HomeArchiveलघुपट हे व्यक्त...

लघुपट हे व्यक्त होणाऱ्या युवा पिढीचे माध्यम – दिग्दर्शक उमेश कुळकर्णी

Details
लघुपट हे व्यक्त होणाऱ्या युवा पिढीचे माध्यम – दिग्दर्शक उमेश कुळकर्णी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

‘आजची तरूणाई व्यक्त होऊ पाहत आहे. तिच्या हातात संवादाचे आधुनिक माध्यम आले आहे. त्याद्वारे लघुपट निर्माण करून ती आपले प्रश्न, आपले विषय ताकदीने जगासमोर आणत आहे’, असे प्रतिपादन ‘वळू, ‘विहिर’, देऊळ’ असे वेगळ्या घाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक उमेश कुळकर्णी यांनी कोल्हापुरात नुकतेच केले.

कोल्हापूरच्या राजर्षि शाहू स्मारकामध्ये ‘हमीद-द अनसंग हृयुमॅनिस्ट’ हा ज्योती सुभाष दिग्दर्शित माहितीपट दाखवून कोल्हापूर शॉर्ट फिल्म क्लबचे औपचारिक उद्घाटन झाले, त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी या माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हमीद दलवाई या सच्च्या समाजसुधारकाचा जीवनपट रसिकांनी यात अनुभवला. त्यानंतर दिग्दर्शिका ज्योती सुभाष, सहदिग्दर्शक ओंकार बर्वे, उमेश कुलकर्णी यांच्याशी रसिकांचा मुक्त संवाद झाला. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी याची सूत्रे सांभाळली.

“मेहरुन्निसा दलवाई यांचे मनोगत मी एका पुरस्कार वितरणाच्या वेळी ऐकले. मग झपाटून जावून मी त्यांची सगळी पुस्तकं विकत घेतली आणि ठरवलं की आपण हे कार्य जगासमोर आणायचेच. इंधन ही कादंबरी पूर्वी कधीतरी वाचली होती. ती परत वाचली. त्यांचं ललित साहित्य वाचलं. आपण आपल्याला आवडलेलं एखादं घर, दागिने किंवा कपडे वाटेल तेवढे पैसे खर्चून आपण घेतो .मग आपण या चांगल्या कामासाठी खर्च करायला काय हरकत आहे हा विचार करून मी ही फिल्म केली”, असं ज्योती सुभाष म्हणाल्या.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून मुस्लिम समाजातील वाईट प्रथांविरोधात लढा देणाऱ्या हमीद दलवाईंचे अप्रतिम चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व यांना विरोध आणि समान नागरी कायद्याची आग्रही मागणी यासाठी त्यांनी मुंबईमध्ये अवघ्या सात तलाकपिडीत महिलांना घेऊन मोर्चा काढला आणि एका मोठ्या लढाईला सुरूवात झाली. हमीद दलवाईंच्या अकाली निधनाने या चळवळीला मोठा धक्का बसला. दलवाईंची वैचारिक भूमिका, त्यांचे लेखन, कार्य यावर या माहितीपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

माहितीपटामधे ज्योती सुभाष, अमृता सुभाष, नसिरूदृीन शाह, हमीद दाभोळकर येत राहतात आणि फिल्मचा धागा पुढे नेतात. हुसेन दलवाई हे त्यांचे बंधु, बाबा आढाव, रामचंद्र गुहा, सुमित्रा भावे, भाई वैद्य, अन्वर राजन, रजिया पटेल, विनोद शिरसाठ या सुह्दांची मनोगते यात बघायला मिळतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश बगाडे यांनी केले.”
 
“डॉ. सई लळीत, कोल्हापूर

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content