Details
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने यासाठी थेट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायऱ्या झिजवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्रीपद शिवसेनेने सोडले. त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर काढले गेले. त्यामुळे संसदेत त्यांच्यावर विरोधी बाकांवर बसणे भाग पडले. इतके करूनही आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याचे दिसू लागल्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक बिथरू लागले आहेत. मुंबईतल्या गिरगाव भागात शिवसैनिकांनी मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरूद्ध हिंसक आंदोलन केले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

