Details
विरोधकांतील विरोधाभास!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
कोलकातामध्ये महागठबंधनचा दुसरा अध्याय लिहिला गेला आणि तिसऱ्या अध्यायासाठी एन. चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या नव्या कोऱ्या राजधानीच्या शहरात, अमरावती इथे, येण्याचे निमंत्रण या सर्व महागठबंधनवाल्या पक्षांना दिले. कर्नाटकात बेंगलुरु इथे खरेतर या महाआघाडीची पायाभरणी झाली होती. आठ महिन्यांपूर्वीच्या वादळी नाट्यपूर्ण घाडामोडींमध्ये एच. डी. कुमारस्वामींच्या जनता दल सेक्युलरचे सरकार तिथे स्थापन झाले होते. सध्या त्या सरकारच्या नाकाला जणू सूत लावले आहे. आता कोसळतेय की मग कोसळतेय अशा स्थितीत ते पोहोचले आहे. भाजपाविरोधी आघाडीचीही स्थिती काहीशी तशीच झालेली दिसते. बेंगलुरुच्या व्यासपीठावर सोनिया गांधी नेतृत्त्व करताना झळकल्या होत्या. त्यांनी मायवतींना व ममता बॅनर्जींना हातानी खेचत फोटोच्या मध्यभागी घेतल्याची दृष्येही आपण उत्साहाने पाहिली होती. पण तेव्हाचे ते सुंदर, सुरेख चित्र अवघ्या आठच महिन्यांत थोडे फाटलेलं, थोडं खराब होऊ लागलेलं दिसत आहे. मायवतींनी सोनियांच्या पक्षाला झुगारून दिले आहे तर ममतांनी सोनिया व राहूल यांनी कोलकाताच्या व्यासपीठावर येऊच नये अशी स्थिती पैदा केली होती. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधातले नारे कोलकातामध्ये बुलंदच झाले.
पण या महाआघाडीमध्ये नेतृत्त्वाचा मुद्दा हाच वादाचा मुद्दा बनणार आहे हेही स्पष्ट होऊ लागले आहे. तसेच या आघाडीमध्ये काँग्रेसचे नेमके स्थान कोणते आहे, याविषयी संभ्रम आणि चिंताही आहे. कारण कोलकातामध्ये काँग्रेस नेतृत्त्वाने अभिषेक मनु संघवी या प्रवक्त्यांना आणि लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांना धाडले होते. लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव तेजस्वी यादव हेही त्या व्यासपीठावर थाटात बसले होते. अखिलेश यादवांच्या बरोबर लालूपुत्राच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. काय संगितले असेल एका यादवाने दुसरऱ्या यादवाला? मायावतींच्या मदतीने उत्तर प्रदेशातील आघाडीमधून काँग्रेसला कसे काय वगळले याचे किस्से तर अखिलेश यांनी सांगितले नसतील ना?
कोलकातात बोलताना तेजस्वी यांची भाषा निराळी होती व बिहारच्या राजधानीत, पाटणा इथे ते निराळे बोलत होते. काँग्रसकडे आघाडीचे नेतृत्त्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे अशी स्तुतीसुमने उधणाऱ्या तेजस्वी यांनी व त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाने बिहारच्या पाटणा या मुख्यालयात मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. तिथे त्यांनी काँग्रेसला बजावले आहे की तुम्ही बिहारच्या 40 जागांपैकी जास्तीतजास्त आठ जागी लढा. बाकी जागा आम्ही आमच्या अन्य मित्रपक्षांबरोबर वाटून घेणार आहोत. बिहार हे देशाच्या राजकारणातील क्रमांक चारचे महत्त्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आपल्या राज्यातील 48 जागा या देशाचे नेतृत्त्व कोणी करायचे हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका वठवणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये, 42 व चौथ्या क्रमांकाच्या जागा आहेत बिहारमध्ये, 40. तामिळनाडूचे महत्त्व 39 जागांमुळे त्यानंतरच्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये चाळीसपैकी काँग्रेसने निम्या जागा लढवाव्यात व लालूंच्या पक्षाने निम्म्या लढवाव्यात असा प्रस्ताव काँग्रेसचा होता. मात्र लालूंनी त्याला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत लालू व नीतीशकुमार एकत्र लढले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाला व काँग्रेसलाही विरोधच केला होता. त्यावेळी देशात मोदींची लाट होती. त्यात भाजपाने बिहारमध्ये तब्बल 16 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. पाच जागा रामविलास पासवान यांच्या लोकदलाने जिंकल्या होत्या. नीतीशकुमारांनी दोन तर लालू प्रसाद यादवांनी तीन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसचे दोन खासदार आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक, तारीक अन्वर, विजयी झाले होते. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आता मात्र पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये परत गेले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.
