Details
साहित्य संघ मंदिरात आज रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रदर्शन सोहळा जयंत सावरकर आणि विनायक थोरात पुरस्काराचे मानकरी
01-Jul-2019
”
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांना रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आज म्हणजेच गुरूवारी मुंबईतल्या गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघमंदिर येथे आयोजित सोहळयात प्रदान करण्यात येणार आहे.
जयंत सावरकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार व विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि पाच लाख रूपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी बाबा पार्सेकर व निर्मला गोगटे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि नवनिर्वाचित नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या विशेष उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा कलंदर, हा कार्यक्रम प्रथितयश कलावंत सादर करणार आहेत. रवी पटवर्धन, प्रमोद पवार, वसंत इंगळे, अतुल परचुरे, नाटकहाच मुलाचा टीमचे कलाकार, संपदा माने, अविनाश खर्शीकर आणि जयंत सावरकर हे कलाकार नाट्यप्रवेश सादर करतील. श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, कल्याणी जोशी, आोंकार कानडे, हनुमंत रावडे, सूर्यकांत सुर्वे, विघ्नेश जोशी आणि कीर्ती शिलेदार हे कलाकार नाट्यसंगीत सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन कौस्तुभ सावरकर यांची आहे. नाट्यगीतांना साथसंगत संजय गोगटे आणि विनायक थोरात करणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालिका स्वाती काळे यांनी केले आहे.”
“ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांना रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आज म्हणजेच गुरूवारी मुंबईतल्या गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघमंदिर येथे आयोजित सोहळयात प्रदान करण्यात येणार आहे.