Details
शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग : डॉ. सुरेश हावरे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थांनातील १९५० कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यााचा निर्णय व्यावस्थापन समितीने घेतला असल्यााची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. तसेच फरकाची रक्काम कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार असून जुलै महिन्यासपासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याात येईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. हावरे म्हणाले की, संस्थानच्या आस्थापनेवर असलेल्याी कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याहबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र शासनाकडून प्राप्त झाले असून, पुढील निर्णय संस्थान व्यवस्थापन समितीने घ्याूवा असे म्हटले आहे. त्यानुसार संस्थानमधील कायम कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या वेतनापासून यांची कार्यवाही सुरू होईल.
या निर्णयामुळे फरकाच्या रक्कंमेपोटी ३७ कोटी तर पुढील वर्षासाठी २० कोटी असा ५७ कोटी रूपयांचा आर्थिक भार संस्थानावर पडणार आहे. १९५० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सोबतच सध्या अनुकंपा तत्त्वावर काम करत असलेल्या ६३ कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नर्सिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने ३३ कोटी वृक्षरोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थानने वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ केला असून यानिमित्ताने २०० झाडं लावण्यात आली. संस्थान पुढील काळात आणखी ३ हजार वृक्षलागवड करणार आहे. वृक्षलागवड चळवळीला व्यापक रूप यावे म्हणून परिसरातील सामाजिक संस्थांनी वृक्षरोपांची मागणी केल्यास संस्थानच्या वतीने मोफत रोपे देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेे मागच्या काळात चार प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यापैकी १११ कोटी रूपये खर्चाचे दर्शनरांगेचे काम प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात ते पूर्ण होईल. १५८ कोटी रूपये खर्चाचे शैक्षणिक संकुलाचे कामही वेगाने सुरू आहे. १० मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साई नॉलेज पार्क बीओटी तत्त्वावर उभारण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. ध्यानमंदिर उभारणीचे कामही येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संस्थाानने घेतली असून, अशी जबाबदारी उचलणारे हे देशातील एकमेव देवस्थान संस्थान आहे. संस्थानच्या वतीने २० टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प ही उभारण्यात येणार असल्यााचे डॉ. हावरे यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो