Details
वाचावं असं काही दिवाळी अंक १ – शब्दमल्हार
01-Jul-2019
”
महेश पवार
[email protected]
यंदा दादरच्या आयडीअलमधून मोजून मापून केवळ १५ दिवाळी अंक विकत घेतले. त्यातील निवडक सहा अंकाबद्दल लिहित आहे. साधारणतः सर्व अंक चाळून झाले होते. त्याची पुन्हा उजळणी झाली. त्यातून माझ्या वाचकाच्या नजरेतून सर्वाधिक उत्कृष्ठ दिवाळी अंक ठरला शब्दमल्हार. स्वानंद बेदरकर हे शब्दमल्हारचे संपादक. स्वानंद आणि मी नाशिकच्या गावकरी दैनिकासाठी काम करत होतो. तो नाशिकमधून तर मी मुंबईतून. त्याची विचारसरणी आणि लेखन सर्वांपेक्षा अगदी वेगळं. शब्दमल्हार वाचल्यानंतर ते अधिक प्रकर्षानं जाणवून येतं.
दिवाळी अंकाच्या संपादकीयमध्ये तो लिहितो, भाबडेपण किंवा भाबडेपणाचा अंगरखा चढवून साहित्य व्यवहार किंवा कला व्यवहार होत नाही. आपण काय वाचतो, पाहतो, लिहितो, सांगतो या सगळ्याचाच पुनः पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. मुळं गमावून बसलेले झाड काही काळ उभे रहाते; पण नंतर जसे उन्मळून पडते तसे व्हायला नको. मुळांनी सातत्याने पाणी शोषून झाडापेराकडे पाठवत त्याला हिरवेकंच ठेवले पाहिजे. तोच सृष्टीचा खरा आधार आहे. ज्यांच्यासमवेत आपण राहातो, बसतो, बोलतो, काही जीवन व्यवहार करतो तोही एकदा तपासण्याची गरज आहे. किती दिवस क्षणाच्या प्रसिध्दीसाठी आपण आपल्या वैचारिक कंगालांना, नागड्यांना स्थान देणार आहोत? झूल पांघरून आपला नंदी होणे ही बरी गोष्ट नाही. स्वानंदचे हे विचार प्रगल्भतेतून आलेले आहेत.
संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आणि संस्कृत भाषेसाठी एकमेव ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पद्मश्री आचार्य डॉ. सत्यव्रत शास्त्री यांची मुलाखत जीवनाचे मुख्यतः गैरसमजाचे सार सांगून जातात. ते म्हणतात, अस्मितेचे, अस्तित्वाचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न तासून टोकदार झाले की, मग ते साहित्यकृतीला लावून पहायचे. त्यातून साहित्यकृती तर रक्तरंजित होतेच; पण त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे माणसाची माणसाविषयीची श्रध्दा नष्ट होते. एकदा का श्रध्देला नख लागेल की सगळा चांगुलपणा, एकमेकांबद्दलचा आदर संपुष्टात येतो. निर्मिती ही गोष्ट फार म्हणजे फारच वरच्या दर्जाची आहे. तिथे कुठलाही वाद, कुठलाही रंग, कुठलेही समज अपसमज नसतात. असते ती फक्त नीरव शांती. शांतता हा निर्मितीचा एकमेव आणि सर्वोच्च गुण आहे. शांतरसाची उत्पत्ती हा निर्मितीचा प्रधान हेतू आहे. जिथे शांतरस, तेच सत्यं – शिवं-सुंदरमचे वसतिस्थान आहे.
पंडित बिरजू महाराज यांचा लेख, श्याम मनोहर यांची मुलाखत, रवींद्र लाखे यांचा काय असतं कलावंताच भाग्य, माधवी भट यांचा अवस्थांतर, नीलेश काळे यांचा जे दिसतं ते बघताही आलं पाहिजे हा फोटोग्राफीवरील लेख, बिभास आमोणकरांचा सृष्टिचा ह्रीदमिक कॅडिलोस्कोप हा निसर्गावर आधारित लेख, पंकज बावडेकरांचा चित्रताल आदी विविधांगी विषयांनी सजलेला हा अंक वाचनीय आहेच. शिवाय वाचकांच्या ज्ञानात भर घालणारा आहे. दिवाळी अंक विकत घेताचा एका दिवाळी अंकामध्ये एक कवितासंग्रह निघेल इतक्या कविता छापल्या होत्या. मात्र, शब्दमल्हारमध्ये केवळ दोनच कविता असून त्याही अंकामधील विषयाला अनुरूप अशा आहेत. विविध लेखांनी आणि पूर्णतः रंगीत पानांचा हा अंक आणि त्यातला मजकूर वाचनीय आहे.
संपादक : स्वानंद बेदरकर
प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
मुखपृष्ठ : पंकज बाबडेकर
किंमत : १५०/-”
“महेश पवार