27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिकमधील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2021च्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री, निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते देशभरातील पंधरा तरुणांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी युवा कार्य मंत्रालयाच्या संचालिका वनिता सूद, युवा कार्य मंत्रालयाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा पुरस्कार 15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. तरुणांमध्ये समाजाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे, जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक वाढीस चालना देणे, हे या पुरस्काराचे उद्दीष्ट आहे.
राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे–
1. अधी दैव (17), गुरुग्राम, हरियाणा
2. अंकित सिंग (29), छतरपूर, मध्य प्रदेश
3. बिसाथी भारत (28), अनंतपुरम, आंध्र प्रदेश
4. केवल किशोरभाई पावरा (27, बोताड, गुजरात
5. पल्लवी ठाकूर (२६), पठाणकोट, पंजाब
6. प्रभात फोगट (25), झज्जर, हरियाणा
7. राम बाबू शर्मा (28), जयपूर, राजस्थान
8. रोहित कुमार (29), चंदीगड
9. साक्षी आनंद (२६), पाटणा, बिहार
10. सम्राट बसाक (28), धलाई, त्रिपुरा
11. सत्यदेव आर्य (30), बरेली, उत्तर प्रदेश
12. वैष्णवी श्याम गोतमारे (26), अकोला, महाराष्ट्र
13. विधी सुभाष पलसापुरे (26), लातूर, महाराष्ट्र
14. विनिशा उमाशंकर (17), तिरुवन्नमलाई, तामिळनाडू
15. विवेक परिहार, उधमपूर, जम्मू आणि काश्मीर