त्या निवडणुकीत नीतीशकुमार व लालूप्रसाद यादव हे एकमेकांच्या सोबत होते. नंतरच्या 2015 मधील विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष महागठबंधन म्हणूनच लढले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विधानसभेतील 243 जागांपैकी या दोघांनी मिळून 178 जागा जिंकल्या होत्या. पण भ्रष्टाचाराचा मुद्दा या सरकरामधील मोठा अडसर ठरला. लालूप्रसाद यादवांचा मुलगा तेजस्वी यादव हा नीतीश यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री होता. लालूंच्या कुटुंबियांवर चारा घोटाला, रेल्वेमंत्री असतानाची प्रकरणे असे सीबीआयचे खटले सुरुच होते. लालू केंद्रीय मंत्री असताना रेल्वेच्या जागेतील हॉटेल विक्रीच्या प्रकरणात तेजस्वी तसेच लालूंचे अन्य कुटुंबीय यांची नावे पुढे आली. त्यांच्या विरोधात खटले दाखल झाले. तेव्हा 2017 च्या मध्यावर नीतीश यांनी लालू यादवांची साथ सोडली. त्यांनी पुन्हा नरेंद्र मोदींच्या व अमित शाहांच्या नेतृत्त्वाखाली भाजपासमवेत आघाडी केली. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले आणि नंतर मुख्यमंत्रीपदीही परतले. त्या साऱ्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर आता 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रालोआमधील जागावाटप यशस्वीपणाने पार पडले. भाजपा व जनता दल युनायटेड यांनी प्रत्येकी 17 तर पासवान यांच्या लोकजनशक्तीने 6 जागा लढवायचा असा समझोता ठरला आहे. त्यामुळे तिथे आता काँग्रेस व लालूंची आघाडी होणार की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
काँग्रेसची ताकद या साऱ्या भागात किती आहे याविषयी त्यांच्या संभाव्य मित्रपक्षांना शंका आहे. शिवाय लालू यादवांच्या पक्षाने सवर्णांच्या दहा टक्के आरक्षणाच्या विधेयकाला संसदेत विरोध केला होता. मागास वर्ग हा त्यांचा मुख्य जनाधार आहे. लालूंची आणखी एक मोठी तक्रार काँग्रेसच्या विरोधात आहे. बिहारमध्ये काँग्रेस वरिष्ठ जातींच्या अनेक मोठ्या नेत्यांना प्रवेश देत आहे किंवा लोकसभेसाठी हे नेते काँग्रेसकडे येणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा व कीर्ती आझाद यांची नावे काँग्रस प्रवेशासाठी आघाडीवर आहेत. भाजपाचे एक नाराज खासदार उदय सिंह हेही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. एक अनंत सिंह नावाचा नामचीन गुंड आधी नीतीश कुमारांच्या समेवत होता. तो आता काँग्रेसमधून लोकसभेसाठी उत्सुक आहे असे म्हणतात. जशा लालूंच्या पक्षाच्या तक्रारी आहेत तशीच काँग्रेसच्याही मनात काही खदखद आहे. ज्यादिवशी मायावती व अखिलेश यादवांनी उत्तर प्रदेश आघाडीमधून काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला त्याचदिवशी तेजस्वी यादव यांनी त्या भाजपाविरोधी व काँग्रेसविरोधीही असणाऱ्या आघाडीचे स्वागत केले. पुन्हा दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यादव मायावतींना व अखिलेश यादवांना खास जाऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा करून आले. सपा, बसपा यांचाही काही प्रभाव बिहारमध्ये काही भागात आहे. तिथे या दोन्ही पक्षांबरोबर तेजस्वी यादवांना आघाडी करायची आहे. काँग्रेसला सुरुवातीला ते बारा जागा द्यायला तयार झाले होते. आता राजदचे म्हणणे आहे की काँग्रेसला फार झाले तर आठ जागा देता येतील. राहूल गांधी यांनी उत्तर प्रदेशात चमत्कार दिसेल असे म्हणत स्वबळावर सर्व 80 जागा लढवण्याची घोषणा केलीच आहे. त्याच चालीवर ते बिहारमध्येही चमत्कार घडवण्याच्या तयारीला लागू शकतील अशी दाट शक्यता आहे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी