HomeArchiveवर्सोवा चौपाटीवर जीवन...

वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

Details
वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“”पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. 
 
यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.
 
मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.
 

 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“””पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. ”
 

“यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.”
 

“मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.”
 

 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content