Homeब्लॅक अँड व्हाईट817 कोटी रुपयांच्या...

817 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा छडा लावला आहे. सुमारे 147 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवण्यासाठी या 817 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या वापरण्यात आल्या. मेसर्स ध्रुविका केमिकल्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स निकोलासा ट्रेडिंग प्रा. लि., मेसर्स जे बी डायकेम प्रा. लिमिटेडचा संचालक आणि याच्या सूत्रधाराला अटक केली आहे.

या समूहाच्या विरोधात, वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री/पुरवठा न करता, केवळ पावत्या प्राप्त करण्यात आणि जारी करण्यात गुंतलेले असणे, त्याद्वारे उलाढाल वाढवण्याच्या आणि बँक कर्जाचा लाभ घेण्यासाठी तयार केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे आणि मंजूर करणे यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे. शोध घेतल्यानंतर असे आढळून आले की, या केलेल्या कंपन्या संबंधित परिसरात कार्यरत नाहीत किंवा अस्तित्त्वात नाहीत.

या कंपन्यांच्या समूहाने 817 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या आणि फसवणूक करून 147 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा केला होता आणि तत्सम बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट आपापसात किंवा अस्तित्त्वात नसलेल्या विविध कंपन्यांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे. वरील पद्धतीचा अवलंब करून त्यांनी सुमारे 127 कोटी रुपयांच्या बँक कर्जाचाही अपहार केल्याचे दिसून येते.

चौकशी दरम्यान गोळा केलेले प्रत्यक्ष पुरावे, सादर केलेली विवरण पत्रे आणि नोंदवण्यात आलेल्या तथ्यांनुसार, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 18/08/2023 रोजी संचालकाला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला 18/8/2023 रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय बेलापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 31/08/2023 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाने 628 कोटींची जीएसटीची कर चुकवेगिरी शोधून काढली, 270 कोटी वसूल केले आणि करचुकवेगिरी करणार्‍यांना तिघांना अटक केली. संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content