HomeArchiveव्होडाफोन आयडियाने केला...

व्होडाफोन आयडियाने केला होम क्रेडिटबरोबर करार!

Details

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“व्होडाफोन आयडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम सेवा प्रदाता कंपनीने नुकताच होम क्रेडिट इंडिया, या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच भारतात १० हजार रूपयांपर्यंत ग्राहकोपयोगी वित्तीय सेवा देणार्याा कंपनीबरोबर प्रथमच सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. या सहकार्य करारामुळे आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना वित्तीय सेवाही मिळणार असून विशेष करून अशा ग्राहकांना, ज्यांना आर्थिक सहकार्य मिळत नव्हते.”

होम क्रेडिट बरोबरच्या या भागिदारीमुळे आता केवळ ७९९ रूपयांचे डाऊन पेमेंटकरून व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड ग्राहकांना आता अधुनिक असा ४ जी स्मार्टफोन हा १८० दिवसांच्या वैधतेच्या प्लानसह उपलब्ध होणार आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्ससह दररोज १.५ जीबी डेटाही उपलब्ध होणार आहे.
 
 
ग्राहक आता आघाडीच्या ब्रॅन्डचा स्मार्टफोनची निवड करू शकतात. या फोन्सची सुरूवातीची किंमत रू ३९९९/- पासून सुरू होत आहे. मग तुम्ही निवड केलेल्या हॅन्डसेटची किंमत कितीही असो ग्राहकांना केवळ ७९९/- रूपयांचे डाऊनपेमेंट करायचे आहे. साधारणपणे बाजारपेठेतील निकषांनुसार हॅन्डसेटच्या किंमतीच्या ३०-४० टक्के रक्कम ही डाऊनपेमेंट म्हणून भरावी लागते.
 
 

 
 
 
” वरील तक्त्यावरून व्हीआयएलकडून दिली जाणारी ऑफर आणि बाजारपेठेतील अन्य हॅन्डसेट फायनान्स ऑफर्स यांचे तुलनात्मक चित्रण पाहणे शक्य होईल.
 
 
या भागिदारी विषयी बोलताना व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या मार्केटिंग विभागाचे ऑपरेशन्स डायरेक्टर अवनीश खोसला यांनी सांगितले की, “आमच्या ग्राहकांना सातत्याने योग्य मूल्य व मुल्याधारीत सेवा देण्यावर आम्ही लक्ष देत असतो. ग्राहकांना ४जी हॅन्डसेट्स उपलब्ध व्हावेत यासाठी होम क्रेडिटबरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागिदारीमुळे देशभरांतील कोट्यावधी मोबाईलफोन धारकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सहकार्य मिळेल, विशेषकरून अशा लोकांना ज्यांना याआधी कधी कर्ज मिळालेले नाही आणि त्यांना स्मार्टफोन घेण्याची इच्छा तर आहेच. पण ते एकरकमी पैसे खर्च करून तो घेऊ शकत नाहीत. या बंडल्ड अशा टेलिकॉम ऑफरमुळे ४जी वापरत नसलेल्या ग्राहकांना मोबाईल इंटरनेटचा अनुभव तर मिळेलच पण त्याचबरोबर व्होडाफोन आयडियाचा अनोखा अनुभव घेण्याचीही संधी मिळणार आहे.”
 
 
या भागिदारीच्या सुरूवातीमुळे सध्याच्या व्होडाफोन आयडिया ग्राहकांना ४जी स्मार्टफोन्ससाठी अद्ययावत होण्याची संधी प्राप्त तर होणार आहेच, पण त्याचबरोबर मोबाईल डेटाचा वापर करण्याचीही संधी मिळणार आहे. सोप्या शब्दात सांगायाचे तर या उपक्रमामुळे ४जी स्मार्टफोनचा वापर वाढून व्होडाफोन आयडियाच्या ४जीचा वापर वाढू शकेल.
 
 
होम क्रेडिटच्या ग्राहकोपयोगी वित्तपुरवठा करण्याच्या या योजनेमुळे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना जीवनशैलीत सुधारणा होणार आहे. ग्राहकांना १७९ शहरांतील होम क्रेडिट इंडियाच्या आऊटलेट्स व २९ हजार पॉईंट ऑफ सेल (पीओएस) वरून लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. व्होडाफोन आयडिया ग्राहक आता कोणत्याही पीओएसला भेट देऊन त्यांचा स्मार्टफोन अद्ययावत करू शकतील.

 
या भागिदारीविषयी बोलताना होम क्रेडिट इंडियाचे सीईओ आँड्रेज कुबिक यांनी सांगितले की,“व्होडाफोन आयडियाबरोबर या अनोख्या उपक्रमासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे लोकांच्या आर्थिक सर्वसमावेशकतेची आमची वचनबध्दता अधोरेखित होते व प्रथमच कर्ज घेऊ इच्छिणार्याा लोकांना कर्ज उपलब्ध होत आहे. व्होडाफोन आयडियाबरोबर होम क्रेडिट इंडियामुळे फोनबरोबरच जीवनशैलीही अपग्रेड करणे शक्य होईल. स्मार्टफोनमुळे ग्राहक त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराची जीवनशैलीही बदलेल. मला खात्री आहे की, व्होडाफोन आयडिया आणि होम क्रेडिट यांच्यातील या भागिदारीमुळे ग्राहकांना चांगला लाभ होईल.” वित्तीय सहाय्यतेबरोबरच एक बंडल्ड ऑफर देताना व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना आता ४जी स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर केवळ ७९९/- रूपयांमध्ये मिळणार असून त्याचा लाभ सोप्या हप्त्यांमध्ये मिळणार आहेत. ”
 

 

Continue reading

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी,...

सुनेत्रा पवारांनी केला प्रचाराचा शंखनाद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह...

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ‘खराती’ वळण?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता एक वेगळे वळण मिळाले असून तपासात काही धक्कादायक दुवे समोर आले आहेत. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेच्या संदर्भात नवीन माहिती उजेडात आल्याने, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले...
Skip to content