HomeArchiveविजया वाड यांच्या...

विजया वाड यांच्या पुस्तकांची रेखाटली मुखपृष्ठे!

Details
विजया वाड यांच्या पुस्तकांची रेखाटली मुखपृष्ठे!

    03-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील ममता पवार यांच्या चित्रकला वर्गाने डॉ. विजया वाड यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे रेखाटण्याचा उपक्रम ‘चला वाचू’ या प्रकल्पांतर्गत आयोजित केला. मंकूची गोष्ट, गोंदूचा दोंदू, दिव्यदृष्टी अशी बालपुस्तके चित्रे काढून सजविली. प्रसिद्ध अॅनिमेशन कलाकार आनंद पवार यांनी त्या मुलांचे कौतुक पुस्तके देऊन केले. त्रिशा आनंद पवार, वैष्णवी शेट्टी, श्रीराज कपिल पवार, सेजल शिगवण, अनुष्का शिंदे या बालकलाकारांनी यात सहभाग घेतला.
 
अधिकाधिक मुलांनी वाचावे, यासाठी ही चार पुस्तके केवळ १०० रूपयांमध्ये नवचैतन्य प्रकाशन आणि निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्ट तसेच डॉ. विजया वाड यांनी उपलब्ध करून दिली आहेत. या पुस्तकांचा तपशील असा-
 
असा घडला महान शास्त्रज्ञ: डॉ. अनिल काकोडकर यांचा जीवनप्रवास अतिशय साध्या सोप्या शब्दांत विजयाताईंनी बाल-किशोरांसाठी उलगडला आहे. एका थोर अणुशास्त्रज्ञाची विद्यार्थीदशा कशी होती ते वाचून मुलांना खचित स्फूर्ती येईल.
 
 
गोंदूचा दोंदू: मुलांना प्राणी-पक्षी खूप्पच आवडतात. खरं ना? गोंदूला दोंदू नावाचा बोकड खूप आवडे. लष्करी जवानांचा तो दोंदू कसा मित्र झाला? वाचा या चित्तरकथेत. मस्त मनोरंजन आणि प्राणीप्रेमांची चटकदार गोष्ट! गोंदूचा दोंदू.
 
 
दिव्यदृष्टी: आपल्याला बाप्पाने २ डोळे दिले म्हणून आपण मोठी डिंग मारतो ना? पण अंध व्यक्तीसुद्धा हे जग बघतात! अहो, आश्चर्य वाटलं का? त्यांना तर अकरा डोळे असतात. एक अंतचक्षू – म्हणजे मनाचा डोळा बरं! नि बोटांना १० डोळे हातांवर.. या दिव्यदृष्टीने शिवांगी कसा चोर पकडते? वाचा या मस्त मस्ताड पुस्तकात. बालदोस्तांनो नवी दृष्टी मिळेल, जगाला बघायची.
 
 
मंकूची गोष्ट: मंकू आहे एक माकडाचं पिल्लू नि पिल्लू आईला न सांगता घराबाहेर पडतं. जंगलात वाट चुकतं. रडू लागतं. एक दोस्त फुलपाखरू त्याला आईची भेट कशी घडवून देतं? वाचा या सदाबहार गोष्टीत. मज्जा वाटेल. या चारही कथांना ‘किशोर’मध्ये प्रसिद्धी मिळाली आहे हे विशेष.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 

“मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील ममता पवार यांच्या चित्रकला वर्गाने डॉ. विजया वाड यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे रेखाटण्याचा उपक्रम ‘चला वाचू’ या प्रकल्पांतर्गत आयोजित केला. मंकूची गोष्ट, गोंदूचा दोंदू, दिव्यदृष्टी अशी बालपुस्तके चित्रे काढून सजविली. प्रसिद्ध अॅनिमेशन कलाकार आनंद पवार यांनी त्या मुलांचे कौतुक पुस्तके देऊन केले. त्रिशा आनंद पवार, वैष्णवी शेट्टी, श्रीराज कपिल पवार, सेजल शिगवण, अनुष्का शिंदे या बालकलाकारांनी यात सहभाग घेतला.”
 

“अधिकाधिक मुलांनी वाचावे, यासाठी ही चार पुस्तके केवळ १०० रूपयांमध्ये नवचैतन्य प्रकाशन आणि निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्ट तसेच डॉ. विजया वाड यांनी उपलब्ध करून दिली आहेत. या पुस्तकांचा तपशील असा-”
 
असा घडला महान शास्त्रज्ञ: डॉ. अनिल काकोडकर यांचा जीवनप्रवास अतिशय साध्या सोप्या शब्दांत विजयाताईंनी बाल-किशोरांसाठी उलगडला आहे. एका थोर अणुशास्त्रज्ञाची विद्यार्थीदशा कशी होती ते वाचून मुलांना खचित स्फूर्ती येईल.
 
 
गोंदूचा दोंदू: मुलांना प्राणी-पक्षी खूप्पच आवडतात. खरं ना? गोंदूला दोंदू नावाचा बोकड खूप आवडे. लष्करी जवानांचा तो दोंदू कसा मित्र झाला? वाचा या चित्तरकथेत. मस्त मनोरंजन आणि प्राणीप्रेमांची चटकदार गोष्ट! गोंदूचा दोंदू.
 
 
“दिव्यदृष्टी: आपल्याला बाप्पाने २ डोळे दिले म्हणून आपण मोठी डिंग मारतो ना? पण अंध व्यक्तीसुद्धा हे जग बघतात! अहो, आश्चर्य वाटलं का? त्यांना तर अकरा डोळे असतात. एक अंतचक्षू – म्हणजे मनाचा डोळा बरं! नि बोटांना १० डोळे हातांवर.. या दिव्यदृष्टीने शिवांगी कसा चोर पकडते? वाचा या मस्त मस्ताड पुस्तकात. बालदोस्तांनो नवी दृष्टी मिळेल, जगाला बघायची.”
 
 
मंकूची गोष्ट: मंकू आहे एक माकडाचं पिल्लू नि पिल्लू आईला न सांगता घराबाहेर पडतं. जंगलात वाट चुकतं. रडू लागतं. एक दोस्त फुलपाखरू त्याला आईची भेट कशी घडवून देतं? वाचा या सदाबहार गोष्टीत. मज्जा वाटेल. या चारही कथांना ‘किशोर’मध्ये प्रसिद्धी मिळाली आहे हे विशेष.

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content