HomeArchiveसकस मनोरंजनाला प्राधान्य...

सकस मनोरंजनाला प्राधान्य द्या – डॉ. मोहन आगाशे!

Details
सकस मनोरंजनाला प्राधान्य द्या – डॉ. मोहन आगाशे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप
जंक फुड टाळून आपण सकस अन्न खाल्लं पाहिजे. तसंच दर्जेदार मनोरंजनाकडे आपण वळलं पाहिजे. आज मोबाईलच्या जमान्यात माणूस एकटा पडत चाललाय. थिएटरमधे न जाता तो मोबाईलवर सिनेमा बघतोय. उंदराने लेंड्या टाकाव्यात तसा तो सगळीकडे फोटो टाकत सुटलाय. एखादी गोष्ट तो डोळ्यांनी पाहायची विसरून गेलाय. हे चुकीचं आहे. आज बायोपिक बनवले जाताना नको तेवढी तथाकथित सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते. मग तो बायोपिक तरी कसा म्हणायचा, असं परखड मत प्रख्यात अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी कोहापुरात व्यक्त केलं. मी माझं म्हणणं मांडत असताना कदाचित मला थांबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या (kiff) समारोप प्रसंगी ते बोलत होते. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूरला आयनॉक्समधे kiff सुरू होता. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हे आयोजक होते. च्रंद्रकांत जोशी आणि दिलीप बापट यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांना दर्जेदार सिनेमांची मेजवानी मिळाली. परवा या फेस्टीवलचा समारोप आणि मराठी सिनेमांच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले.

दि. बा. मोकाशींच्या आमोद सुनियासी आले, या कथेवर आधारित ‘दिठी’ हा पावसाचा आणि अध्यात्माचा विलक्षण अनुभव देणाऱ्या सुमित्रा भावे दिग्दिर्शीत चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर प्रेक्षक पसंतीचा आणि सर्वोत्कृष्ट दिगृदर्शनाचा पुरस्कार कोल्हापूरची निर्मिती असलेल्या इमॅगो या तरल भावस्पर्शी सिनेमाला मिळाला. लेखक दिग्दर्शक करण चव्हाण आणि विक्रम पाटील. हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाने बघितलाच पाहिजे.

‘म्होरक्या’ या अफलातून सिनेमाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. लेखक दिग्दर्शक अमोल भारत देवकर. बार्शी ह्या दुष्काळी भागात चित्रित झालेला हा सिनेमा अजब आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणारे हे तिन्ही सिनेमे बघणं प्रेक्षकांना कंपलसरी आहे. सिनेमाचे बारकावे टिपता यावेत म्हणून यंदापासून हा महोत्सव आयनॉक्समधे आपण घेत आहोत असं चंद्रकांत जोशी यांनी सांगितलं तर सिनेमा म्हणजे आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे, ठेव आहे. म्हणून सिनेमा प्रामाणिकपणे केला पाहिजे असं सुमित्रा भावे यांनी सांगितलं. बाबुराव पेंटर पुरस्कारविजेते संकलक अमोल देशपांडे यांनीही आपलं मनोगत अत्यंत थोडक्यात एडिट करून कथन केलं. विजय तेंडुलकरना आपण शेवटच्या काळात भेटायला गेलो होतो, तेव्हा मी संकलक आहे असं कळताच ‘भागतं का’ असं त्यांनी विचारलं होतं. छोटी-मोठी कामं मिळतात. त्यामुळे भागतं असं म्हटल्यावर आणि नाही असं म्हणूपण नकोस, असं त्यांनी सांगितल्याची एक हळवी आठवण त्यांनी सांगितली. सर्व पुरस्कारविजेत्यांनी आपली मनोगत दोन-दोन मिनिटांत नेमकेपणाने व्यक्त केली. त्यामुळे समारोपाचा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला.”
 
“डॉ. सई लळीत, कोल्हापूर

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content