HomeArchiveवेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून...

वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

Details
वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

 ”

केएचएल न्यूज ब्युरो 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
“येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.”
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
“येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.”

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content