Details
५९व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे नुकतंच नाशिकचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते, कला संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ चित्रकार अनिल सोनार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. महात्मा फुले कला दालनात झालेल्या उद्घाटनानंतर कालीदास कलामंदिरात उद्घाटनपर कार्यक्रम झाला. यावेळी शासनातर्फे अनिल सोनार यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना गौरवित करण्यात आले. सन्मानाबद्दल शासनाचे आभार मानून सोनार यांनी आपला जीवनपट उलगडला. यावेळी बोलताना मिश्रा यांनी विजेत्या कला विद्यार्थ्यांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याची घोषणा केली. विविध गटातील विजेत्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर, कलाप्रेमी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनात ९५० कलाकृती मांडण्यात आल्या असून हे प्रदर्शन २८ जानेवारी २०१९ पर्यंत पाहण्यासाठी मोफत खुलं आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो