Details
विखे पाटलांनी रचलेल्या पायावर उदयनराजेंचा कळस!
17-Sep-2019
”
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
वीस-तीस वर्षांपूर्वीचे राजकारण आणि आजकालची राजकीय स्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर पडले आहे. १९९०च्या आधी महाराष्ट्रात राजकीय पक्ष फुटले नाहीत असे नाही. पक्ष अनेक फुटले. पण त्या फुटी व पक्षांतरे यांना एक तात्त्विक मुलामा देण्यात तत्कालीन नेतेमंडळी यशस्वी झालेली होती. शेतकरी कामगार पक्षामधून यशवंतराव मोहितेंसारखा मोहरा यशवंतराव चव्हाणांनी फोडला तेव्हा आपण बेरजेचे राजकारण करत आहोत हे जनतेला चव्हाणसाहेबांनी पटवून दिले होते. जनता पार्टीच्या स्थापनेवेळी विविध छोट्यामोठ्या डझनभर पक्षांचे विलिनीकरण झाले होते. पण ते एक मोठे राजकीय पुनर्निर्माण होते. आणीबाणीच्या विरोधातील ती चळवळही होती. शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसत जी ऐतिहासिक काँग्रेस फूट पाडली होती तो नासिकराव तिरपुडेंच्या नेतृत्त्वाखाली सहकार संपवण्याचे जे प्रयत्न झाले त्याला केलेला विरोध होता. १९८६मध्ये शरद पवारांनी विरोधी पक्षांमधून सत्ता आणण्याचे प्रयोग संपवून पुन्हा राजीव गांधींचे नेतृत्त्व स्वीकारले व आपला पक्ष विलीन करून मोकळे झाले. त्यालाही एका व्यापक विकासनीतीचा आधार दिला गेला.
पण, त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात ज्या पक्षफुटी झाल्या त्यांना असे तात्त्विक चर्चांचे आधार देण्याच्या फंदात कोणी पडले नाही. मी पक्ष सोडतो आणि लगेच मंत्री बनतो इतकाच मतितार्थ उरला होता. त्यातल्यात्यात छगन भुजबळांनी सेना सोडण्याच्या उद्योगाला मंडलवादाची झालर लावण्याचा प्रयत्न करून पाहिला. मंडलवादी १८ आमदार त्यांनी शिवसेमधून बाळासाहेब ठाकरेंच्या संतापाला भीक न घालता बाहेरही काढले. पण अंतिमतः तीन आमदार त्यांच्यासोबत उरले. ते स्वतः मात्र तातडीने मंत्री बनूनच मुंबईत परतले. १९९०च्या त्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षात फार मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांमधील आमदारांची भरती केली गेली. सध्या भारतीय जनता पक्षात दाखल झालेले बबनराव पाचपुते व बबनराव ढाकणे त्यावेळी जनता दलाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांना अन्य काही सहकाऱ्यांसह पवारांनी काँग्रेसमध्ये खेचले. जनता दलाने तेव्हापासून महाराष्ट्रात मानच टाकली.
नंतर नंबर होता शिवसेनेच्या फुटीचा. १९९१च्या नागपूरच्या विधानसभा अधिवेशनाच्या काळातच छगन भुजबळांनी ऐतिहासिक व नाट्यपूर्ण पद्धतीने शिवसेना फोडली. त्यावेळेस त्यांनीही पक्षनिष्ठेच्या मोठ्या शपथा घेतल्या होत्या. भुजबळांना सेना स्टाईलमध्ये “समजावून” सांगण्यासाठी ठाणे आणि मुंबईमधून अनेक कडवे शिवसैनिक धारकरी नागपुरात पोहोचले होते. पण, आनंद दिघेंपासून सर्वांचाच डोळा चुकवून भुजबळांना बाहेर काढण्याची पवारनीती यशस्वी ठरली होती. पक्षांतरबंदी कायद्याच्या हातावर तुरी देत ते पक्षांतर घडले होते हेही विशेष. एकदा भुजबळांनी संतप्त आणि जहाल शिवेसनेमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवले आणि मंत्रीपद मिळवले त्यानंतर पक्षांतराची एक नवीन लाटच आली. भुजबळांनंतर सात-आठ वर्षांनी गणेश नाईक बाहेर पडले. भुजबळांनंतर पंधरा वर्षांनी नारायण राणेंनी पुन्हा एकदा सेना फोडण्यात यश मिळवले. अशा पक्षांतरांमधून अनेक दिग्गज विरोधी बाकांवरून सत्तारूढ बाकांवर पोहोचले होते. नाईक व राणेंच्या नंतर भास्कर जाधव व अण्णा डांगे हे अनुक्रमे शिवसेना व भारतीय जनता पक्षामधून निघाले. मोठ्या प्रमाणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सेना-भाजपातून नेते, आमदार, खासदारही आयात केले.
आता गेल्या पाच वर्षांत या लाटा उलट्या फिरलेल्या आहेत. विशेषतः २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक दिग्गजांना सोनिया गांधी व राहुल गांधी तसेच शरद पवार, अजित पवारांच्या नेतृत्त्वावर आणि निवडून येण्याच्या व निवडून आणण्याच्या क्षमतेवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच, “पळा, पळा, कोण पुढे तो..” या चालीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून दररोज लोंढ्यांनी नेते, कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. यातील बरीच जहाजे भाजपाच्या बंदरालाच लागत असली तरी शिवसेनेकडे पोहोचणाऱ्या जहाजांचाही ओघ बऱ्यापैकी मोठा राहिलेला आहे.
शिवसेना ही महाराष्ट्रातील सत्तेत गेली पाच वर्षे असून नसल्यासारखीच राहिली होती. हे लोक विरोधात आहेत की सत्तेत, असा प्रश्न पडावा, असे सेना नेत्यांचे वागणे व बोलणे होते. पण गेल्या सहा महिन्यांत त्यांचेही सूर निवळले आहेत. उद्धव ठाकरेंना आता त्यांचा सूर सापडलेला आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे धाकटे भाऊ ही भूमिका स्वीकारलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशा टप्प्यावर आज आपण आहोत. ज्या क्षणी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह हरयाणा व झारखंड अशा तीन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल तेव्हापासून आचारसंहितेचा अंमल सुरू होतो. तशी महाराष्ट्रातील प्रशासनाने निवडणुकीची सारी तयारी पूर्ण केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी तसे जाहीरच केले आहे. पोलीस यंत्रणेचेही कामकाज सुरू झाले आहे. आचारसंहिता लागू होते तेव्हा प्रत्येक पोलीसस्टेशनच्या हद्दीतील खाजगी पारवानाधारकांना बंदुका जमा करण्याचे आदेश दिले जातात. तसे आदेश अनंत चतुर्दशीलाच प्रत्येक पोलीसठाण्याच्या अंमलदारांनी दिले आहेत. आता फक्त दिल्लीतून होणाऱ्या घोषणेचीच प्रतीक्षा आहे.
राजकीय पटलावरील अस्वस्थता प्रचंड वाढलेली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधीच काही महत्त्वाची पक्षांतरे उरकून काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठे हादरे देण्याचे तंत्र सत्तारूढ भारतीय जनाता पक्षाने व शिवसेनेनेही व्यवस्थित राबवले आहे. त्यामुळेच भास्कर जाधवांच्या पक्षांतरासाठी खास मुंबईतून विमान उडवण्यात आले. जाधवांना रत्नागिरीतून घेऊन बड्या सेना नेत्यांचे विमान औरंगाबादेत उतरले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेंकडे जाधवांचा राजीनामा सादर करून तो मंजूर करण्याची ही खटपट होती. त्यासाठी जाधव विमानाने पोहोचले तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे मतदारसंघात कार्यक्रमात होते. सेना नेते आले म्हटल्यावर बागडेसाहेब असतील तिथून जवळपास धावत घरी परतले. त्यासाठी कधी मोटारसायकलीवरून बसून तर कधी बंद रेल्वे फाटकाच्या खालून वाकून रूळ ओलांडण्याचीही कसरत बागडेंनी केली. ते परतले व त्यांनी जाधवांचा राजीनाम्याचा अर्ज स्वीकारल्याचे जाहीर केले.
तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महाजनादेश यात्रा नगरमध्येच सोडली आणि खास विमानाने ते छत्रपतींचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेंना घेऊन दिल्लीत पोहोचले. राष्ट्रवादीचे हे खासदार फटकळ व तडकफडक बोलण्यासाठी प्रख्यात आहेत. काल पर्यंत, “आपण मोदी-शाह यांना जुमानतच नाही. कोण तो मोदी, आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत..” असे हे राजे म्हणत होते. अशा उदयनराजेंना घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत मध्यरात्रीनंतर थडकले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पहाटे दोन-तीन वाजता उदयनराजे पोहोचले. बिर्ला त्यांची वाट पाहत जागतच बसले असावेत. बिर्ला तरी बिचारे काय करतील, मोदींचा व अमित शाह यांचा आदेशच असेल की रात्रीतच राजीनामा मंजूर झाला पाहिजे! उदयनराजेंचा राजीनामा मंजूर करून पुढची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून साताऱ्याची लोकसभेची जागा रिक्त झाल्याचे नोटिफिकेशनही लोकसभा सचिवालयाने रात्रीच तयार ठेवले असणार. ते शनिवारीच निर्वाचन भवनात, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पुढ्यात ठेवेलही गेले असणार.. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच साताऱ्याच्या रिक्त लोकसभेच्या जागेची निवडणूक घेण्यासाठीच ही लगीनघाई झाली हे उघड आहे.
खासदारकीच्या निवडणुकीसाठी रात्रीची धावपळ केली असेल हे एकवेळ समजू शकेल. पण भास्कर जाधवांसाठी शिवेसनेने इतकी धावाधाव कऱण्याचे कारण काय, त्याचे कारण फार गूढ नाही. कोकणी आमदार जाधवांचा विश्वास मंत्रतंत्र आणि पितृपक्षावर असणारच. ते टाळण्यासाठी शुक्रवारच्या दुपारच्या आधी राजीनामा देऊन जाधवांचा पक्षप्रवेश उरकण्याची घाई उडाली असावी. एप्रिल-मेपासून गेल्या सहा महिन्यांत तब्बल वीस आमदारांनी व खासदारांनी विरोधी पक्ष सोडण्यासाठी पदांचे राजीनामे दिले आहेत आणि ते शिवसेना वा भाजपात दाखल झाले आहेत. गंमत म्हणजे राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मोठे नेते मानले जातात ते दोघेही विरोधी पक्षांतून आलेले आहेत. पहिले आहेत धनंजय मुंडे हे भाजपातून २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दुसरे आहेत अमोल कोल्हे. हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीच्या थोडाच काळ आधी दाखल झाले. कोल्हे थेट शिरूरचे खासदार बनले. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकच खासदार निवडून आले. ते आहेत चंद्रपूरचे खासदार बंडू धानोरकर. हे शिवसनेची आमदारकी सोडून निवडणुकीचे अर्ज दाखल होण्याच्या थोडेच दिवस आधी काँग्रेसमध्ये गेले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंपासून ते प्रांताध्यक्ष अशोक चव्हाणांपर्यंत काँग्रेसचे अनेकानेक दिग्गज नेते निवडणुकीत पडत असताना हे शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार मात्र विजयी झाले. आता ही मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेच्या गोष्टी समाजावून सांगत आहेत ही मोठी गंमत आहे.

“संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
”
“संपादक, बित्तंबातमी”

“पण, त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात ज्या पक्षफुटी झाल्या त्यांना असे तात्त्विक चर्चांचे आधार देण्याच्या फंदात कोणी पडले नाही. मी पक्ष सोडतो आणि लगेच मंत्री बनतो इतकाच मतितार्थ उरला होता. त्यातल्यात्यात छगन भुजबळांनी सेना सोडण्याच्या उद्योगाला मंडलवादाची झालर लावण्याचा प्रयत्न करून पाहिला. मंडलवादी १८ आमदार त्यांनी शिवसेमधून बाळासाहेब ठाकरेंच्या संतापाला भीक न घालता बाहेरही काढले. पण अंतिमतः तीन आमदार त्यांच्यासोबत उरले. ते स्वतः मात्र तातडीने मंत्री बनूनच मुंबईत परतले. १९९०च्या त्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षात फार मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांमधील आमदारांची भरती केली गेली. सध्या भारतीय जनता पक्षात दाखल झालेले बबनराव पाचपुते व बबनराव ढाकणे त्यावेळी जनता दलाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांना अन्य काही सहकाऱ्यांसह पवारांनी काँग्रेसमध्ये खेचले. जनता दलाने तेव्हापासून महाराष्ट्रात मानच टाकली.”
