HomeArchiveसुरक्षाव्यवस्था मोदींची!

सुरक्षाव्यवस्था मोदींची!

Details
सुरक्षाव्यवस्था मोदींची!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर ९ जानेवारी रोजी येत आहेत. मात्र, दोन “देशमुखी” वादात हा दौरा अडकला आहे. यामुळे प्रशासन हतबल झालेय. अलीकडेच आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक सुरक्षेत मोदींचं होणार आगमन.

कशी आहे ही व्यवस्था?

पंतप्रधान झाल्याच्या दिवसापासून, किंबहुना त्या आधीपासून नरेंद्र मोदी ‘हिटलिस्ट’वर आहेत. गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर २००२मध्ये उसळलेल्या दंगलीनंतर मोदींचे नाव जगभरात गेलं. ते कट्टरवाद्यांच्या हिटलिस्टवर आले नसते तर नवलच! आज पंतप्रधान होऊनही या दंगलीसाठी त्यांना दोषी ठरवत झोडपले जातेय. वास्तविक कोणत्याही न्यायालयाने त्यांना थेट जबाबदार धरलं नाहीये. पण, राजकारण साधणे हाच अनेकांचा विषय. पण, आपला तो नाहीये.
एका घटनात्मक पदावरील जबाबदार व्यक्तीस सुरक्षा पुरविणे हे शासन म्हणून यंत्रणेचे कर्तव्य आहेच. पंतप्रधान मोदी साई शताब्दी महोत्सवनिमित्त शिर्डीत आहेत. काही दिवसांपूर्वीच आसाममधून दिल्ली पोलिसांना मेल करून मोदींना उडविण्याची धमकी दिली गेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हत्येनंतर विशेष सुरक्षा दलाची स्थापना केली गेली. अत्यंत खडतर प्रशिक्षण देऊन यात कर्मचारीवर्गाची निवड केली जाते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप S P G या नावाने ओळख असणाऱ्या या विभागाची निर्मिती संसद अधिनियमानुसार कलम ४:१(५) अन्वये १९८८मध्ये झाली.

त्यापूर्वी म्हणजे १९८१पर्यंत पंतप्रधान आणि त्यांच्या निवास संरक्षणची जबाबदारी दिल्ली पोलीस उपायुक्तांच्या हाताखालील विशेष शाखेकडे होती. I B च्या सांगण्यानुसार विशेष दल दिल्ली नि बाहेरच्या भागात सुरक्षा पुरवीत होते. इंदिराजीच्या हत्त्येनंतर याचा आढावा घेतला गेला. सुरक्षा देणाऱ्या जवानाकडून हत्त्या ही बाब गंभीर होती. सचिव समितीने निर्णय घेत एका अधिकारीमार्फत सुरक्षायंत्रणेची जबाबदारी देऊन पंतप्रधान देशात, बाहेर कुठेही असले तरी संरक्षण देणं अनिवार्य केलं. त्याचं रूपांतर पुढे एस. पी. जी.त झालं. आता स्वतंत्र दर्जाचा संचालक हे काम पाहतो.

