Details
26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”
“केएचएल न्यूज ब्युरो