HomeArchiveवृक्ष संकटातून सुटका...

वृक्ष संकटातून सुटका करा!

Details
वृक्ष संकटातून सुटका करा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
नेमेची येतो मग पावसाळा.. तयाचे कौतुक जाण बाळा.. असे जुन्या कविंनी सांगून ठेवले आहे. पण मुंबईकरांना या नेहमी येणाऱ्या पावसाबरोबरीची अनेक संकटे भेडसावत असतात. मुंबई, ठाणे व परिसरातील नागरिकांना पावसाचे कौतुक कमी व दहशत अधिक असते. पाऊस नसतो तेव्हा हवाहवासा वाटतो आणि जेव्हा येतो तेव्हा अनेक भयप्रद गोष्टीही घेऊन येतो. यंदाचा पाऊस तसा उशिरा सुरू झाला आहे. प्रशांत महासगरात उद्भवणाऱ्या अल नीनो या नैसर्गिक घटितामुळे भारतातील मोसमी पाऊस वेळेवर येत असतो. यंदा अल नीनोचा प्रभाव हवा तसाच होता. पावसासाठी वातावरण पोषक आहे असे अनुमान एप्रिलमध्ये हवामान शास्त्रज्ञांनी काढले होते. त्यामुळे भारतातील शेतकरी व जनताही आनंदित झाले होते. केरळमध्ये 1 जूनला अधिकृतपणाने पावसाचा प्रवेश झाला तर तो मुंबईत 7 जूनला थडकतो. पण मोसमी पावसाचा प्रवास योग्य गतीने व योग्य दिशेने सुरू असल्याचे सुरूवातीचे अंदाज फोल ठरवणारी एक नैसर्गिक घटना मेमध्ये घडली आणि पुन्हा जूनमध्येही साकारली.

मेमध्ये बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या फनी नावाच्या चक्रीवादळाने ओरिसात मोठे नुकसान केले. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही सर्व सरकारी यंत्रणांनी सतर्क राहून लाखो लोकांना सागरी किनाऱ्यांवरून सुरक्षित स्थळी वेळीच हलवले. त्यामुळे फनीने मालमत्तेचे मोठे नुकसान जरी केले असले तरी मानवी बळी मात्र मिळवले नाहीत. त्या घटनेचा परिणाम मोसमी पावसावर होणे अपेक्षित असतानाच अरबी सागरात दुसरे, वायू नावाचे चक्रीवादळ घोंघावू लागले. त्याचा फटका मुंबई व कोकणाच्या किनाऱ्याला बसेल का अशी शंका येत होती. जेव्हा मोसमी पाऊस भारतात प्रवेश करणार तेव्हाच हा वायू नावाचा चक्रीवात घुमू लागला होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातील या वादळाने नुकसान काही केले नाही पण पावसाळा थोडा अधिकच लांबवला. परिणामी जून अक्षरशः कोरडा गेला. राज्यातील साऱ्याच धरणांनी तळ गाठला. मोठ्या शहरांसह अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे वांधे होऊ लागले. मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याची पातळीही खालावली होती. ठाण्यात 22 टक्के पाणीकपात सुरू झाली होती. अशा या चिंतेच्या वातावरणात 24 जून रोजी पावसाने अधिकृतपणाने मुंबईच्या कोकणाच्या उंबरठ्यावर धडक मारली. पण तोवर पावसाने कोल्हापूरपासून ते नागपूर, औरंगाबादपर्यंत मोठा प्रदेश काबीजही केलेला होता.

एरवी मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांनी विदर्भ मराठवाड्यात पाऊस दिसू लागतो. यावेळी त्याने मुंबईला चकवून आधी औरंगाबाद, नागपूर गाठले. पण जूनअखेरीकडे मुंबई परिसरात आल्या आल्या असा काही दणका दिला की मुबंई, ठाणे, कल्याण, पालघर, वसई, विरार, अंबरनाथ अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीचे तीनतेरा उडाले. “यंदा पाणी कुठेही तुंबणार नाही कारण आम्ही गटारे वेळेत साफ करून घेतली आहेत,” असे ढोल पिटणाऱ्या सर्वच महानगरपालिकांचे पितळही या पावसाने उघडे पाडले. गेल्या दहा वर्षांतील जूनमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तर गेल्या शनिवारी पडलेला पाऊस हा जूनमधील सर्वाधिक होता. मुंबई शहरात अनेक भाग जलमय झाले होते. दोनशे मिलीमीटर पर्यंतचा पाऊस काही विशिष्ट ठिकाणी पडला आणि तिथल्या जनतेला 26 जुलै 2005 च्या भयावह जलप्रलयाची आठवण झाली.

पावसाळ्यात मुंबईत सखल भागात जमणारे पाणी कधी थांबू शकत नाही हेच खरे. काहीही केलेत तरी हे पाणी साचतेच. कारण मुंबईतील पावसाळी पाणी बाहेर समुद्रात नेणाऱ्या पावसाळी गटारांची क्षमता, पडणाऱ्या पावसाचे मान विशिष्ट स्तरावर गेले की संपून जाते. आणि त्याचवेळी समुद्रात जर भरती आलेली असेल तर मग कितीही पंप लावा ते पाणी ओहोटी सुरू होई पर्यंत हटूच शकत नाही. खरेतर मुंबई मनपाला सागरात लोटले न जाणाऱ्या पाण्याचे जे कारण आहे ते मुंबई शेजारच्या अन्य मनपांना नाही. पण तरीही हीच स्थिती मुंबईशेजारच्या सर्वच शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसली. या साठलेल्या पाण्याच्या अडचणी काही तासांनी दूर होऊ शकतात. पण, पडणाऱ्या झाडांचे काय करायचे? कालच्या एका दिवसात मुंबई व परिसरातील 110 झाडांनी माना टाकल्या. मोठे वृक्ष पडतात तेव्हा ते प्रचंड नुकसान करतात. पर्यावरणाच्या नावाने गळे काढणाऱ्यांनी शहरातील वृक्षांच्या धोक्याचाही विचार करायला हवा. जेव्हा एक फांदी पडते तेव्हा त्याखाली एखाद्याचा जीव गेला तर ते एका पूर्ण कुटुंबाचे मुळापासूनचे उन्मळणे असते याचा आपण कधी तरी विचार करणार आहोत की नाही? रस्त्यांच्या कडेला लावलेली झाडे जुनी आहेत, अनेक वर्षांची आहेत, म्हणून त्यांचे रक्षण करा म्हणणाऱ्यांनी त्या झाडांच्या तुटणाऱ्या फांद्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर काही भाष्य करावे की नाही? खरेतर राज्य सरकारने यासाठी नव्याने कायदाच कऱण्याची गरज आहे.

वृक्ष प्राधिकरण नावाची यंत्रणा याबाबतीत कुचकामी ठरलेली आहे. पडणाऱ्या फांदीमुळे झाडाच्या खोडामुळे एकादी टॅक्सी तुटते, नष्ट होते तेव्हा एक कुटुंब संकटात सापडत असते. मुंबईच्या पूर्व उपनागरातील चेंबूरमध्ये डिसेंबर 2017 मध्ये कांचन नाथ या अशाच पडणाऱ्या नारळाच्या झाडाखाली दगावल्या. त्यांचा काय दोष होता? ज्या सोसायटीच्या आवारातील तो नारळ कोसळला त्यांनी म्हणे मनपात तक्रार केली होती. तरीही झाड वेळेत तोडले गेले नाही. आता यात दोष कोणाचा आणि जीव कोणाचा गेला? एक व्यक्ती दगावते तेव्हा त्या कुटुंबाचे जीणेच उद्ध्वस्त होत असते. त्याची काही किंमत आहे की नाहीच? मुंबई असेल वा अन्य कोणतीही महापालिका त्यांच्याकडे धोकादायक झाडे ओळखण्याची कोणतीही शास्त्रीय पाहणी पद्धती नाही. मुळात शहरांतील इमारतींच्या शेजारी असणारी, फुटपाथवर वेडीवाकडी अक्राळविक्राळ वाढलेली झाडे तोडूनच टाकायला हवीत. दर थोड्या दिवसांनी नगरपालिका महानगरपालिकांनी त्याची पाहणी करायला हवी असे कुठेच होताना दिसत नाही. या झाडांच्या उंचीवर व विस्तारावर मर्यादा घालणारा कायदाच करायला हवा. असा कायदा करण्यासाठी जनतेनेच दबाव तयार करायला हवा. दहा फुटांपेक्षा उंच झाडे फुटपाथवर व इमारातींच्या शेजारी नकोत. त्यांच्या फांद्यांचा विस्तारही दहा फुटांच्या वर्तुळापलिकडे असता कामा नये. असे लहानखुरे झाड एकतर उन्मळून पडण्याची शक्यता नसते आणि जरी ते पडले तरी कोणाचा जीव घेण्याची शक्यताही नक्कीच कमी असेल. खरेतर केवळ शोभेची, फुले देणारी व खुरटी वाढणारीच झाडे शहरातील रस्त्यांच्या कडेला व इमारतींच्या आवारात दिसायला हवीत. मोठे वृक्ष गावाबाहेर अथवा महापालिका व नगरपालिकांच्या उद्यानांमध्येच लावावेत. तशा बगिचांमध्ये पावसाच्या काळात फिरायला जाणे टाळले तरी शेकडो लोकांचे प्राण वाचतील. हातपाय शाबूत राहतील आणि कित्येक गाड्यांचे प्राणही वाचवता येतील!”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content