HomeArchiveमहागणपतीच्या साक्षीने `महाराष्ट्र...

महागणपतीच्या साक्षीने `महाराष्ट्र श्री’चा गजर!

Details
महागणपतीच्या साक्षीने `महाराष्ट्र श्री’चा गजर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र श्रीचा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या शहरी भागातच अधिक पाहयला मिळालाय. पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची क्रेझ आता दिवसेंदिवस ग्रामीण भागातही झपाट्याने वाढतेय. ग्रामीण भागातील युवकांमध्ये शरीरसौष्ठवाची क्रेझ वाढावी, त्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या एकमेव ध्येयापोटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांनी 15 व्या महाराष्ट्र श्रीच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे. महागणपतीच्या साक्षीने महाराष्ट्र श्रीचा सोहळा स्पर्धा त्याच जोशात जल्लोषात आणि त्याच दिमाखात येत्या 5 आणि 6 मार्चला टिटवाळा मंदिराशेजारील तरे प्रतिष्ठानच्या मंदिरात होणार असल्याची माहिती आयोजक तरे यांनी दिली.

नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे आणि टिटवाळ्यात खेळांच्या भव्य स्पर्धा आयोजनाचा जल्लोष साजरे करणारे नगरसेवक आणि आयोजक संतोष तरे यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही महाराष्ट्र श्री स्पर्धा भव्यदिव्य प्रमाणात होऊ शकते, हे दाखवून देण्यासाठीच स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी शरीरसौष्ठवपटूंना दिल्या जाणाऱ्या उत्तम सुविधा टिटवाळ्यातही उपलब्ध केल्या आहेत. तब्बल दोनशे खेळाडूंच्या निवासासह दोन दिवस त्यांना त्यांचा आवडता खुराकही दिला जाणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या महाराष्ट्र श्रीचा थाट यंदाही तसाच असेल. स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी लीलया पार पाडणाऱ्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या यजमानपदाखाली होणार आहे. या स्पर्धेतही खेळाडूंनाच प्राथमिकता देण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी सांगितले. 6 मार्चला महाराष्ट्र श्रीचा अंतिम सामना रंगणार असून विजेत्याला गतवर्षीप्रमाणे दीड लाखाचा रोख पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर उपविजेत्याला 75 हजारांचे रोख इनाम देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. एकंदर दहा गटात स्पर्धा रंगणार असून सहा खेळाडूंवर 15, 12, 8, 6, 5 आणि 3 हजार अशा रोख पुरस्कारांची उधळण केली जाईल. तसेच पुरूष- महिलांचे फिजीक स्पोर्टस् आणि महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा अशा अन्य तीन गटांसह एकून 13 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेतूनच 29 ते 31 मार्चदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बलाढ्य संघ निवडला जाणार असल्याचे रोठे यांनी सांगितले.

महिलांची ताकद वाढणार

महिलांसाठी फिजीक स्पोर्टस् आणि शरीरसौष्ठव असे दोन्ही गट या स्पर्धेत खेळविले जाणार आहेत. मिस मुंबई स्पर्धेतच सात खेळाडूंच्या सहभागामुळे मिस महाराष्ट्रसाठी महिलांचा आकडा वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार या स्पर्धेत तब्बल 20 पेक्षा अधिक महिला ऍथलीट खेळणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे यांनी दिली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही सहापेक्षा अधिक पीळदार सौंदर्य मंचावर अवतरणार असल्याचे सांगून स्पर्धा जोरदार होणार असल्याचे संकेत दिले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारातही महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचा अंतिम आकडा 50 च्या आसपास असेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

ठाण्याचे शरीरसौष्ठवपटू करणार धमाका

मुंबईचा संघ सगळ्यात बलाढ्य असला तरी स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण यांनी ठाणे जिह्याचा संघ धमाका करणार असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. ठाण्याच्या संघात सागर माळी, दिनेश कांबळे, अजय नायर, गणेश आंबुर्ले, संतोष शुक्ला असे तगडे खेळाडू असल्यामुळे चार वजनी गटात गटविजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर पाचवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱ्या सुनीत जाधवलाही सागर माळीविरूद्ध आपला जोर दाखवावा लागेल, अशी शक्यताही चव्हाण यांनी वर्तवली. ठाणे जिल्ह्याने आजवर अनेक भव्य स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असून महाराष्ट्र श्रीचे आयोजनही तसेच देखणे होईल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी बोलून दाखविला.

महाराष्ट्र श्रीत सुनीतसमोर कडवे आव्हान

सलग पाचवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱ्या सुनीत जाधवला जेतेपदाचा षटकार ठोकणे फार आव्हानात्मक असेल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका राज्यस्तरीय स्पर्धेतच त्याची चाहूल लागली आहे. गेल्या चार वर्षात आजवर एकाही स्थानिक स्पर्धेत फक्त विजयासाठीच उतरत असलेल्या सुनीतला धक्का बसला आहे. नवी मुंबईत झालेल्या या स्पर्धेत 85 किलो वजनीगटात सुनीत जाधवसह सागर माळी आणि महेंद्र चव्हाणसारखे तगडे खेळाडू उतरले होते. हा गटच अंतिम सामन्यासारखा होता. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरलेल्या सागर माळीने सनसनाटी निर्माण केली. त्याने या गटाचे विजेतेपद सुनीत जाधव आणि महेंद्र चव्हाणला धक्का देत मिळविले. सर्वात आश्चर्याचे म्हणजे गटविजेता निवडताना सुनीत जाधवऐवजी सागर माळी आणि महेंद्र चव्हाणची कंपेरिझन घेण्यात आली. सागरने गटविजेतेपद जिंकत आपले जेतेपदही निश्चित केले तर महेंद्र दुसरा आला. सुनीतची धक्कादायकरित्या तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. या अनपेक्षित निकालामुळे महाराष्ट्र श्रीची चुरस निश्चितच वाढली आहे. या स्पर्धेसाठी महेंद्र पगडे आणि अनिल बिलावा हे जबरदस्त तयारीतले खेळाडूही उतरत असल्यामुळे सुनीत जेतेपदाचा सिक्सर मारतो की बोल्ड होतो, हे पुढच्या आठवड्यातच कळेल.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content