“नंतर नंबर होता शिवसेनेच्या फुटीचा. १९९१च्या नागपूरच्या विधानसभा अधिवेशनाच्या काळातच छगन भुजबळांनी ऐतिहासिक व नाट्यपूर्ण पद्धतीने शिवसेना फोडली. त्यावेळेस त्यांनीही पक्षनिष्ठेच्या मोठ्या शपथा घेतल्या होत्या. भुजबळांना सेना स्टाईलमध्ये “समजावून” सांगण्यासाठी ठाणे आणि मुंबईमधून अनेक कडवे शिवसैनिक धारकरी नागपुरात पोहोचले होते. पण, आनंद दिघेंपासून सर्वांचाच डोळा चुकवून भुजबळांना बाहेर काढण्याची पवारनीती यशस्वी ठरली होती. पक्षांतरबंदी कायद्याच्या हातावर तुरी देत ते पक्षांतर घडले होते हेही विशेष. एकदा भुजबळांनी संतप्त आणि जहाल शिवेसनेमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवले आणि मंत्रीपद मिळवले त्यानंतर पक्षांतराची एक नवीन लाटच आली. भुजबळांनंतर सात-आठ वर्षांनी गणेश नाईक बाहेर पडले. भुजबळांनंतर पंधरा वर्षांनी नारायण राणेंनी पुन्हा एकदा सेना फोडण्यात यश मिळवले. अशा पक्षांतरांमधून अनेक दिग्गज विरोधी बाकांवरून सत्तारूढ बाकांवर पोहोचले होते. नाईक व राणेंच्या नंतर भास्कर जाधव व अण्णा डांगे हे अनुक्रमे शिवसेना व भारतीय जनता पक्षामधून निघाले. मोठ्या प्रमाणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सेना-भाजपातून नेते, आमदार, खासदारही आयात केले.”
“आता गेल्या पाच वर्षांत या लाटा उलट्या फिरलेल्या आहेत. विशेषतः २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक दिग्गजांना सोनिया गांधी व राहुल गांधी तसेच शरद पवार, अजित पवारांच्या नेतृत्त्वावर आणि निवडून येण्याच्या व निवडून आणण्याच्या क्षमतेवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच, “पळा, पळा, कोण पुढे तो..” या चालीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून दररोज लोंढ्यांनी नेते, कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. यातील बरीच जहाजे भाजपाच्या बंदरालाच लागत असली तरी शिवसेनेकडे पोहोचणाऱ्या जहाजांचाही ओघ बऱ्यापैकी मोठा राहिलेला आहे.”
“शिवसेना ही महाराष्ट्रातील सत्तेत गेली पाच वर्षे असून नसल्यासारखीच राहिली होती. हे लोक विरोधात आहेत की सत्तेत, असा प्रश्न पडावा, असे सेना नेत्यांचे वागणे व बोलणे होते. पण गेल्या सहा महिन्यांत त्यांचेही सूर निवळले आहेत. उद्धव ठाकरेंना आता त्यांचा सूर सापडलेला आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे धाकटे भाऊ ही भूमिका स्वीकारलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशा टप्प्यावर आज आपण आहोत. ज्या क्षणी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह हरयाणा व झारखंड अशा तीन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल तेव्हापासून आचारसंहितेचा अंमल सुरू होतो. तशी महाराष्ट्रातील प्रशासनाने निवडणुकीची सारी तयारी पूर्ण केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी तसे जाहीरच केले आहे. पोलीस यंत्रणेचेही कामकाज सुरू झाले आहे. आचारसंहिता लागू होते तेव्हा प्रत्येक पोलीसस्टेशनच्या हद्दीतील खाजगी पारवानाधारकांना बंदुका जमा करण्याचे आदेश दिले जातात. तसे आदेश अनंत चतुर्दशीलाच प्रत्येक पोलीसठाण्याच्या अंमलदारांनी दिले आहेत. आता फक्त दिल्लीतून होणाऱ्या घोषणेचीच प्रतीक्षा आहे.”
राजकीय पटलावरील अस्वस्थता प्रचंड वाढलेली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधीच काही महत्त्वाची पक्षांतरे उरकून काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठे हादरे देण्याचे तंत्र सत्तारूढ भारतीय जनाता पक्षाने व शिवसेनेनेही व्यवस्थित राबवले आहे. त्यामुळेच भास्कर जाधवांच्या पक्षांतरासाठी खास मुंबईतून विमान उडवण्यात आले. जाधवांना रत्नागिरीतून घेऊन बड्या सेना नेत्यांचे विमान औरंगाबादेत उतरले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडेंकडे जाधवांचा राजीनामा सादर करून तो मंजूर करण्याची ही खटपट होती. त्यासाठी जाधव विमानाने पोहोचले तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे मतदारसंघात कार्यक्रमात होते. सेना नेते आले म्हटल्यावर बागडेसाहेब असतील तिथून जवळपास धावत घरी परतले. त्यासाठी कधी मोटारसायकलीवरून बसून तर कधी बंद रेल्वे फाटकाच्या खालून वाकून रूळ ओलांडण्याचीही कसरत बागडेंनी केली. ते परतले व त्यांनी जाधवांचा राजीनाम्याचा अर्ज स्वीकारल्याचे जाहीर केले.
“तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महाजनादेश यात्रा नगरमध्येच सोडली आणि खास विमानाने ते छत्रपतींचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेंना घेऊन दिल्लीत पोहोचले. राष्ट्रवादीचे हे खासदार फटकळ व तडकफडक बोलण्यासाठी प्रख्यात आहेत. काल पर्यंत, “आपण मोदी-शाह यांना जुमानतच नाही. कोण तो मोदी, आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत..” असे हे राजे म्हणत होते. अशा उदयनराजेंना घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत मध्यरात्रीनंतर थडकले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पहाटे दोन-तीन वाजता उदयनराजे पोहोचले. बिर्ला त्यांची वाट पाहत जागतच बसले असावेत. बिर्ला तरी बिचारे काय करतील, मोदींचा व अमित शाह यांचा आदेशच असेल की रात्रीतच राजीनामा मंजूर झाला पाहिजे! उदयनराजेंचा राजीनामा मंजूर करून पुढची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून साताऱ्याची लोकसभेची जागा रिक्त झाल्याचे नोटिफिकेशनही लोकसभा सचिवालयाने रात्रीच तयार ठेवले असणार. ते शनिवारीच निर्वाचन भवनात, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पुढ्यात ठेवेलही गेले असणार.. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच साताऱ्याच्या रिक्त लोकसभेच्या जागेची निवडणूक घेण्यासाठीच ही लगीनघाई झाली हे उघड आहे.”
“खासदारकीच्या निवडणुकीसाठी रात्रीची धावपळ केली असेल हे एकवेळ समजू शकेल. पण भास्कर जाधवांसाठी शिवेसनेने इतकी धावाधाव कऱण्याचे कारण काय, त्याचे कारण फार गूढ नाही. कोकणी आमदार जाधवांचा विश्वास मंत्रतंत्र आणि पितृपक्षावर असणारच. ते टाळण्यासाठी शुक्रवारच्या दुपारच्या आधी राजीनामा देऊन जाधवांचा पक्षप्रवेश उरकण्याची घाई उडाली असावी. एप्रिल-मेपासून गेल्या सहा महिन्यांत तब्बल वीस आमदारांनी व खासदारांनी विरोधी पक्ष सोडण्यासाठी पदांचे राजीनामे दिले आहेत आणि ते शिवसेना वा भाजपात दाखल झाले आहेत. गंमत म्हणजे राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मोठे नेते मानले जातात ते दोघेही विरोधी पक्षांतून आलेले आहेत. पहिले आहेत धनंजय मुंडे हे भाजपातून २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दुसरे आहेत अमोल कोल्हे. हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत लोकसभा निवडणुकीच्या थोडाच काळ आधी दाखल झाले. कोल्हे थेट शिरूरचे खासदार बनले. महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकच खासदार निवडून आले. ते आहेत चंद्रपूरचे खासदार बंडू धानोरकर. हे शिवसनेची आमदारकी सोडून निवडणुकीचे अर्ज दाखल होण्याच्या थोडेच दिवस आधी काँग्रेसमध्ये गेले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंपासून ते प्रांताध्यक्ष अशोक चव्हाणांपर्यंत काँग्रेसचे अनेकानेक दिग्गज नेते निवडणुकीत पडत असताना हे शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार मात्र विजयी झाले. आता ही मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेच्या गोष्टी समाजावून सांगत आहेत ही मोठी गंमत आहे.”