Details
शेक्सपिअर अमर रहे!
30-Jun-2019
”
संजय डहाळे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक
विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला आज २०१८ साली चक्क ४०२ वर्षे उलटली तरी त्याची जादू ही कायम आहे. याच वर्षी पुन्हा एकदा नव्या तंत्रामंत्रासह दिमाखात शेक्सपिअरचे गाजलेले हॅम्लेट नाटक मराठी रंगभूमीवर आलंय. ही नोंद मराठी नाटय इतिहासात अक्षरश: दृष्ट लागण्याजोगी आहे. जागतिक दर्जाचे महानाटय असे ज्या संहितेने वर्णन करता येईल.
गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक, दामू केंकरे यांनी मराठी रंगभूमीवर हॅम्लेट सादर केलं होतं. आज २०१८ साली नव्या पिढीचा अभ्यासू अभिनेता सुमीत राघवन करतोय. राग, लोभ, प्रेम, मत्सर, बदला अशा भाव–भावनांचा सुरेख अविष्कार त्यात आहे. तुषार दळवी याचा कपटी काका हा खलनायक क्लॉडियस, हॅम्लेटची आई मुग्धा गोडबोले, राजकीय सल्लागार पोलोनियस–सुनील तावडे ही कलाकारांची चांगली भट्टी जुळली आहे. हे तीन अंकी नाटक कुठेही रेंगाळत नाही. त्याची भव्यता ही दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर यांनी निर्माते म्हणून सांभाळली असून चंद्रकांत कुलकर्णी यांचे कल्पक दिग्दर्शन आहे.
एका महानाटयाचा दिमखादार प्रयोग सध्या सुरू आहे. त्यामुळे विल्यम शेक्सपिअरची लेखणी आजही जिवंत आहे. त्याला जणू अमरत्वच असल्याचं प्रत्यंतर येतंय. शेक्सपिअर आणि मराठी नाटक हा विषय तसा जिव्हाळ्याचा. त्याचा मागोवा तेवढाच नाटयपूर्ण..
२३ एप्रिल १६१६ रोजी हा नाटकवाल्यांचा गुरु काळाआड गेला खरा. पण, एव्हढा प्रदीर्घ कालखंड उलटला तरी विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्यठेवा अजरामर ठरला आहे. फक्त ५२ वर्षांचं आयुष्य लाभलेला हा किमयागार होता. जो उभ्या दुनियेतल्या नाटकवाल्यांमध्ये पुरून उरला आहे.
मराठी रंगभूमीचा प्रदीर्घ कालखंड हा शेक्सपिअरचा प्रभावाखाली आहे. शेक्सपिअरचं ऑथेल्लोचं मराठी भाषांतर महादेव शास्त्री कोल्हटकर यांनी केलं. तो काळ १८६० वर्षाचा. हे मराठीतलं पहिलं शेक्सपिअरच्या नाटकाचं भाषांतर म्हणून ओळखलं जातं. तर विनायक जनार्दन किर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे हे नाटय आणि त्याची एकूण मांडणी व हाताळणी ही शेक्सपिअरच्या तंत्रमंत्राची आहे. किंग हेन्री द फोर्थ आणि फिफ्थ या दोन नाटकांच्या प्रभावाखाली किर्तने यांनी पेशवेवर नाटय लिहीले. संघर्षमय वातावरणात उभ्या दुनियेशी सामना करत जीवन जगलेले किंग हेन्री हे माधवराव पेशवेचे
असल्याचे एकूण जाणवत राहते. पेशवे काळातील एका शोकात्म हिरोचं जीवनपट किर्तने यांनी उभं केलंय. अशा प्रकारे शेक्सपिअरचं पहिलं मराठीतंलं भाषांतर हे ऑथेल्लो तर शेक्सपिअरच्या ऐतिहासिक नाटकावरून प्रेरणा घेऊन मराठीत थोरले माधवराव पेशवे हे पहिलं नाटय. त्यानंतर मराठी रंगभूमीवर अक्षरश: शेक्सपियर युगच जणू अवतरलं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांनीही नाटयलेखनात शेक्सपिअरचं तंत्र–मंत्र वापरलं.
द मर्चट ऑफ व्हेनिस या नाटकाचे रूपांतर आत्माराम विनायक पाटकर यांनी स्त्री न्याय चातूर्य या नावे केले. तो काळ १८७१ असा होता. त्यानंतर पुढल्या वर्षी म्हणजे १८७२ साली काशीनाथ गोविंद नातू यांनी ज्युलियस सीझरचं रूपांतर विज यशिंगच्या नाटयात केलं. नीलकंठ किर्तने यांचं टेम्पेस्ट नाटकही त्याच दरम्यान आलं. जे मूळ टेम्पेस्टचं भाषांतर होतं. द कॉमेडी ऑफ एर्स याचं पहिलं रूपांतर प्रधान व जठार या दोघा नाटककारांनी केलं. त्या १८७७ साली इचलकरंजी येथे प्रयोगही झाला. गुरूवर्य डॉ. कृ. रा. सावंत यांनीही त्याचे रूपांतर जुळा गोंधळ या नावे केला होता. दोन जुळ्या भावांचा सावळागोंधळ यात आहे. निव्वळ मनोरंजन व विनोद त्यात भरलेला. सही रे सही हे नाटकही त्याच मांडणीतलं आहे, हे विसरून चालणार नाही.
यानंतरचं वाचूया दुसऱ्या भागात….”
“संजय डहाळे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक