Details
hegdekiran17@gmail.com
“विद्यार्थ्यांमध्ये देशक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेने संपूर्ण राज्यभर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेला कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल एंजल स्कूल, पेण (रायगड) येथील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यास विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभक्तीपर विचारांनी सारेचजण भारावून गेले.”
“ज्येष्ठ समाजसेविका संगीता अमलाडी, पेण येथील समाजसेविका सुलभा लोंढे आणि रीमा सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी पिंक, संस्थेच्या संचालिका नयना शिंदे आणि अशोक शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पेणच्या लिटिल एंजल स्कूलमध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ झाला.”

