HomeArchiveसमता परिषदेचे रक्तदान...

समता परिषदेचे रक्तदान शिबिर संपन्न!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबईतल्या गोरेगाव दिंडोशी संतोष नगर येथील हनुमान मंदीर सभा मंडपात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बाधित रुग्णांना मदतीचा हात देताना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष सोपान शेळके, चिटणीस रघुनाथ कोट्टारी, डॉ. चंद्रमोहन होळबे व तालुका अध्यक्ष विलास घुले यांचा मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ”
  

 
“राष्टवादी काँग्रेसचे उत्तर पच्छिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यानी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी एकूण 91 जणांनी रक्तदान केले तर त्यातील 13 जण काही कारणास्तव बाद झाले 61 रक्ताच्या पिशव्या (बाटल्या) जमा झाल्या व प्लाज्मा थेरेपी नोंदणीकरिता 17 जणांनी नावे नोंदवली, असे कोटटारी यानी सांगितले. संपूर्ण मुंबईत आजवर याच काळात 24 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केली होती व सुमारे 700 हून अधिक पिशव्या (बाटल्या) रक्त जमा केले, असेही ते म्हणाले.”
 
“शिबिरास शिवसेना नगरसेवक तुळशीराम शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश चाळके, महिला अध्यक्षा राधिमी मोरे तसेच काँग्रेसचे पधाधिकारी राकेश यादव व मारूती उगले उपस्थित होते.”

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content