HomeArchiveशिवसेनेला उंबरा ओलांडावाच...

शिवसेनेला उंबरा ओलांडावाच लागेल!

Details
शिवसेनेला उंबरा ओलांडावाच लागेल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरण हेगडे
[email protected]

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या वेगवेगळ्या व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले लक्ष्य करत आहेत. मग ते मुंबईत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना असोत की, अयोध्येत एका पत्रकार परिषदेत असोत. की, पंढरपूरच्या विराट जाहीर सभेत असोत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यासारखे पारंपरिक विरोधक असोत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी, एमआयएम किंवा रिपब्लिकन पार्टीसारखे लहान-लहान पक्ष असोत, शिवसेनेचे पक्षप्रमुख कोणावरही काहीही बोलत नाहीत. सर्व विरोधक सध्या सत्ताधारी भाजपावर तुटून पडत आहेत तर त्यांच्या आक्रमणात शिवसेनेच्या आरोपांची भर पडत आहे. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे नेते काँग्रेसच्या प्रस्तावित महाआघाडीला सुरूंग लावण्याच्या प्रयत्नात काँग्रेसला घेरण्यासाठी जीवाचे रान करत आहेत आणि दिल्ली व मुंबईत सत्तेची चव चाखणारी शिवसेना मात्र विरोधकांच्या हातात हात घालून फेर धरत आहे.

सत्तेत दाखल झाल्यापासून शिवसेना भाजपाला आपले लक्ष्य करत आहे. सत्तारूपी मस्तवाल हत्तीवर अंकुश ठेवण्यासाठीच सत्तेत राहून आम्ही सरकारवर टीका करत होत, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात. टीका करताना कोणताही नवीन मुद्दा त्यांच्या भाषणात नसतो. एखादी गोष्ट जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी तीच तीच गोष्ट सारखीसारखी सांगणे, हे गोबेल्सचे तंत्र ठाकरे व्यवस्थितपणे वापरत आहेत. भाजपालाही याची सवय झाली होती व आहे. परंतु, निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेने राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून भाजपापुढे निर्माण केलेला पेच मात्र, भाजपाच्या नेत्यांना सतावत आहे. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवणे हा शिवसेनेचा रीतीरिवाज. एखादी चौकसभा असो की उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असो, प्रत्येक ठिकाणी शिवरायांचा पुतळा हवाच. आता त्याला श्रीरामाच्या तैलचित्राची जोड लाभली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचा पारंपरिक मतदार हे भाजपाचे मुख्य अस्त्र. शिवसेनेने भाजपाच्या या पारंपरिक व्होट बँकेतच हात घातल्याने भाजपाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. राममंदिराच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या वारीमुळे भाजपाला आणखीनच त्रास झाला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली त्यांची सत्ता गेली. या तिन्ही राज्यांमध्ये शिवसेनेनेही उमेदवार दिले होते. शिवसेनेचा उमेदवार कोठेही निवडून आला नाही. मात्र, भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अयोध्येपाठोपाठ राममंदिराच्या मुद्द्याला विशेष महत्त्व देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये विराट जाहीर सभा घेतली. अयोध्या भेटीत शरयू नदीच्या किनाऱ्यावर महाआरती केल्यानंतर पंढरपुरातही चंद्रभागेच्या तीरेवर उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब महाआरती केली. आता ते काशी, या पंतप्रधानांच्या मतदारसंघातच जाऊन राममंदिराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला जाब विचारणार आहेत. हा दौरा जर प्रत्यक्षात झाला तर ते भाजपाला अधिकच त्रासदायक ठरू शकेल.

भाजपाने मात्र शिवसेनेचे सारे नखरे झेलण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुद्द आपल्या दिल्ली दौऱ्यात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या भूमिकेला नखऱ्यांची उपमा दिली होती. शिवसेनेचे सर्व नखरे आम्हाला माहित आहेत. पण, ते भाजपाबरोबरच युतीत राहणार, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. अलीकडेच पंतप्रधान मुंबईच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा दौरा संपतो ना संपतो तेच भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत थडकले होते. या दौऱ्यात शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी दीर्घ चर्चा करून काही दिशानिर्देश दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्षाचे आमदार व मंत्री यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना सबुरीचा मंत्र दिला. शिवसेनेने कितीही टीका केली तरी त्याला प्रत्त्युत्तर न देण्याचा सल्ला देण्यात आला. भाजपाची ही खेळी म्हणजे शिवसेनेला ऐन निवडणुकीत धडा शिकवण्याचा पाया मानला जातो. भाजपाचा हा मुत्सद्दीपणा आहे. शिवसेना सत्तेत राहून रोजच्या रोज भाजपावर टीका करत असल्यामुळे सर्वसामान्य सिवसैनिकांमध्ये पक्षनेतृत्त्वाच्या भूमिकेबद्दल संभ्रम आहे. इतकी जहाल टीका करून शिवसेना जर उद्या युतीत राहिली तर शिवसैनिकांमधली चीड अधिकच तीव्र होईल याची भाजपाच्या नेत्यांना जाणीव आहे.

त्यामुळे युतीत लढणाऱ्या शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या जागा आपोआपच कमी होतील आणि जर शिवसेनेने युती न करता स्वतंत्र चूल मांडली तरी बहुरंगी लढतीत शिवसेनेला सामोरे जाणे भाजपाला फार कष्टदायक राहणार नाही. कारण सत्तेत राहण्याचे पाप सेनेने केलेच आहे. त्यामुळे सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या प्रचारातली हवा सहज काढता येईल, असा भाजपाचा आडाखा आहे. आणि समजा भाजपाला सर्वात मोठा पक्ष होण्याची संधी मिळाली तरी पुढे शिवसेनेची मदत घेण्याचा पर्यायही खुला राहील, असा भाजपाचा होरा आहे. परिणामी भाजपाने सध्यातरी हे कूटनितीचे धोरण अवलंबल्याचे दिसते. पण, हे चित्र फार काळ राहील असे नाही. स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या जाहीर सभेत युतीचा निर्णय जनतेवर सोडला आहे. ठाकरे यांची ही बदललेली भूमिका युतीच्या दृष्टीने पडलेले एक पाऊल मानले जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाच्या वेळीच विधानसभेच्या जागांचाही बटवारा व्हावा असा प्रयत्न शिवसेनेचा आहे. तर, शिवसेनेला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात भाजपा लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्याला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. अशावेळी संभ्रमाच्या गर्तेत सापडलेल्या शिवसैनिकांना नेमकी दिशा मिळणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वालाही याची कल्पना आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत शिवसेनेला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. या भूमिकेवरच सेनेच्या पुढच्या राजकारणाची दिशा राज्यातल्या जनतेला दिसेल. निर्णयाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवसेनेला फार काळ उंबऱ्यावर राहता येणार नाही. तो ओलांडावाच लागेल!”
 
“किरण हेगडे

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content