Homeहेल्थ इज वेल्थदेशातले ७० टक्के...

देशातले ७० टक्के कोरोनाग्रस्त केरळ व महाराष्ट्रात!

बहुतांश सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविड-१९मुळे बाधित होणाऱ्यांची तसेच मृत्यू पावलेल्यांची  संख्या कमी होत असताना केरळ आणि महाराष्ट्रात अजूनही मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या या दोन राज्यांमध्येच देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी जवळपास ७०% रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने कोविड-१९ व्यवस्थापनासंदर्भात सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये राज्य आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केरळ व महाराष्ट्रात दोन उच्चस्तरीय बहुशाखीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात पाठवण्यात येणाऱ्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) आणि डॉ. आरएमएल रुग्णालय, नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे तर केरळसाठीच्या पथकात आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आरोग्य आणि कुटूंब कल्याण कार्यालय, तिरुअनंतपुरम आणि लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्लीमधील तज्ज्ञांचा समावेश असेल.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content