Details
हरले कोण? गांधी की काँग्रेस?
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
राहुल गांधी हे काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी काळ पदावर राहिलेले अध्यक्ष ठरणार असे दिसते. एकतर आधी ते अध्यक्षपद घ्यायला तयार नव्हते आणि आता अध्यक्षपद सोडण्यावरच हटून बसलेले आहेत. गुजरात निवडणुकानंतर ते पक्षाचे अध्यक्ष बनले आणि आता लोकसभेनंतर पक्षाचे माजी अध्यक्ष हे बिरूद लावून बसले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्याला आता महिना उलटून गेला आहे. पण तरीही काँग्रेस मात्र अद्याप निकालांच्या आणि राहुल पद सोडतात या अशा दोन्ही धक्क्यांतून सावरताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम, सर्वच पक्षांच्या पराभवाचे मान तितकेच मोठे होते. पण हे सारे पक्ष त्या धक्क्यातून स्वतःला सावरून पुढच्या कामाला लागलेले दिसतात. पुढच्या चार महिन्यात पवारांना विधानसभा निवडणुकीच्या संघर्षाला तोंड द्यायचे आहे. हातपाय गाळून त्यांना चालणारच नाही. या सर्वांपेक्षा खरेतर काँग्रेस पक्षाची स्थिती बरी आहे. काँग्रेसच्या एकूण संख्येत आठ जागांची भरच पडली आहे. पण राहुल गांधींची व त्यांच्या सल्लागारांची अपेक्षा होती की या जागांच्या संख्येत थेट दोनशे जागांची भर पडेल. ते झाले नाही म्हणून काही प्रमाणात राहुल गांधी निराश झाले असतील व काँग्रेसचे नेतेही हताश झाले असतील तर ते समजून घ्यायलाही हरकत नाही. पण आता महिन्याभरानंतरही काँग्रेसमध्ये निर्णय कोण घेणार आहे, कोण घेऊ शकतो याची अजिबात स्पष्टता नाही.
इतक्या मोठ्या पक्षासासाठी हे योग्य नाही. देशासाठीही मोठ्या विरोधी पक्षाची अशी वाताहत होणे योग्य नाही. प्रत्येक संघटनेत सुधारणेला नेहमीच वाव असतो. तसा तो एकशे साठ वर्षांच्या जुन्या काँग्रेस पक्षामध्येही आहेच. त्या सुधारणांसह काँग्रेसने कात टाकून नवी झळाळी घेऊन उठावे. हे कसे होणार, नेतृत्त्व कोण करणार आणि मुख्य म्हणजे गांधी कुटुंबियांची या नव्या पक्षात कोणती भूमिका असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला सापडत नाहीत असे दिसते. राहुल गांधी या पराभवानंतरच्या पहिल्याच काँग्रेस कार्यकरिणीच्या बैठकीत राजीनामा देऊ केला, तो त्यांनी अद्यापी मागे घेतलाच नाही. पराभवाची मिमांसा करताना राहुल यांनी त्या बैठकीत आजी माजी मुख्यमंत्री व नेत्यांनी आपापल्या मुलांच्या तिकिटांसाठी दबाव आणला होता अशी व्यथा बोलून दाखवली. कमलनाथ व अशोक गेहलोत या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांची मुले, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह असे नेते पराभूतच झाले. दिग्विजय सिंहांचा भोपाळमधील पराभव काँग्रेसला अधिक जिव्हारी लागला. कारण त्यांच्या विरोधात भाजपाने हिंदुत्वाचे प्रतिक ठरलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उभे केले. भगवा दहशतवाद हा सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, पी. चिदंबरम व दिग्विजय सिंह यांचा लाडका शब्द होता. शिंदेंच्या विरोधात भाजपाने लिंगायत धर्माचे प्रमुख स्वामी उभे केले होते. भगवा दहशतवाद या नावाखाली भाजपाला व हिंदुत्वाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची जुनी खेळी या वेळी उलटली.
राहुल गांधी यांनी या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली तर भगिनी व काँग्रेस कार्यकारिणीत नव्याने दाखल झालेल्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी कार्यकारिणीच्या अन्य साऱ्याच नेत्यांवर तोंडसुख घेतले. राहुल हे एकाकी लढले अशी खंत प्रियंका यांनी व्यक्त केली. जेव्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेन्र्ल मोदींच्या विरोधात राफाल लढाऊ विमानांचे प्रकरण लावून धरले तेव्हा कार्यकारिणीतील कोणीही नेत्याने ते प्रकरण तितक्याच हिरिरीने उचलून धरले नाही, असे बोल प्रियंका यांनी सुनावले. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल त्या बैठकीतून बाहेर पडले तेव्हा काँग्रेसमध्ये भूकंप झाला. तेही सहाजिकच होते. पण काँग्रेसवाल्यांना वाटले की राहुल यांचा नाराजीनामा हे एक नाटक ठरेल. रागाने व उद्वेगाने राहुल यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे अन्य पर्यायच नाही, हे त्यांनाही पुरतेपणाने माहित आहे. त्यामुळे थोड्या दिवसांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे राहुल गांधी मान तुकवतीलच आणि गांधींशिवाय काँग्रेसचे अध्यक्षपद ही स्थिती पाहयला मिळणार नाही.
राहुल यांनी आतापर्यंत तरी आपला पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय ठाम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी काँग्रेस मुख्यालयाकडे फिरकणे थांबवले आहे. ते राजीनामा कार्यकारिणीत फेकून जे निघून गेले ते प्रसिद्ध अशी आपली परदेशी सुट्टी उपभोगून लोकसभेत शपथ घेण्यासाठीच अवतरले. या सर्व काळात ते पक्षकार्यापासून दूरच राहिले आहेत. लोकसभेतील नेतेपदही त्यांनी नाकारले आहे आणि तिथे पाच वेळेचे खासदार असणारे अधीर रजंन चौधरी यांची नियुक्ती पक्षाने केली व तीही लोकसभा सुरू झाल्यानंतर! सध्या सोनिया गांधी यांच्याच अध्यक्षतेखाली पक्षाच्या महत्त्वाच्या काही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या संसद सदस्यांची जी परवा बैठक पार पडली त्याचेही नेतृत्व्क सोनिया यांनीच केले. तिथे सर्वच खासदारांनी राहुल यांनीच अध्यक्षपदी कायम राहवे अशी विनवणी केली. पण राहुल यांनी ती पुन्हा फेटाळून लावली. पक्षाने नवा अध्यक्ष निवडावा असा सल्ला त्यांनी दिला. आता काहीतरी निर्णय लवकरच घेण्याशिवाय काँग्रेसला पर्याय उरलेला दिसत नाही. त्यांच्यापुढे पर्याय मर्यादित आहेत किंवा खरेतर काँग्रेसच्या नेतेपदी राहुल वा प्रियंका यांच्याशिवाय तिसरे नावच त्यांना भावत नाही.
सोनिया गांधी या मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेल्या आहेत. त्या पुन्हा अध्यक्ष होणे त्यांच्या नाजूक प्रकृतीला मानवणारे दिसत नाही. तशाही त्या संसदपटू म्हणून प्रसिद्ध नाहीतच. त्यांची भाषणेही उत्स्फूर्त व लोकांना उत्साहित करणारी नसतात. त्यामानाने राहुल व प्रियंका हे दोघेही कार्यकर्त्यांना कामासाठी प्रवृत्त करणारी भाषणे देऊ शकतात. संवादही साधू शकतात. पण आता गांधी घरण्यातील कोणीही अध्यक्ष असणार नाही हेही राहुल यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तेव्हा काँग्रेसपुढे ए. के. अँटनी, अशोक गेहलोत, कमलनाथ, दिग्विजय सिंह, अहमद पटेल अशी काही ज्येष्ठांची नावे आहेत. रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट व ज्योतिरादित्य अशी तरूण तडफदार नेत्यांचीही फळी आहे. पण ही निवड केली जात असताना गांधी घराण्याला मान्य असणारेच नाव निवडणे ही अपरिहार्यता आहेच. फार तडफदार नेत्यांना जुन्या जाणत्यांची मान्यता नाही आणि काही जुनी खोडे राहुल यांना चालणार नाहीत असा तो पेच आहे. महाराष्ट्रातीलही दोन-तीन काँग्रेस वर्तुळात दिसतात. महाराष्ट्राचे तीन माजी मुख्यमंत्री या स्पर्धेत आहेत. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण! हरयाणाचे भूपींदर सिंह हुडा व दिल्लीच्या शीला दीक्षित हेही माजी मुख्यमंत्री नेतृत्त्वासाठी पुढे येऊ शकतात. पण बहुधा या सर्व नेत्यांचा समावेश असणारे एक नेतृत्त्व मंडळ करण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकारिणी करेल वा त्यांच्यापैकीच एका नेत्याचे नाव कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढे येईल.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी