HomeArchiveजात जात नाही..

जात जात नाही..

Details
जात जात नाही..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
`सैराट’ चित्रपट खूप गाजला. चित्रपटाचा शेवट काळजाला चटका लावणारा ठरला. दलित मुलगा आणि उच्चवर्णीय मुलगी यांच्या प्रेमकहानीचे पर्यवसान दोघांच्या हत्त्येत होते. हे पाहून प्रेक्षकही हळहळतात. वास्तविक 21 व्या शतकात जात-पात पाहणे हेच हास्यास्पद आहे. पण परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले तेच वास्तव आहे. डॉ. आंबेडकर म्हणाले होते, `जात नाही ती जात.’ एका वाक्यात या महापुरुषाने जातीचे किती सुंदर वर्णन केले होते. अनेकांना आपल्या जातीचा अभिमान असतो. जातीच्या या प्रेमातून ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आंध्र प्रदेशच्या प्रकासम येथे नुकतीच घडलेली एक घटना याबाबतचे एक ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. वैष्णवी ही 20 वर्षीय कॉलेज कुमारी सोमवारी सकाळी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिचा मृत्यू कसा झाला? वैष्णवीचे आपल्या कॉलेजमधील एका दलित मुलावर प्रेम होते. ती त्याच्याशी विवाह करणार होती. वैष्णवीचे वडील वेंका रेड्डी यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते रागाने बेभान झाले. त्यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ती एक दिवस आपल्या प्रियकराबरोबर पळून जाईल या भीतीने वेंका रेड्डी वेडेपिसे झाले. वैष्णवीने आपल्या प्रियकराशी विवाह केला नव्हता. कदाचित भविष्यात तिने तो केलाही नसता. पण मुलगी पळून गेल्यास समाजात आपली नाचक्की होईल या भीतीनेच वेंका रेड्डी यांना पछाडले. मुलगी आपले ऐकत नाही असे पाहून त्यांनी तिची गळा दाबून हत्त्या केली.

या घटनेमुळे आजुबाजूचे सारेच हळहळले. पण रेड्डी यांना पश्चात्ताप झाल्याचे दिसले नाही. आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेऊनदेखील जो बाप पश्चात्तापदग्ध होत नाही तो बाप कसला? अनेकांना जातीचा इतका अभिमान असतो की, जातीच्या पलिकडे ते पाहू शकत नाहीत. जातीतला मुलगा कसाही असला तरी तो चालतो. पण जातीबाहेरचा गुणी मुलगादेखील नाकारला जातो. जात म्हणजे गुणवत्ता नव्हे. दुर्दैवाने, गुणवत्तेऐवजी जातीला प्राधान्य दिले जाते. प्रेमात पडलेले दाम्पत्य कधी जात पाहत नाहीत. प्रेम हे आंधळे असते. त्याला प्रेमाशिवाय काहीच दिसत नाही. पण प्रेमिकांच्या नातेवाईकांना मात्र जात आणि धर्म दिसत असतात. आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा दिसत असते. आंतरजातीय विवाह हा मोठा गुन्हा ठरविला जातो. त्यातूनच आंतरजातीय विवाहांना विरोध होतो. महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते. अर्थात प्रेमात पडलेले जोडपे या बक्षिसासाठी विवाह करत नाहीत तर एकमेकांवरील प्रेम हेच त्यांना विवाहबंधनात बांधत असते. शेवटी विवाह करून संसार हा त्या जोडप्याला करायचा असतो. आई-बाप काही मुलांचे कायमचे सोबती नसतात. एक ना एक दिवस त्यांना जायचे असते, मग आपली मर्जी ते मुलांवर का लादतात? जातीचा विषय प्रतिष्ठेचा का करतात? महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर हे महापुरुष होऊन गेले. आपल्या पुरोगामी शिकवणुकीने त्यांनी देशाला दिशा दाखविली. पण तरीही जात गाडली गेली नाही. जातीच्या प्रेमातून पोटच्या मुलांची हत्त्या करणे थांबलेले नाही. 21व्या शतकातदेखील जात ही जात नाही, हे पाहून आम्हांला मनापासून दु:ख होत आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content