Homeकल्चर +मुंबई महापालिकेच्या खात्यांतर्गत...

मुंबई महापालिकेच्या खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेची नामांकने जाहीर!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय – खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. या स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले परिसरातील पालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२३ या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत पालिकेच्या विविध विभागांतील २१ खाते, विभागांनी सहभाग नोंदविला. यापैकी १० खाते, विभागांच्या नाटकांना नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेचा अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या १३ एप्रिल २०२३ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रभारी प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी दिली.

पालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने गेली ५० वर्षे कामगार-कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन नियमितपणे केले जात आहे. यामध्ये आंतरविभागीय नाट्यस्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या अधिपत्याखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या ५१ व्या आंतरविभागीय-खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत अतिशय आशयपूर्ण नाटकांचे कलात्मक अविष्कार सादर करण्यात आले. यामुळे यंदाची स्पर्धा ही अत्यंत चुरशीची आणि उत्सुकता व उत्साह वाढविणारी ठरली आहे. या स्पर्धेचे अंतिम निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या स्पर्धेच्या परीक्षणची जबाबदारी दीपश्री चाफेकर, अनंत सुतार व मंगेश नेहरे यांनी पार पाडली. या स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ नाट्य-सिने कलावंतांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या नाट्यस्पर्धेचे सुव्यवस्थित नियोजन सुनील जांगळे यांनी केले; तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय कामगार कल्याण अधिकारी प्रवीण नगराळे आणि त्यांच्या चमुने विशेष परिश्रम घेतले.

या नाटकांना मिळाली नामांकने

१) नाटक ‘निर्वासित’; सादरकर्ते ‘आर मध्य’ विभाग, बोरिवली 

२) नाटक ‘माझा खेळ मांडू दे’; करनिर्धारण व संकलन (मुख्यालय) विभाग 

३) नाटक ‘जेंडर अॅन आयडेंटिटी’; केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय 

४) नाटक ‘लोकोमोशन’; सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग 

५) नाटक ‘आत्मकथा’;  जल अभियंता विभाग 

६) नाटक ‘घंटानाद’; सहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग  

७) नाटक ‘ती रात्र’; सहाय्यक आयुक्त ‘एच पूर्व’ विभाग 

८) नाटक ‘निर्वासित’ ; घनकचरा व्यवस्थापन विभाग  

९) नाटक ‘सुरू’; प्रमुख कर्मचारी अधिकारी 

१०) नाटक ‘क्षुधाग्नि’; बा. य. ल. नायर रुग्णालय 

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content