाव पुढे आले. हा योगायोग नक्कीच नव्हता. काही नेते सहकारी तेव्हा शरदरावांवर रागावलेही होते. पण एकदा ताईंचे नाव येतेय म्हटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही पुढाकार घेतला व त्या बिनविरोध महाराष्ट्र विधानसभेमधून राज्यसभेवर गेल्या. दोन-अडीच वर्षांनंतर बारामती लोकसभा मतदारसंघामधून स्वतः शरदरावांऐवजी ताईंचे नाव आले!
पण एकदा मुलगी व पुतण्या असे दोन पुढच्या पिढीतील नेते राजकारणात उतरल्यामुळे पवारांच्या पक्षातच घराणेशाही, अंतर्गत सुप्त चढाओढ सुरू झाली. हा कार्यकर्ता ताईंच्या जवळ आहे, हा नेता दादांना मानणारा आहे असे वर्गीकरण आपोआपच झाले. याला नातलगवाद हेच नाव आहे. दादा म्हणजे अजितदादा पवार. हे साहेबांचे पुतणे तर ताई म्हणजे सुप्रिया सदानंद सुळे, ही साहेबांची एकुलती एक लाडकी लेक! साहेबांचा राजकीय वारसा कुणाकडे जाणार हा सवाल होता. पवार साहेबांनी दिल्लीसाठी ताईंना निवडले खरे पण राज्याची सूत्रे अजितदादांच्या हातात पूर्ण जाणार नाहीत याचीही सतत काळजीच घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची आजवरची वाटचाल पाहणारा कोणीही निरिक्षक हा निष्कर्ष सहजच काढू शकेल. पवारांनंतर ताई व दादा हे ठरले. पण त्याही पुढच्या पिढीच्या राजकीय प्रगतीचा मुद्दा हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीमध्ये प्रकर्षाने पुढे आला. तशीही बहुधा शरदरावांना माढाची लोकसभेची जागा लढायची इच्छा नव्हती आणि त्यांना तिथून विजयसिंह मोहितेंनाही पुन्हा तिकीट द्यायचे नव्हते. मग अजितदादांचा मुलगा पार्थ याला मावळमधून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली तेव्हा, शरदरावांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली. एकाच घरातील कितीजणांनी लढायचे असा सवाल त्यांनी केला होता. पण पार्थ अजित पवारांना राजकीय वलय लाभले नाही. आणि इकडे अजित पावारांच्या चुलत भावाचा मुलगा, रोहीत पवार, हा शरदरावांचा दुसरा नातू, अचानक शरद पवारांसमवेत दिसू लागला. बोलू लागला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहीत पवारांचे गुणगान ऐकू येऊ लागले. जे लोक शरदरावांना ओळखतात त्यांना पार्थच्या राजकारण प्रवेशाबरोबरीनेच रोहीत पवारांचे महत्त्व वाढणे याला योगायोग मानणे कठीण जाईल.
परवा ज्यावरून चिडले ते डॉ. पद्मसिंह पाटील हे अजितदादांच्या जवळच्या नातलगांपैकी एक आहेत यात शंकाच नाही. पण डॉक्टरांची सारी राजकीय कारकीर्द केवळ पवारांमुळेच घडलेली आहे, यातही शंका नाही. वैद्यकीय व्यवसायापेक्षा राजकारणातील पैलवान म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील ओळखले जातात. त्यांचे नाते पत्नीकडून अजितदादांशी आहे. तसे तर अनेक राजकीय नेते एकमेकांच्या नातेसंबंधात आहेत. ज्यांना, “खानदानी मराठ्यांची राजकीय घराणी” असे आपण म्हणू शकतो, अशा, सर्वच जिल्ह्यांतील, राजकीय नेत्यांचे एकमेकांमध्ये नातेसंबंध आहेत. पण म्हणून ते सारेच एकाच पक्षात आहेत वा नातलग म्हणून त्यांना काही निराळी वागणूक पक्षाचे नेते देतात, असे म्हणणे कदाचित अन्यायाचे ठरेल. पवारांच्या रागाचा मूळ गाभा तोच होता. शरद पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाते हे, नातेसंबंधापेक्षा अधिक मैत्रीचे आहे. दोघांची राजकीय करकीर्द तरूण वयात सुरू झाली. तेव्हा शरद पवारांनी काढलेल्या सायकल मार्चमध्ये एका बाजूला डॉ. पद्मसिंह तर दुसऱ्या बाजूला सुरेश कलमाडी असे फोटो आजही नेटवर उपलब्ध आहेत. तीस-चाळीस वर्षांच्या राजकीय मैत्रीत दोघांनी एकमेकांना साथ दिली. आता उतरत्या वयात राजकारणातून थोडे बाजूला पडलेले डॉक्टरसाहेब, मुलगा जगजित राणा यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत असे दिसते. राणा यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेशही केला.
