Saturday, February 8, 2025
Homeचिट चॅट५वी अजित घोष...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून


मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८ संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ती होत आहे. त्याकरीता माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावरील माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद क्लबची मैदाने मुंबई क्रिकेट संघटनेने उपलब्ध करुन दिली आहेत.

स्पर्धेमधील ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यंदा “एसजी”चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेंडू उपलब्ध झाल्याने गोलंदाजांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळत आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव नदीम मेमन यांनी हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेमध्ये “एसजी”चे चेंडू उपलब्ध करुन दिल्यानंतर स्थानिक स्पर्धा आणि विशेषत: ज्युनियर खेळाडूंना याचा आवश्य लाभ होईल. याशिवाय नदीम मेमन यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंना पारितोषिके देऊ केल्याने स्पर्धेतील खेळाडूंना अधिकचे काही उत्तेजनार्थ मिळणार आहे. स्पर्धेतील उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना “एसजी”चे क्रिकेट किट भेट देण्यात येईल. प्राथमिक साखळीतून गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या माजी खेळाडू अरुंधती घोष यांच्या या उपक्रमाला हंसाबेन मेहता, रेड फॉक्सचे आशिष रेडिज्, क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे, संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांचे सहकार्य लाभले आहे.

अ गट: महाराष्ट्र यंग, स्पोर्टिंग युनियन, बोरीवली क्रिकेट क्लब, साईनाथ स्पोर्ट्स.

ब गट: जे भटिया सी. सी., भामा सी. सी., डॅशिंग स्पोर्ट्स, एस.आर.जी.स्पोर्ट्स ऑफिशियल.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content