Homeमाय व्हॉईससुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला...

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला ४ वर्षं, मात्र सीबीआय गप्पच!

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्षं झाली. परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज मुंबईत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

भारतीय जनता पार्टीने सुशांतच्या आत्महत्त्येला हत्त्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. परंतु तपासाला चार वर्षे झाली तरी सीबीआय यावर गप्प आहे. भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, असे ते म्हणाले.

सुशांत

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येचेही भाजपाने राजकारण केले. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. अत्यंत प्रथितयश म्हणून मान्यताप्राप्त अशा एम्स या संस्थेनेही त्यांच्या अहवालात आत्महत्त्याच असल्याचे स्पष्ट केले. त्याला आता १४०० दिवस उलटले आहेत. भाजपाने केवळ हीन राजकीय हेतूने मुंबई पोलीस, मविआ सरकारची बदनामी केली व सुशांतसिंहच्या कुटुंबियांनाही वेठीस धरले. तीन-तीन तपासयंत्रणांचा वापर करण्यात आला. अनेकांचा तपासात छळही केला.
सुशांतसिंहप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे, अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली आहे. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येस आज १४६० दिवस झाले. पण सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

सुशांतसिंह राजपूतप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले. बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला. मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखून भाजपासंचालित वृत्तवाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजपाच्या आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार करून अपप्रचार केला, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content