श्रीरामपूरमधून आलेल्या बातमीनुसार, शरद पवार मतदार संपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका पत्रकार परिषदेत तो प्रकार घडला. कुणीतरी पत्रकाराने एक प्रश्न केला आणि पवार खवळले, संतप्त झाले व त्याहीपेक्षा ते उद्विग्न झाले, असे म्हणणे योग्य ठरावे. काय झाले होते असे, नगर जिल्ह्यातील राजकीय दौऱ्यावर असतानाच पवारसाहेबांनी श्रीरामपूरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही भाग घेतला. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विविध इमारतींच्या उद्घाटनासाठी ते तिथे गेले होते. नंतर संस्थेतच पत्रकार परिषद ठेवली होती. तिथे अन्य विषयांवर चर्चा सुरू असताना सहाजिकच तुमच्या पक्षाला गळती लागल्याबाबतचा प्रश्न आलाच. त्याला पवारांनी शांतपणाने उत्तर दिले. नेते गेले आहेत कार्यकर्ते माझ्याच बरोबर आहेत, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. मग कुणीतरी विचारले की तुमचे आमदार, खासदार जातच आहेत, पण आता नातेवाईक पद्मसिंह हेही निघून चालले असे का असावे, त्यावर पवार साहेब भडकले. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारता आहात, इथे नातेवाईकाचा काय संबंध, नातेवाईक कोणत्याही पक्षात असू शकतात. असे तर पवार बोललेच पण त्यांनी आयोजकांवरही आगपाखड केली. अशा प्रश्नकर्त्यांना बोलावत जाऊ नका, असे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना व प्रमुख पत्रकारांना म्हटले. यावरून ते किती चिडले होते हे समजू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये खा. विजयसिंह मोहिते पाटील, चित्रा वाघ, मधुकर पिचड व त्यांचा आमदार मुलगा वैभव पिचड, गणेश नाईक परिवार, जयदत्त क्षीरसागर असे अनेक नेते पवारांना सोडून गेले. भास्कर जाधव निघाले, उदयनराजे भोसलेंचा एक पाय पक्षाबाहेर गेलेलाच आहे. उदयनराजेंचे भाऊ आमदार शिवेंद्र राजे भोसले हेही गेले, दिलीप सोपल, दिलीप माने गेले, रश्मी बागल गेल्या.. खासदार सुनील तटकरेंचा पुतण्या अवधूत निघाला, कोल्हापूरचे धनंजय महाडिक गेले.. जाणाऱ्यांची यादी मोठी आहे. पक्षात राहिले किती, हा हिशेब सोपा आहे. त्यामुळे कोणीही नेता उद्विग्न होणे, संतापणे सहाजिकच म्हणावे लागेल.
शरद पवारांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी पत्रकारांशी मैत्रीही पुष्कळ केली आणि ते भांडले, चिडलेही पुष्कळ! मुंबईत जेव्हा जातीय दंगे भडकले होते तेव्हा, १९९१ मध्ये, शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री होते. मुंबईत सुधाकरराव नाईकांची राजवट सुरू होती. पण मुंबईची स्थिती चिंताजनक झाली, तेव्हा पंतप्रधान नरसिंहराव यांनी पवारांना खास स्थिती हाताळण्यासाठी मुंबईत धाडले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या अगदी मागच्या बाजूचा बंगला अजित पवारांचा होता. तिथे पवार साहेब उतरले होते. त्यांना भेटून काही प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार जमले होते. त्याआधी एक दोन दिवस काही इंग्रजी वृत्तपत्रांमधून शरद पवारांच्या उपस्थिती संदर्भात, ते सुधाकररावांना राज्य करून देणार की नाही, अशा संदर्भात बातम्या येत होत्या. त्या वाचून भडकलेले पवार जेव्हा बैठकीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी त्या विशिष्ट पत्रकारांना उद्देशून म्हटले की, इथे काही मंडळी अशी जमली आहेत की ज्यांना शरद पवारांनाच संपवायचे आहे. मी बोलणार नाही, असे म्हणून ते सरळ बंगल्यात निघून गेले होते.. असे कितीतरी प्रसंग आहेत जेव्हा पवार पत्रकारांवर भडकले वा त्यांनी विशिष्ट पत्रकारांचे प्रश्न उडवून लावले. सर्वच राजकीय नेत्यांच्या बाबतीत असे कधी ना कधी होऊ शकतेच. पण श्रीरामपुरमधील पवार साहबांचे चिडणे, हे चोवीस तास चालणाऱ्या टीव्ही वृत्तवाहिन्यांमुळे अधिक मोठ्या जनसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचले. आताचे शरदरावांचे वय आणि त्यांच्या पक्षाची ढासळती, नाजूक स्थिती, तिथले कोसळणारे बुरूज यामुळे असेल कदाचित. पण पवारांची ती संतप्त प्रतिक्रिया थोडीफार केविलवाणीच भासली.
—–००—-”
अनिकेत जोशी
“संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com
“टीव्हीच्या पडद्यावर परवा जी चित्रे झळकत होती, ती मन द्रावणारी अशीच होती. एकेकाळी महाराष्ट्रावर राज्य करणारा तसेच मराठी मनावर अधिराज्य करणारा नेता एका पत्रकारापुढे हतबल झाला होता. त्याला विचारला गेलेला प्रश्न घायाळ करून गेला. तो व्यथित झाला, संतप्त झाला. हे असे का झाले, शरद गोविंद पवार इतके व्याकूळ झालेले का पाहायला मिळाले, त्यांच्या राजकारणाचा आजवरचा सारा पटच जणू त्यांच्या पुढ्यात त्या एका सवालाने उभा राहिला की काय कोण जाणे!”
“गेल्या काही वर्षांत शरद पवारांवर कुटुंबाच्या हिताला प्राधान्य दिल्याचे आरोप होतच आहेत. त्यात नातलगांनाही पक्ष सोडण्याची वेळ का आली, अशा अर्थाचा तो सवाल केला गेला, तेव्हा पवारसाहेब उसळले. पुतण्या की मुलगी असा एक अतंर्गत वाद त्यांना गेले एक तपभर झेलावा लागतोच आहे. २००६मध्ये सुप्रिया सुळे यांची निवड राज्यसभेवर बिनविरोध व्हावी, यासाठी स्वतः शरदरावांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून, “दादा की ताई?” असा एक सुप्त वाद म्हणा, संघर्ष म्हणा त्यांच्या पक्षात सुरूच झाला. राज्यसभेची ती जागा वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने रिक्त झाली होती. त्यावेळी वसंतरावांच्या पत्नीचे नावही पुढे होते. रत्नाकर महाजन वा मदन बाफनांसारखे पुण्यातीलच नेते तिथे जाऊ शकले असते. पण अशा सहकाऱ्यांऐवजी अचानक ताईंचे नाव पुढे आले. हा योगायोग नक्कीच नव्हता. काही नेते सहकारी तेव्हा शरदरावांवर रागावलेही होते. पण एकदा ताईंचे नाव येतेय म्हटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही पुढाकार घेतला व त्या बिनविरोध महाराष्ट्र विधानसभेमधून राज्यसभेवर गेल्या. दोन-अडीच वर्षांनंतर बारामती लोकसभा मतदारसंघामधून स्वतः शरदरावांऐवजी ताईंचे नाव आले!”
“पण एकदा मुलगी व पुतण्या असे दोन पुढच्या पिढीतील नेते राजकारणात उतरल्यामुळे पवारांच्या पक्षातच घराणेशाही, अंतर्गत सुप्त चढाओढ सुरू झाली. हा कार्यकर्ता ताईंच्या जवळ आहे, हा नेता दादांना मानणारा आहे असे वर्गीकरण आपोआपच झाले. याला नातलगवाद हेच नाव आहे. दादा म्हणजे अजितदादा पवार. हे साहेबांचे पुतणे तर ताई म्हणजे सुप्रिया सदानंद सुळे, ही साहेबांची एकुलती एक लाडकी लेक! साहेबांचा राजकीय वारसा कुणाकडे जाणार हा सवाल होता. पवार साहेबांनी दिल्लीसाठी ताईंना निवडले खरे पण राज्याची सूत्रे अजितदादांच्या हातात पूर्ण जाणार नाहीत याचीही सतत काळजीच घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची आजवरची वाटचाल पाहणारा कोणीही निरिक्षक हा निष्कर्ष सहजच काढू शकेल. पवारांनंतर ताई व दादा हे ठरले. पण त्याही पुढच्या पिढीच्या राजकीय प्रगतीचा मुद्दा हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीमध्ये प्रकर्षाने पुढे आला. तशीही बहुधा शरदरावांना माढाची लोकसभेची जागा लढायची इच्छा नव्हती आणि त्यांना तिथून विजयसिंह मोहितेंनाही पुन्हा तिकीट द्यायचे नव्हते. मग अजितदादांचा मुलगा पार्थ याला मावळमधून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली तेव्हा, शरदरावांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली. एकाच घरातील कितीजणांनी लढायचे असा सवाल त्यांनी केला होता. पण पार्थ अजित पवारांना राजकीय वलय लाभले नाही. आणि इकडे अजित पावारांच्या चुलत भावाचा मुलगा, रोहीत पवार, हा शरदरावांचा दुसरा नातू, अचानक शरद पवारांसमवेत दिसू लागला. बोलू लागला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहीत पवारांचे गुणगान ऐकू येऊ लागले. जे लोक शरदरावांना ओळखतात त्यांना पार्थच्या राजकारण प्रवेशाबरोबरीनेच रोहीत पवारांचे महत्त्व वाढणे याला योगायोग मानणे कठीण जाईल.”
“परवा ज्यावरून चिडले ते डॉ. पद्मसिंह पाटील हे अजितदादांच्या जवळच्या नातलगांपैकी एक आहेत यात शंकाच नाही. पण डॉक्टरांची सारी राजकीय कारकीर्द केवळ पवारांमुळेच घडलेली आहे, यातही शंका नाही. वैद्यकीय व्यवसायापेक्षा राजकारणातील पैलवान म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील ओळखले जातात. त्यांचे नाते पत्नीकडून अजितदादांशी आहे. तसे तर अनेक राजकीय नेते एकमेकांच्या नातेसंबंधात आहेत. ज्यांना, “खानदानी मराठ्यांची राजकीय घराणी” असे आपण म्हणू शकतो, अशा, सर्वच जिल्ह्यांतील, राजकीय नेत्यांचे एकमेकांमध्ये नातेसंबंध आहेत. पण म्हणून ते सारेच एकाच पक्षात आहेत वा नातलग म्हणून त्यांना काही निराळी वागणूक पक्षाचे नेते देतात, असे म्हणणे कदाचित अन्यायाचे ठरेल. पवारांच्या रागाचा मूळ गाभा तोच होता. शरद पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाते हे, नातेसंबंधापेक्षा अधिक मैत्रीचे आहे. दोघांची राजकीय करकीर्द तरूण वयात सुरू झाली. तेव्हा शरद पवारांनी काढलेल्या सायकल मार्चमध्ये एका बाजूला डॉ. पद्मसिंह तर दुसऱ्या बाजूला सुरेश कलमाडी असे फोटो आजही नेटवर उपलब्ध आहेत. तीस-चाळीस वर्षांच्या राजकीय मैत्रीत दोघांनी एकमेकांना साथ दिली. आता उतरत्या वयात राजकारणातून थोडे बाजूला पडलेले डॉक्टरसाहेब, मुलगा जगजित राणा यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत असे दिसते. राणा यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेशही केला.”
“श्रीरामपूरमधून आलेल्या बातमीनुसार, शरद पवार मतदार संपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका पत्रकार परिषदेत तो प्रकार घडला. कुणीतरी पत्रकाराने एक प्रश्न केला आणि पवार खवळले, संतप्त झाले व त्याहीपेक्षा ते उद्विग्न झाले, असे म्हणणे योग्य ठरावे. काय झाले होते असे, नगर जिल्ह्यातील राजकीय दौऱ्यावर असतानाच पवारसाहेबांनी श्रीरामपूरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही भाग घेतला. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विविध इमारतींच्या उद्घाटनासाठी ते तिथे गेले होते. नंतर संस्थेतच पत्रकार परिषद ठेवली होती. तिथे अन्य विषयांवर चर्चा सुरू असताना सहाजिकच तुमच्या पक्षाला गळती लागल्याबाबतचा प्रश्न आलाच. त्याला पवारांनी शांतपणाने उत्तर दिले. नेते गेले आहेत कार्यकर्ते माझ्याच बरोबर आहेत, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. मग कुणीतरी विचारले की तुमचे आमदार, खासदार जातच आहेत, पण आता नातेवाईक पद्मसिंह हेही निघून चालले असे का असावे, त्यावर पवार साहेब भडकले. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारता आहात, इथे नातेवाईकाचा काय संबंध, नातेवाईक कोणत्याही पक्षात असू शकतात. असे तर पवार बोललेच पण त्यांनी आयोजकांवरही आगपाखड केली. अशा प्रश्नकर्त्यांना बोलावत जाऊ नका, असे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना व प्रमुख पत्रकारांना म्हटले. यावरून ते किती चिडले होते हे समजू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये खा. विजयसिंह मोहिते पाटील, चित्रा वाघ, मधुकर पिचड व त्यांचा आमदार मुलगा वैभव पिचड, गणेश नाईक परिवार, जयदत्त क्षीरसागर असे अनेक नेते पवारांना सोडून गेले. भास्कर जाधव निघाले, उदयनराजे भोसलेंचा एक पाय पक्षाबाहेर गेलेलाच आहे. उदयनराजेंचे भाऊ आमदार शिवेंद्र राजे भोसले हेही गेले, दिलीप सोपल, दिलीप माने गेले, रश्मी बागल गेल्या.. खासदार सुनील तटकरेंचा पुतण्या अवधूत निघाला, कोल्हापूरचे धनंजय महाडिक गेले.. जाणाऱ्यांची यादी मोठी आहे. पक्षात राहिले किती, हा हिशेब सोपा आहे. त्यामुळे कोणीही नेता उद्विग्न होणे, संतापणे सहाजिकच म्हणावे लागेल.”
“शरद पवारांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी पत्रकारांशी मैत्रीही पुष्कळ केली आणि ते भांडले, चिडलेही पुष्कळ! मुंबईत जेव्हा जातीय दंगे भडकले होते तेव्हा, १९९१ मध्ये, शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री होते. मुंबईत सुधाकरराव नाईकांची राजवट सुरू होती. पण मुंबईची स्थिती चिंताजनक झाली, तेव्हा पंतप्रधान नरसिंहराव यांनी पवारांना खास स्थिती हाताळण्यासाठी मुंबईत धाडले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या अगदी मागच्या बाजूचा बंगला अजित पवारांचा होता. तिथे पवार साहेब उतरले होते. त्यांना भेटून काही प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार जमले होते. त्याआधी एक दोन दिवस काही इंग्रजी वृत्तपत्रांमधून शरद पवारांच्या उपस्थिती संदर्भात, ते सुधाकररावांना राज्य करून देणार की नाही, अशा संदर्भात बातम्या येत होत्या. त्या वाचून भडकलेले पवार जेव्हा बैठकीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी त्या विशिष्ट पत्रकारांना उद्देशून म्हटले की, इथे काही मंडळी अशी जमली आहेत की ज्यांना शरद पवारांनाच संपवायचे आहे. मी बोलणार नाही, असे म्हणून ते सरळ बंगल्यात निघून गेले होते.. असे कितीतरी प्रसंग आहेत जेव्हा पवार पत्रकारांवर भडकले वा त्यांनी विशिष्ट पत्रकारांचे प्रश्न उडवून लावले. सर्वच राजकीय नेत्यांच्या बाबतीत असे कधी ना कधी होऊ शकतेच. पण श्रीरामपुरमधील पवार साहबांचे चिडणे, हे चोवीस तास चालणाऱ्या टीव्ही वृत्तवाहिन्यांमुळे अधिक मोठ्या जनसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचले. आताचे शरदरावांचे वय आणि त्यांच्या पक्षाची ढासळती, नाजूक स्थिती, तिथले कोसळणारे बुरूज यामुळे असेल कदाचित. पण पवारांची ती संतप्त प्रतिक्रिया थोडीफार केविलवाणीच भासली.”
—–००—-

