Details
विनर्स ट्रस्टचे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पोलारिस हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अतुल खरात आणि डॉ. अजिंक्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी-सासवड येथे आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत तीन हजार नी कॅप तसेच औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य शिबिराचेही आयोजन करून त्यांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो तेवढाच तो माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या कर्मातला देव कोणाला दाखवायची गरज नसते. तो सर्वाना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी कर्मातला देव कधीही टाळू नका.. चांगल्या कार्याची परमेश्वर नोंद घेत असतो. म्हणून सर्वांना नेहमी देणाऱ्याच्या रांगेत उभे राहून जास्तीतजास्त जनसेवा करता यावी या हेतूने जॉय ऑफ गिविंग अर्थात माणुसकीचे देणे हा उपक्रम विनर्सने राबविल्याचे शशिकांत खामकर यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो