HomeArchiveमुंबईसाठी पुराचा इशारा...

मुंबईसाठी पुराचा इशारा प्रणाली आजपासून सुरू!

Details

hegdekiran17@gmail.com
 
“तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे परिणामी मान्सूनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे भारतामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या महानगराला अधूनमधून अनेकदा प्रदीर्घ कालावधीसाठी पुराचा अनुभव आला आहे आणि अगदी अलीकडेच २९ ऑगस्ट २०१७ रोजी आलेल्या पुरामुळे हे शहर ठप्प झाले होते. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या असतील. जेव्हा २४ तासांच्या कलावधीत १०० वर्षांच्या कालवधीत सर्वाधिक ९४ सेंटीमीटर पाऊस पडला होता आणि त्यामुळे संपूर्ण शहरच पूर्णपणे अधू झाले होते. पुराची पूर्वतयारी म्हणून लोकांना आधीच सतर्क केले जावे, जेणेकरून ते पूर येण्यापूर्वीच त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.”
 
“पूरग्रस्त शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला एकात्मिक पूर इशारा प्रणाली अर्थात इफ्लोज-मुंबई विकसित करण्याची विनंती केली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निकट समन्वयाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये उपलब्ध असलेल्या देशांतर्गत कौशल्याचा वापर करून जुलै २०१९मध्ये इफ्लोज-मुंबईच्या विकासास सुरूवात केली. इफ्लोज-मुंबई ही मुंबई शहरासाठी एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित केली आहे, ज्यामुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळादरम्यान मुंबईला सुरूवातीलाच इशारा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.”

 
 
“आय-फ्लोज मॉड्यूलर रचनेवर तयार केले गेले आहे आणि त्यात डेटा एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल आहेत. या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेटोरॉलॉजी (आयआयटीएम), यांनी तयार केलेल्या रेन गेज नेटवर्क स्टेशनवरील फील्ड डेटा, बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) आणि आयएमडी, एमसीजीएमद्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी समाविष्ट केल्या आहेत. हवामानाच्या मॉडेलच्या माहितीच्या आधारे, हायड्रोलॉजिकल मॉडेल्सचा वापर पर्जन्यवृष्टीच्या रूपरेषेत बदल करण्यासाठी आणि नदी प्रणालींना तो प्रवाह प्रदान करण्यासाठी केला जातो. हायड्रॉलिक मॉडेल्सचा उपयोग अभ्यासाच्या क्षेत्रात पुराचे मूल्यांकन करण्यासाठी पाण्याच्या हालचालीची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवाहाच्या गतीची समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो.”
 

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content