Homeडेली पल्स22 आभासी न्यायालयांनी...

22 आभासी न्यायालयांनी हाताळली तब्बल सव्वातीन कोटी प्रकरणे!

‘दूरदृश्य प्रणालीमार्फत काम करणारे न्यायालय’ या संकल्पनेचा उद्देश न्यायालयात वादी किंवा वकिलाची उपस्थिती अनिवार्य न ठेवता या प्रणालीमार्फत खटल्यांचा निकाल देणे हा आहे. सध्या, ही न्यायालये केवळ वाहतूक चालान संबंधित प्रकरणे हाताळत आहेत. यामुळे केवळ खटल्यांचा खर्च कमी झाला नाही तर वाहतूक चालान प्रकरणे सोडवण्याची प्रक्रियादेखील सुलभ झाली आहे. 30.06.2023 पर्यंत 22 आभासी न्यायालयांद्वारे 3.26 कोटींहून अधिक प्रकरणे (3,26,14,617) हाताळण्यात आली आहेत आणि 39 लाखांहून अधिक (39,16,405) प्रकरणांमध्ये 419.89 कोटी रुपयांहून अधिक ऑनलाईन दंड वसूल करण्यात आला आहे.

न्यायालयीन संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करता यावा तसेच वादींना क्षुल्लक विवादांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. न्यायाधीश, आभासी इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर हे आभासी न्यायालय चालवू शकतात. तसेच हे न्यायालय 24X7 कार्य करू शकते आणि या न्यायालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात विस्तारलेले असू शकते.

आभासी न्यायालयांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या संपूर्ण भारतातील खटल्यांची तपशीलवार माहिती परिशिष्ट- I मध्ये दिलेली आहे. 

30.06.2023 पर्यंत 18 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी 22 न्यायालये कार्यरत आहेत- दिल्ली (2), हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ (2), महाराष्ट्र (2), आसाम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर (2), उत्तर प्रदेश, ओडिशा, मेघालय, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि राजस्थान. 

परिशिष्ट I

देशभरातील आभासी न्यायालयांद्वारे हाताळल्या जाणार्‍या खटल्यांचे तपशीलवार विभाजन खालीलप्रमाणे आहेः 

StatisticsofVirtualCourts-30.06.2023
S. NoEstablishment NamePaid ChallansChallan Amount
1ASSAM TRAFFIC DEPARTMENT1902213159081
2CHHATTISGARH TRAFFIC DEPARTMENT3781500
3GUJARAT TRAFFIC DEPARTMENT2718171300
4HARYANA TRAFFIC DEPARTMENT1699212638701
5HIMACHAL PRADESH TRAFFIC DEPARTMENT19544011753
6JAMMU TRAFFIC DEPARTMENT3861321420590
7KARNATAKA TRAFFIC DEPARTMENT40576338437490
8KASHMIR TRAFFIC DEPARTMENT7523141025995
9KERALA(POLICE DEPARTMENT)5471728393893
10KERALA TRANSPORT DEPARTMENT79969115151882
11MADHYA PRADESH TRAFFIC DEPARTMENT18531315300
12MAHARASHTRA TRANSPORT DEPARTMENT14492348605
13MEGHALAYA TRAFFIC DEPARTMENT3320000
14NOTICE BRANCH DELHI TRAFFIC DEPARTMENT1344606954951505
15Odisha Traffic CTC-BBSR COMMISSIONERATE2061519894001
16PUNE TRAFFIC DEPARTMENT591114250
17RAJASTHAN TRAFFIC DEPARTMENT97086276170
18TAMIL NADU TRAFFIC DEPARTMENT78188718829890
19TRIPURA TRAFFIC DEPARTMENT42900
20UTTAR PRADESH TRAFFIC DEPARTMENT501614298422756
21VIRTUAL COURT DELHI(TRAFFIC)16245551618662492
22WEST BENGAL TRAFFIC DEPARTMENT33602039452
Total39164054198908506

ही माहिती कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content