HomeArchiveशिवसेनेला मलबार हिलमधून...

शिवसेनेला मलबार हिलमधून मिळाला सर्वात मोठा आधार!

Details
शिवसेनेला मलबार हिलमधून मिळाला सर्वात मोठा आधार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विजयात मलबार हिलची मुख्य भूमिका राहिली आहे. दक्षिण मुंबईच्या एकूण सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये १ लाख ६७ मताधिक्क्याने विजय झालेल्या सावंत यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून ५८ हजार ५६७ मतांची सर्वात मोठी लीड मिळाली.

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मलबार हिल क्षेत्रातून मिळालेल्या पराजयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी अनेक राजकीय पंडितांनी मिलिंद देवरा यांचा विजय निश्चिरत असल्याचे म्हटले होते. मारवाडी आणि गुजराती बहुतांश मतदार असलेल्या क्षेत्रांमध्ये देवरा यांच्या परिवाराचा मोठा जनाधार होता. मात्र यावेळी हा जनाधार पूर्णपणे सावंत यांच्या बाजूने उभे करण्यात आमदार लोढा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

शिवसेना उमेदवार अरविंद सावंत दक्षिण मुंबईमधून १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. सावंत यांच्या या विजयात मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगल प्रभात लोढा यांचं सर्वात मोठे योगदान राहिले. लोकसभा निवडणुकीआधीच मलबार हिल विधानसभा क्षेत्रात लोढा यांनी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारांची मोठी बांधणी सुरू केली होती. मतदानाच्या दिवशीही त्यांनी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील ५६ टक्के मतदान सुनिश्चित करून शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...
Skip to content