HomeArchiveवर्सोव्यातील वाहतूक कोंडी...

वर्सोव्यातील वाहतूक कोंडी फुटणार!

Details
वर्सोव्यातील वाहतूक कोंडी फुटणार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
8 जून 2014 साली वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो सुरू झाली. मात्र डी. एन. नगर ते दहिसर, स्वामी समर्थ नगर ते कांजूर मार्ग या मार्गावर सुरू असलेली मेट्रोची कामे, जेव्हीएलआर रस्त्याचे रखडलेले विस्तारीकरण आणि अनेक ठिकाणी असलेले बॉटलनेक यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील सुमारे 2 लाख 97 हजार नागरिकांना नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच ओशिवरा पूल बंद असल्याने वर्सोवाच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

यावर मार्ग काढण्यासाठी येथून 2014 साली भाजपाच्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. भारती लव्हेकर या सातत्याने प्रयत्नशील आहेत. येथील वाहतूक कोंडी व चार पुलांची निर्मिती लवकर करणे, अन्य समस्या दूर करण्यासाठी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी नुकतीच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या दालनात नुकतीच महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पालिका आयुक्तांनी अनेक सकारत्मक निर्णय घेतल्याने वर्सोवा येथील वाहतूक कोंडी दूर होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती आमदार लव्हेकर यांनी दिली.

या बैठकीत सात बंगला येथील केंद्रीय मत्स्यकी विद्यालय मार्गे यारी रोडकडे जाणाऱ्या रस्ता रूंदीकरणात सुंदरवाडी झोपडपट्टी आहे. येथील 28 झोपडयांपैकी 5 झोपड्यांना पालिकेने यापूर्वी शिफ्टिंग दिले होते. आता उर्वरित 23 झोपड्यांना लवकर शिफ्टिंग देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. केंद्रीय मत्स्यकी संस्थेची रस्ता रूंदीकरणात येणारी संरक्षक भिंत तोडण्यात येईल. पालिका स्वखर्चाने नवीन भिंत बांधून देईल असा महत्त्वाचा निर्णय झाला. त्यामुळे येथील बॉटलनेक दूर होऊन 120 फुटांचा रस्ता होणार असल्याने येथील वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वर्सोव्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी इन्फिनिटी मॉल ते एसव्ही रोड मार्गे जेव्हीएलआर रस्त्याच्या रखडलेल्या विस्तारीकरणात रखडलेले 3 एसआरए प्रकल्प मार्गी लावणे, या मार्गात येणारी पालिका व उपनगर जिल्ह्याधिकारी, म्हाडा यांच्या मालकीचे असलेले अडथळे दूर करण्यासाठी लवकरच 120 फुटांचा डीपी रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करणे , पालिका प्रशासनाबरोबर एसआरए आणि उपनगर जिल्ह्याधिकारी, म्हाडा, डीपी यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा निर्णय झाल्याची माहिती लव्हेकर त्यांनी दिली.

येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अमरनाथ टॉवर ते लोखंडवाला बँक रोड, केंद्रीय मत्स्यकी संस्था ते एस. व्ही. पी. नगर ते अमरनाथ टॉवर आणि वर्सोवा ते मढ हे चार पूल लवकर मार्गी लावण्याचा आणि पर्यावरण खात्याची परवानगी लवकर आणण्याचा निर्णय झाला. विरा देसाई मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण बांधण्याचा निर्णय झाला आहे. ओशिवरा मॅटरनिटी होम लवकर मार्गी लावणे, अंधेरी क्रीडा संकुलात वर्सोवा येथील नाट्यप्रेमी रसिकांसाठी नाट्यगृहाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणीदेखील आयुक्त परदेशी यांच्याकडे त्यांनी केली. वर्सोवा स्मशानभूमीच्या सोदर्यीकरणाचे काम सुरू असून येथील बोहरी समाजासाठी 200 बरीज दफनभूमी लवकर बांधण्यात यावी अशी मागणी लव्हेकर यांनी यावेळी केली.

या बैठकीला प्रभाग क्रमांक 60 चे भाजपा नगरसेवक योगीराज दाभाडकर, प्रभाग क्रमांक 63 च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील, वर्सोवा भाजपा अध्यक्ष पंकज भावे, परिमंडळ 4 चे पालिका उपायुक्त किरण आरचरेकर, के पश्चिम वॉर्डचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी काळे आणि वर्सोवा येथील नागरिक उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content