HomeArchiveशेक्सपिअर अमर रहे!...

शेक्सपिअर अमर रहे! भाग-२

Details
शेक्सपिअर अमर रहे! भाग-२

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संजय डहाळे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक

हॅम्लेट नाटक म्हणजे आजही मास्टरपीसच! अनेक नाटककारांना आजही ही संहिता खुणावते. काळ, देश, भाषा याची सारी बंधने या संहितेने पार केलीय. १८८३ च्या सुमारास गोविंद कानिटकर व गोपाळ आगरकर यांनी अनुक्रमे वीरसेन व विकारविलासित ही दोन नाटके लिहिली. रंगभूमीवरही ती आली. १९५७ साली नाना जोग यांनी तीन अंकी हॅम्लेट लिहीले. जे १९५७ यावर्षी ललित कला केंद्रातर्फे रंगभूमीवर आलं. नानासाहेब फाटकांनी १९६० साली हॅम्लेट मराठीत आणलं. प्रासंगिक रंगभूमीवरले नाटककार अरूण नाईक यांनी हॅम्लेट मॅक्बेथ आणि ऑथेल्लो यांची रूपांतरं केली. आंतरनाटय या प्रायोगिक नाटयसंस्थेने त्याचे प्रयोग केले. आचार्य अत्रे हेदेखील या नाटककारांचे जबरदस्त फॅन होते. किंग लियरचा त्यांनी सम्राटसिंह केला. गो. वि. करंदीकर यांनीही त्याच वर्षी राजा लियर लिहीले. कोल्हापूरच्या प्रत्यय संस्थेने त्याचा प्रयोगही केला. १९९० साली ए मिडसमर नाईटस ड्रिमचे रूपांतर ऐन वसंतात अर्ध्या रात्री केले. जे बघण्याचा योग आला होता.

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी टेम्पेस्ट सीझर, रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट या तीन नाटकांचे भाषांतर केले. २००१ ते २००३ चा तो सुमार होता. त्यातली काव्यात्मकता भूरळ पाडणारी होती. परशुराम देशपांडे यांनी हॅम्लेटचा संपूर्ण अनुवाद केला होता. ज्याचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केल्याचे आठवते. ज्येष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी मेझर फॉर मेझरचे रूपांतर सुमती विजय या नावे केले.

शेक्सपिअरची दिडशे एक नाटके ही मराठी रंगभूमीवर आली. अनेक नाटकांची प्रेरणाही मूळ नाटके ठरली. त्याच्या लेखनाचे तंत्र-मंत्र हे मराठी नाटककारांनी स्वीकारले. वसंत कानेटकर यांचं गगनभेदी, वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट याशिवाय मराठी नाटकांचा इतिहास पूर्ण होणार नाही आणि ही दोन्ही नाटके मराठी रसिकांच्या ह्रदयात कायम मानाचं पान निर्माण करणारी आहेत. ज्यावेळी शेक्सपिअर नाटयलेखन करीत होते. त्यावेळी महाराष्ट्रात संत एकनाथ हे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करीत होते. एकाच वेळच्या या दोन घटना खूप काही सांगून जातात.

२०१७ चे नवे वर्ष उजाडलं ते महाराष्ट्रातील मराठी रसिक व वाचकांसाठी शेक्सपीअरचा साहित्य ठेवा घेऊनच. मार्चपर्यंत हा अनमोल ठेवा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दर्शनार्थ खुला केला आहे. जो सर्वकालीन आहे. मराठी माणसाच्या ह्रदयात शेक्सपिअरचं स्थान व्यापून टाकणारं आहे. हेच पदोपदी एक नाटय अभ्यासक म्हणून जाणवत राहतं.

शेक्सपिअरची काही गाजलेली नाटकं

शोकांतिका – हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, रोमीओ अ‍ॅण्ड ज्युलिएट, मॅकबेथ, ज्युलियस सीझर, अ‍ॅन्टनी अ‍ॅन्डक्लिओपात्रा,

ऐतिहासिक – किंग हेन्री द सिक्स्थ, किंग रिचड द थर्ड, किंग रिचर्ड द सेकंड, किंग हेन्री द फोर्थ किंग हेन्री फिफ्थ.

सुखांतिका – द कॉमेडी ऑफ एर्स, मच अ‍ॅडो अबाउट नथिंग, अ मिउसमर नाईटस् ड्रीम, द मर्चट ऑफ व्हेनिस, अ‍ॅज यू लाईक इट.

काही नाटके – टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलिन, पेरिक्लीज, द विंटर्स टेल, किंग जॉन, द टेम्पेस्ट, किंग हेन्री द एटथ, ऑल इज वेल दॅट एण्डस वेल, मेझर फॉर मेझर, टायटेस अ‍ॅड्रोनिकस, लव्हज लेबर्स वास्ट.

पुढचं वाचूया पुढच्या भागात..”
 
“संजय डहाळे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content