काय वैशिष्ट्यं असतात…

अत्याधुनिक प्रकारच्या हत्यार कौशल्याचं प्रशिक्षण यातील जवानांना दिले जातेच. शिवाय नियुक्तीआधी त्यांची इत्यंभूत माहिती परिवारासह घेतली जाते. ही माहिती सरकारजमा असते. अनेक हत्यारं, मैदानी कसरती, मानसिक चाचणी होत असते. ठराविक काळानंतर हे सर्व होतच असतं. यातील कमांडोकडे एफ. एन. एफ. -2000 असॉल्ट रायफल, जी पूर्णतः ऑटोमॅटिक असते. शिवाय ग्लोक- 17 बनावटीचं पिस्तूल असतं. सहकारी नि वरिष्ठांशी संपर्कासाठी कानात इअरप्लग किंवा वॉकीटॉकी मदतीला दिली जाते. स्वसुरक्षेसाठी हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेटही असते. दिसायला पंतप्रधानासोबत ठराविक रक्षक दिसले तरी ते विविध टप्प्यात कडे करून भोवती असतात. भारतीय सेना नि पोलीस दलातून यांची निवड होते. ड्रायव्हरपासून अगदी खासगी रक्षकही एस. पी. जी.चे असतात. त्यांना चेहऱ्यावर कसलेही हावभाव दाखवण्यास मनाई असते. अगदी प्रेमाचं कोणी समोर आलं तरीही स्थितप्रज्ञ राहणे हा प्रशिक्षणचा भाग असतो. काहींकडे एफ. एन. हरस्टल- 57 बंदूक आणि ग्लॉक – 12 हे प्रकारचे विशिष्ट हातमोजे असतात, जे अपायापासून वाचवतात. त्यांचे बूटही असे बनतात की कोणत्याही पृष्ठभागावरून घसरणार नाहीत. काळा चष्मा घालून ते सर्वच ठिकाणी लक्ष ठेवतात. पण, नेमकं कुठे बघतात हे कळू नये अशी त्याची बनावट असते.

सार्वजनिक कार्यक्रमस्थळी चारही बाजूंनी कमांडोचा घेरा पंतप्रधानभोवती असतो हे आपण सर्वजण पाहतोच. शिवाय पंतप्रधान गाडीत बसणे नि उतरतेवेळी कमांडो मदत करतात. मागे पुढे दोन जॅमर लावलेल्या गाडया चालतात, ज्यांच्या डोक्यावर मोठी काठी दिसते, तो अँटेना असतो जो रस्त्याच्या दोन्ही बाजूला शंभर मीटर अंतरापर्यंत शोध घेऊन स्फोटके निष्क्रीय करू शकतो. कुठल्याही दौऱ्याआधी एस. पी. जी. स्थानिक पोलिसांसह त्या भागाचा दौरा करतात. जेणेकरून, सुरक्षाव्यवस्थेत त्रूटी राहू नयेत. पंतप्रधान ताफ्यात आकस्मिक स्थितीत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून एक रूग्णवाहिका असते. खास विशिष्ट सुविधा असलेली बुलेटप्रूफ बी. एम. डब्ल्यू. – 7 गाड्यामधून प्रवास पी. एम.ना सक्तीचा आहे. हल्लेखोर भ्रमित व्हावेत म्हणून तशा दोन गाड्या सोबत पळत असतात. या गाड्या कोणत्याही हल्ल्यास तोंड देण्याच्या क्षमतेच्या आहेत. हे कमी म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे वाहन – विमानदेखील हत्यारांनी सुसज्जित असते. कोणत्याही प्रकारच्या जमिनी, हवाई, रासायनिक हल्ल्याला तोंड देण्यास हा ताफा तत्पर असतो.

यासाठी जिल्हा यंत्रणा धावपळ करू लागलीय. जिल्हाधिकारी, पालिका, पोलीस आयुक्त, अधीक्षक, आदींच्या बैठका झाल्या. पालकमंत्री विजयकुमार देशमुख नि सहकारमंत्री सुभाष देशमुख हे राजकीय लाभासाठी ही सभा आपल्या मतदारसंघात घेण्यास प्रयत्नशील आहेत. जुन्या सोलापुरातील अंबर हॉटेल मैदान, विजापूर रोड अध्यापक विद्यालय, सिद्धेश्वर कारखाना, विष्णू मिल या मैदानांची पाहणी झाली आहे. पालकमंत्री विष्णू मिल मैदानावर सभा घेण्यास ठाम आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या सभेचा मार्ग मोकळा झाला असून सोलापूर पार्क मैदानावर त्यांची सभा होईल. त्यामुळे शहरात सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. या सभेनं दोन्ही दोशमुखांमधला वाद कमी व्हावा ही अपेक्षा!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content