HomeArchiveराष्ट्रीय कलामेळ्याची यशस्वी...

राष्ट्रीय कलामेळ्याची यशस्वी सांगता!

Details
राष्ट्रीय कलामेळ्याची यशस्वी सांगता!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
ललित कला अकादमी आयोजित राष्ट्रीय कलामेळ्याची रविवारी सांगता झाली. 60 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाबरोबरच ह्या कलामेळ्याचे आयोजन केले होते. मुंबईतल्या कलेचा मोठा वारसा असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्रांगणात हा कलामेळा भरला होता. यामध्ये देशभरातले चित्रकार, कला संस्था, चित्रकलेविषयक उत्पादनं आणि प्रकाशक यांचे 125 स्टॉल्स होते. लोकांनी कलामेळ्याला भेट दिली आणि निवडक चित्रांची खरेदीही केली. समारोपप्रसंगी ललित कला अकादमीच्या वतीनं सर्व सहभागी स्टॉलधारकांना प्रमाणपत्रं देण्यात आली.

या कलामेळ्यात शेवटच्या दिवशी प्रसिद्ध कथक नृत्यांगना नलिनी आणि कमलनी यांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला. कलामेळ्यातल्या कलाविष्काराची सांगता गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गायनाने झाली. भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कलामेळा संपला असला तरी राष्ट्रीय चित्र प्रदर्शन जे. जे. तसंच राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात येत्या 18 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. उद्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दुपारी 4.30 वाजता ज्योती भट्ट आणि हिम्मत शाह या कलाकारांवरील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. मर्यादित प्रवेश संख्येमुळे इच्छुकांनी [email protected] वर आगाऊ संपर्क साधून विनामूल्य प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय.

 ”
 
“भीमराव पांचाळे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content