Homeकल्चर +नीतांशीच्या सुरक्षेसाठी ७...

नीतांशीच्या सुरक्षेसाठी ७ बाऊंसर्स! 

११ मार्च २०२४ रोजी रिलीज झालेला, आमिर खान प्रोडक्शन प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि किरण रावने अतिशय संवेदनशीलतेने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ या खुशखुशीत विनोदाची पेरणी असलेल्या सिनेमातली फुलकुमारी नीतांशी गोयल, या ५ फूट उंचीच्या अभिनेत्रीला सध्या ७ बाऊंसर्सचे सुरक्षाकवच आहे.

हा चित्रपट ऑस्करसाठीदेखील नामांकित झाला होता. याच सिनेमात ‘फुलकुमारी’ ही व्यक्तिरेखा साकारलेली नवोदित अभिनेत्री नीतांशी गोयल अवघी १७ वर्षांची आहे आणि कोवळ्या वयातला तिचा अभिनय परिपक्व करणारा होता हे जाणवले. नितांशीचा पुढील चित्रपट होता ‘मैदान’. पण मैदान सिनेमा मैदान गाजवू शकला नाही. तरीही नीतांशीचा पहिल्याच सिनेमातील यश तिच्यासोबत कायम राहिलंय. अनेक एंडोर्समेंट तिच्या वाट्याला येत आहेत. आयुर्वेदिक नीम अर्थात कडुलिंबाबाच्या प्रोडक्ट्साठी तिची नियुक्ती झाली.

नीतांशीसोबत किती बाऊंसर्स असावेत असे तुम्हाला वाटते? धिप्पाड असे ७ बाऊंसर्स नीतांशीच्या सभोवती कडे करून होते आणि जेमतेम ५ फूट उंची आणि किरकोळ देहयष्टी असलेली नीतांशी या बाऊंसर्सच्या सुरक्षाकड्यामुळे दिसेनाशी झाली! एका सिनेमाचे यश आणि त्यासाठी फिल्मी कलाकारांना मिळणारी इतकी कडेकोट सुरक्षाव्यवस्था, यामुळेच अनावश्यक स्टारडम वाढते!

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content